आरबीआयची कोटक बँकेवर अॅक्सन, उदय कोटक यांना फटका, 10,328 कोटींचे नुकसान
uday kotak: उदय कोटक यांची संपत्ती या वर्षी एकूण $1.52 अब्जने घसरली आहे. उदय कोटक यांची कोटक महिंद्रा बँकेत 25.71 टक्के भागीदारी आहे. शेअर्सच्या घसरणीमुळे बँकेचे मार्केट कॅप 39,768.36 कोटी रुपयांनी घसरून 3,26,615.40 कोटी रुपयांवर आले.
देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दणका दिला आहे. ऑनलाईन नवीन ग्राहक जोडणी आणि नवीन क्रेडिट कार्ड जोडणीवर आरबीआयने निर्बंध आणले आहेत. आरबीआयच्या या निर्णयाचा फटका बँकेच्या शेअरवर गुरुवारी झाला. गुरुवारी बँकेचे शेअर 12 टक्के घसरले होते. मुंबई शेअर बाजारात बँकेचे शेअरमध्ये 10.85 टक्के घसरण झाली. बँकेचे शेअर 1,643 रुपयांवर बंद झाले. संपूर्ण दिवसभरात बँकेचे शेअर 12.10% टक्के घसरले होते. बँकेचे शेअर 52 आठवड्यातील सर्वात नीचांक पातळीवर आले आहे. बँकेचे शेअर 1,620 रुपयांवर आले होते. मुंबई शेअर बाजाराप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजारात कोटक बँकेच्या शेअरमध्ये 10.73% घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजारात 1,645 रुपयांवर बँकेचा शेअर आला. दिवसभरात राष्ट्रीय शेअर बाजारात 13% घसरण झाली. हा शेअर 1,602 रुपयांवर आला होता. या सर्व घटनांचा परिणाम उदय कोटक यांच्यावर झाला आहे. त्यांचे गुरुवारीच 10,328 कोटींचे नुकसान झाले.
उदय कोटक यांची संपती झाली कमी
शेअरच्या घसरणीमुळे कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक आणि गैर-कार्यकारी संचालक उदय कोटक यांच्या निव्वळ संपत्तीत मोठी घसरण झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गुरुवारी त्यांची एकूण संपत्ती $1.24 अब्ज म्हणजेच सुमारे 10,328 कोटी रुपयांनी घसरली. त्यांची एकूण संपत्ती आता 13.1 अब्ज डॉलर्स आहे. उदय कोटक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 155 व्या क्रमांकावर आले आहे.
बँकेचे मार्केट कॅप झाले कमी
उदय कोटक यांची संपत्ती या वर्षी एकूण $1.52 अब्जने घसरली आहे. उदय कोटक यांची कोटक महिंद्रा बँकेत 25.71 टक्के भागीदारी आहे. शेअर्सच्या घसरणीमुळे बँकेचे मार्केट कॅप 39,768.36 कोटी रुपयांनी घसरून 3,26,615.40 कोटी रुपयांवर आले. बीएसई आणि एनएसई या दोन्ही ठिकाणी कंपनीचे शेअर्स सर्वाधिक घसरले.
ॲक्सिस बँक आली पुढे
कोटक बँकेच्या नुकसानीचा परिणाम बँकेने आपले चौथे स्थान गमावले आहे. आता बाजार मूल्याच्या दृष्टीने ॲक्सिस बँक ही देशातील चौथी सर्वात मौल्यवान बँक ठरली. ॲक्सिस बँकेचे कॅपिटल 3,48,014.45 कोटी रुपये होता. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बाजार भांडवलानुसार तीन सर्वात मौल्यवान बँका आहेत. त्यानंतर कोटक बँक होती. आता ॲक्सिस बँक झाली आहे.