70 वर्षे जुनी कंपनी विक्रीच्या तयारीत टाटा समूह, का घेतला असा निर्णय

Tata Company | टाटा समूहातील 70 वर्षे जुनी कंपनी विक्रीच्या तयारीत आहे. इतकी जुनी कंपनी विक्री करण्याचा निर्णय केव्हा पण होऊ शकतो. त्यामागे अनेक कारणे आहेत. अर्थात अजून या विषयीची चर्चा सुरु आहे. त्याविषयीचा निर्णय झालेला नाही. ब्लूमबर्गने याविषयीचा रिपोर्ट दिल्याने उद्योग जगतात एकच खळबळ उडाली आहे.

70 वर्षे जुनी कंपनी विक्रीच्या तयारीत टाटा समूह, का घेतला असा निर्णय
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 3:19 PM

नवी दिल्ली | 7 नोव्हेंबर 2023 : देशातील सर्वात मोठा उद्योग, टाटा समूहाने (Tata Group), वोल्टास लिमिटेड ही कंपनी विक्रीचा घाट घातला आहे. होम एप्लायन्सेस तयार करणारी ही कंपनी विक्री करण्यात येऊ शकते. यविषयाची अंदाज ब्लूमबर्गने सूत्रांच्या आधारे वर्तविला आहे. ब्लूमबर्ग रिपोर्टमध्ये याविषयीचा दावा करण्यात आला आहे. सध्या बाजारात स्पर्धा वाढली आहे. अनेक कंपन्या आणि स्टार्टअप्सची चलती आहे. धमाकेदार ऑफर्सचा भडीमार सुरु आहे. या गळेकापू स्पर्धेत टिकण्यासाठी अनेक दिव्य कंपन्यांना करावे लागत आहे. येत्या काही दिवसात कंपनीला व्यवसाय वृद्धीत अडचणी येऊ शकतात, असा अंदाज आहे. त्यामुळे टाटा समूहाच्या व्यवस्थापनाने हा व्यवसाय विक्रीची चाचपणी सुरु केल्याचे समजते. अर्थात याविषयीचा कोणताही निर्णय समोर आलेला नाही.

शेअरमध्ये 3 टक्क्यांची तेजी

सूत्रांच्या माहितीनुसार, याविषयीची चर्चा केवळ प्राथमिक अवस्थेत आहे. टाटा समूहात ही कंपनी अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. भविष्यात कदाचित ही कंपनी अजून दीर्घकाळ सेवा बजावेल. टाटा समूहातील अधिकाऱ्याने याविषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. वोल्टासच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांची तेजी आली आहे. या कंपनीची मार्केट व्हॅल्यू जवळपास 3.3 अब्ज डॉलर इतकी पोहचली आहे. या कंपनीची स्थापना 1954 मध्ये झाली आहे. ही अनेक जुन्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे.

हे सुद्धा वाचा

काय करते कंपनी

ही कंपनी एअर कंडिशनर आणि वॉटर कुलर, रेफ्रिजरेटर युनिट तयार करते. भारताशिवाय ही कंपनी मध्यपूर्व, दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिका खंडात काम करते. कंपनीचे भारतात Arcelik सोबत भागीदारी आहे. या कंपनीने देशात Voltas Beko या ब्रँडसह अनेक उत्पादनं देशात उतरवली आहेत. Voltas Beko ने गेल्या आर्थिक वर्षातील महसूल जवळपास 96.7 अब्ज रुपये होता. 30 सप्टेंबर रोजीपर्यंत या कंपनीचा रेफ्रिजरेटर मार्केटमधील वाटा 3.3 टक्के आणि वॉशिंग मशीन मार्केटमधील शेअर 5.4 टक्के इतका होता. आता कंपनी विक्रीची ही चर्चा खरी ठरते की अफवा हे लवकरच समोर येईल. पण अशी समीकरणं घडल्यास इतर कंपन्या या स्पर्धेत मोठी घौडदौड करतील, हे नक्की.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.