Gold rate today: सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा दर

ही परिस्थिती पाहता 2021च्या दिवाळीपर्यंत सोन्याचा दर प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. | gold and silver rate

Gold rate today: सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा दर
Gold Silver Price Today
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 8:50 AM

जळगाव: राज्यातील सोने-चांदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या जळगावात गुरुवारी दोन्ही धातूंच्या दरात किंचित घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा (Gold) आजचा दर (Gold rate) 52.035 प्रतितोळा आहे. तर चांदीचा दर (Silver rate) प्रति किलो 71,031 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. (gold silver price today latest updates) काल जळगाव बाजारपेठेत सोने आणि चांदीचा दर अनुक्रमे 53,146 प्रतितोळा आणि 72,703 प्रतिकिलो इतका होता. (Gold and sliver rate today)

जगात कोरोनाच्या साथीने थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले होते. मात्र, परिस्थिती निवळत गेल्यानंतर आणि कोरोनावर लस मिळण्याची चिन्हे दिसून लागल्यानंतर सोन्याचा भाव पुन्हा खाली येण्यास सुरुवात झाली होती. भारतात सोन्याच्या किंमतीत ऑगस्ट महिन्यापासून घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम चक्क 56 हजार 379 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, त्यानंतर सोन्याचे दर घसरत गेले.

मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार आढल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली होती. ही परिस्थिती पाहता 2021च्या दिवाळीपर्यंत सोन्याचा दर प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

सोने खरेदीसाठी आता ओळखपत्र द्यावं लागणार

काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची आता देशभरातील सराफा व्यापाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आता सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांची खरेदी रोख पैसे देऊन करायची असल्यास तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्ड दाखवणे बंधनकारक राहील. अन्यथा देशातील कोणत्याही ज्वेलर्समध्ये तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही.

तसेच पेढी आणि सोने व्यापाऱ्यांना 10 लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

रोखीच्या व्यवहारांसाठी KYC ची मागणी

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करु लागले आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

संबंधित बातम्या:

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार?

सोने खरेदीसाठी आता ओळखपत्र द्यावं लागणार, देशभरातील सराफांचा मोठा निर्णय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.