Fixed Deposit Rates : विविध बँकांच्या FD च्या व्याजदरात बदल, काही महिन्यात दुप्पट होतील पैसे

विविध बँकांचे एफडी दर हे वेगवेगळे असतात. हे दर गुंतवणूकीचा कालावधी, रक्कम आणि गुंतवणूक करणार्‍या व्यक्तीवर अवलंबून असतात. (latest Fixed deposit Bank rates)

Fixed Deposit Rates : विविध बँकांच्या FD च्या व्याजदरात बदल, काही महिन्यात दुप्पट होतील पैसे
लॉकडाऊनमध्ये पैशांची गरज असेल तर ऑनलाईन बंद करा एफडी; 2 मिनिटांत ट्रान्सफर करा पैसे
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 10:40 AM

मुंबई : पैशांची बचत करण्यासाठी अनेकांची पहिली पसंती ही फिक्‍स्‍ड डिपॉझिट (Fixed Deposit) या योजनेला असते. तुमच्या मुदत ठेवींवर मिळणारा परतावा आणि सुरक्षा या दोन कारणांमुळे अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. आपण एकदा एफडीमध्ये पैसे गुतंवले तर त्यानंतर निश्चित कालावधीसाठी त्या मूळ किंमतीवर निश्चित दराने व्याज जमा होतो. अनेक बँकांचे एफडी दर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) चलनविषयक धोरणावर अवलंबून असतात. (latest Fixed deposit Bank rates)

विविध बँकांचे एफडी दर हे वेगवेगळे असतात. हे दर गुंतवणूकीचा कालावधी, रक्कम आणि गुंतवणूक करणार्‍या व्यक्तीवर अवलंबून असतात. सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय देतात.

ICICI बँकेचे एफडी दर

खाजगी क्षेत्रातील ICICI ही बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2.5 टक्क्यांपासून 5.50 टक्के व्याज देते. हे व्याज दर 21 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांना या व्याज दरापेक्षा 50 टक्के अधिक व्याज मिळतो.

एफडीचा कालावधी व्याज दर  
7 दिवस ते 29 दिवसांपर्यंत 2.50%
30 दिवस ते 90 दिवसांपर्यंत 3%
91 दिवस ते 184 दिवसांपर्यंत 3.5%
185 दिवस ते 1 वर्षांहून कमी 4.40%
1 वर्ष ते 18 महिन्यांपर्यंत 4.9%
18 महिने ते 2 वर्षापर्यंत 5%
2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांपर्यंत 5.15%
3 वर्ष एक दिवस ते 5 वर्षांपर्यंत 5.35%
5 वर्ष एक दिवस से 10 वर्षांपर्यंत 5.50%

 SBI बँकेचा FD वरील व्याजदर

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षाच्या कालावधीसाठी 2.9 टक्के ते 5.4 टक्के दराने व्याज देत आहे. या बँकेत ज्येष्ठ नागरिकांना 50 बेस पॉईंटपेक्षा अधिक दराने व्याज मिळतो. हे नवीन दर 8 जून 2021 पासून लागू केले जाणार आहेत.

एफडीचा कालावधी व्याज दर 
7 दिवस ते 45 दिवसांपर्यंत 2.9%
46 दिवस ते 19 दिवसांपर्यंत 3.9%
180 दिवस ते 1 वर्षांहून कमी 4.4%
1 वर्ष ते दोन वर्षांपर्यंत 5%
2 वर्ष ते 3 वर्षाहून कमी  5.1%
3 वर्ष ते 5 वर्षाहून कमी 5.3%
5 वर्ष ते 10 वर्ष  5.4%

HDFC बँकेचा नवी व्याजदर

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (Fixed Deposit) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. HDFC ने एफडी (FD) च्या व्याजदरात बदल केला आहे. या नव्या बदलानुसार एचडीएफसी बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या ठेवींवर 2.50 टक्के आणि 30 ते 90 दिवसांच्या एफडीवर 3 टक्के व्याज देत आहे.

एफडीचा कालावधी ब्‍याज दर
7 दिवस ते 29 दिवसांपर्यंत  2.50%
30 दिवस ते 90 दिवसांपर्यंत  3%
91 दिवस ते 6 महिने  3.5%
6 महिने 1 दिवस ते 1 वर्ष 4.4%
1 वर्ष ते 2 वर्षापर्यंत 4.9%
2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षापर्यंत  5.15%
3 वर्ष 1 दिवस से 5 वर्षापर्यंत  5.30%
5 वर्ष 1 दिवस से 10 वर्षापर्यंत  5.50%

कोटक महिंद्रा बँकचे एफडी व्याजदर

कोटक महिंद्रा बँक ही 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 2.5 टक्क्यांपासून 5.30 टक्के व्याज देते. हे व्याज दर 26 एप्रिल 2021 पासून लागू करण्यात आले आहेत.

एफडीचा कालावधी ब्‍याज दर
7 दिवस ते 30 दिवसांपर्यंत 2.50%
31 दिवस ते 90 दिवसांपर्यंत 2.75%
91 दिवस ते 120 दिवसांपर्यंत  3%
121 दिवस ते 179 दिवसांपर्यंत  3.25%
180 दिवस ते  364 दिवसांपर्यंत  4.40%
365 दिवस ते 389 दिवसांपर्यंत  4.50%
390 दिवस ते 23 महिन्यांपेक्षा कमी  4.80%
23 महिन्यांपासून 3 वर्षांपेक्षा कमी  5%
3 वर्ष ते 4 वर्षांपेक्षा कमी  5.10%
4 वर्ष ते  5 वर्षांपेक्षा कमी  5.25%
5 वर्ष ते 10 वर्षे  5.30%

(latest Fixed deposit Bank rates)

संबंधित बातम्या : 

LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, नवे दर काय?

आजपासून Bank, LPG, Google सह Income Tax नियमात बदल, सर्वसामान्यांवर थेट परिणाम

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.