आयआयएमची डीग्री सोडून दूध विकू लागला, आज आहे पाच हजार कोटीच्या कंपनीचा मालक

बाजारात भेसळयुक्त दूधाची सर्रास विक्री होत असल्याने त्यातून त्याला दूधाचा धंदा करायची कल्पना सुचली त्यातून त्याने दूधाचा ब्रॅंडच स्थापन केला.

आयआयएमची डीग्री सोडून दूध विकू लागला, आज आहे पाच हजार कोटीच्या कंपनीचा मालक
chakradhar gadeImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 4:17 PM

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : कोणताही व्यवसाय करणे तसे धाडसाचे काम असते. परंतू उच्च शिक्षण घेतल्यानंतरही पुन्हा व्यवसायात पडून नशीब आजमाविणारे विरळच. हरियाणाच्या चक्रधर गाडे या तरुणाला आई-वडील नसल्याने एका दाम्पत्याने दत्तक घेतले. त्याला खूप शिकविले. त्याने आयआयएमची डीग्री घेतली. चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्याने दूध विकायला सुरुवात केली. चक्रधर याच्या पालकांनी आधी नाराजी व्यक्त केली. परंतू त्याची जिद्द पाहून त्याच्या मागे उभे राहीले. आज तुम्ही बाजारात कंट्री डीलाईट दूधाचा ब्रॅंड पाहीला असेल त्याच्या निर्मात्याची ही कहानी प्रेरणादायी आहे. चक्रधर याने निव्वळ दूधाच्या विक्रीवर पाच हजार कोटीचे साम्राज्य उभे केले आहे.

चक्रधर गाडे याला साल 2004 मध्ये इंजिनिअरिंग केल्यावर इन्फोसिसची नोकरी मिळाली. एक वर्षभर काम केल्यानंतर त्याने नोकरी सोडली. त्याने नंतर इंदूरहून आयआयएम पूर्ण केले. त्यानंतर इन्डक्स कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये व्हाईस प्रेसिडंट पदाची लाखो रुपयांची नोकरी मिळाली. सहा वर्षे काम केल्यानंतर त्यांनी मन न रमल्याने नोकरी सोडली, त्यानंतर त्याची ओळख नितीन कौशल याच्याशी झाली. त्यानंतर त्यांनी बिझनेस सुरु करण्याचा निर्णय घेतला.

घरोघर फ्रेश दूधाचा पुरवठा

दिल्ली – एनसीआरमध्ये भेसळयुक्त दूधाचा पुरवठा होत होता. त्याने नितीन या मित्राच्या सोबत दोन वर्षे लोकांच्या घरी फ्रेश दूध पुरविण्याचा व्यवसाय सुरु केला. साल 2013 मध्ये कंट्री डीलाईट ब्रॅंड सुरु केला. लोकांचा प्रतिसाद आणि सूचना कळाव्यात यासाठी ते स्वत: दूध पोहचवायला लोकांची घरी जात असत. दूधाच्या भेसळीने लोक त्रस्त आहेत, हे पाहून त्यांनी शेतकऱ्यांकडून थेट दूधाच्या कस्टमरकडे दूध पोहचवायला सुरुवात केली.

15 शहरात व्यवसाय सुरु

सुरुवातीला पार्ट टाईम दूध विकणाऱ्या चक्रधर याने नंतर 2015 नोकरी सोडून संपूर्ण व्यवसायात लक्ष घातले. शेतकऱ्यांकडील दूध विकत घेऊन ते 24 ते 48 तासात ग्राहकांच्या घरी पोहचवायला सुरुवात केली. लोकांना कंट्री डीलाईट दूध पसंत पडू लागले. त्यानंतर कंट्रीलाईट मोबाईल एपद्वारे दूधासोबत भाजी, फळे, पनीर, दही बेकरी प्रोडक्ट विकायला सुरुवात केली. एका महिन्यात ते पाच कोटी ऑर्डर डीलिव्हरी करतात. त्यांच्याकडे सहा हजाराहून अधिक डीलीव्हरी पार्टनर आहेत. देशातील पंधरा शहरात कंट्री डीलाईटचा व्यवसाय सुरु आहे. त्यांना साल 2022 मध्ये सहाशे कोटीचा महसूल मिळाला. आज कंट्री डीलाईटचे मार्केट वॅल्यू 615 मिलियन डॉलरपर्यंत पोहचले आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.