AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर भरण्याच्या मुदतवाढीस नकार; आयकर विभागाला कायदेशीर नोटीस, ओडिशा टॅक्स अॅडव्होकेट असोसिएशनने धरला विभागाच्या तांत्रिक चुकांवर नेम 

प्राप्तीकर खात्याने आयकर भरण्यास मुदत वाढ न दिल्याने ओडिशा टॅक्स अॅडव्होकेट असोसिएशनने विभागाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. आयकर विभागाच्या पोर्टलवरील तांत्रिक चुकांचा पाढा वाचत असोसिएशनने प्राप्तिकर खात्याला आरसा दाखविला आहे. तसेच करदात्यांकडून जमा केलेले विलंब शुल्क त्यांना परत करण्याचे आवाहन केले आहे. 

कर भरण्याच्या मुदतवाढीस नकार; आयकर विभागाला कायदेशीर नोटीस, ओडिशा टॅक्स अॅडव्होकेट असोसिएशनने धरला विभागाच्या तांत्रिक चुकांवर नेम 
it return
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 8:06 AM

मुंबई : प्राप्तिकर खात्याला ऑल ओडिशा टॅक्स अॅडव्होकेट असोसिएशनने  (All Odisha Tax Advocates Association (AOTAA)) आरसा दाखविला. करदात्यांना कर ( ITR) भरण्यास मुदत वाढ नाकारल्याने तसेच केंद्रीय थेट कर मंडळाने (CBDT) करदात्यांवर विलंब शुल्क आणि दंड लादण्याच्या भूमिकेला असोसिएशनने खरमरती उत्तर दिले आहे. असोसिएशनने मंडळाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. प्राप्तिकर खाते कायदा, 1961 मधील कलम 234 एफ नुसार करदात्यांवर दंड लादण्यात आला आहे.  ओडिशा राज्यात पुर परिस्थिती, वादळे, विद्युत पुरवठा खंडीत होणे तसेच प्राप्तीकर खात्याच्या पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे अनेक करदात्यांना कर भरताना अडचणींचा सामना करावा लागला असताना प्राप्तीकर खात्याने याचा सहानुभूतीपूर्वक विचार न करता हेकेखोर वृत्तीने मुदतवाढ नाकारल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे.

तर कोर्टात खेचणार 

अॅडव्होकेट असोसिएशन प्राप्तीकर खात्याच्या भूमिकेवर जाम नाराज आहे. आयकर खात्याने अथवा केंद्रीय थेट कर मंडळाने योग्य ती भूमिका घेतली नाही. हेकेखोरपणा सोडला नाही तर त्यांना कोर्टात खेचण्याची तयारी सुरु केली आहे. आयकर विभाग हा चांगला विभाग आहे. लोकांच्या अडचणींचा ते सहानुभूतीने विचार करतील आणि आयटीआर आणि त्यासोबतच टॅक्स ऑडिट रिपोर्ट भरण्याची मुदत 31 मार्च 2022 रोजी पर्यंत वाढवतील अशी आशा आहे. त्यांनी करदात्यांची भूमिका अमान्य केल्यास आयकर विभागाविरोधात ओडिशा उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे दाद मागण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका असोसिएशनने घेतली आहे. आयकर विभागाच्या तांत्रिक चुका समोर करत करदात्यांना आयटीआर भरण्याची मुदतवाढ द्या आणि कलम 234 एफ द्वारे जमा केलेले विलंब शुल्क परत करण्याची विनंती हायकोर्टाला करणार असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.

दोनदा मुदतवाढ तरीही करदाते हैराण 

आयकर भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 ही होती. त्यानंतर आयकर विभागाने आयटीआर भरण्यास मुदत वाढ देण्यास नकार घंटा वाजवली. त्यामुळे अनेक करदात्यांचा हिरमोड झाला. यापूर्वी दोन वेळा आयकर भरण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. पण पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा करदाते दिवस-दिवस बसूनही त्यांना आयटीआर अर्ज अपलोड करता आला नाही. करदात्यांनी सरत्या वर्षाच्या एक आठवड्यापूर्वीच ट्वीटरवर आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यासाठी ट्रेंड सुरु केला होता. पण त्याचा काही एक परिणाम झाला नाही.

किती दंड लागणार

जर तुम्ही ही आयटीआर भरण्यात अपयशी ठरला असाल तर आयकर खात्याच्या नियमानुसार, आता तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत दंड बसू शकतो. 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणा-या करदात्यांना 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे. 31 डिसेंबरपर्यंत देशात 5.89 कोटी करदात्यांनी कराचा भरणा केला आहे.

इतर बातम्या :

GDP मीटर : नव्या व्हेरियंटची मार्केटला धास्ती, अर्थचक्राच्या गतीला ‘ओमिक्रॉन’मुळं ब्रेक?

गृहकर्ज हस्तांतरण करणे बचतीचे आणि फायदेशीर, ‘अशी’ आहे एसबीआयची व्यवहारिक आकडेमोड

Income Tax Return : चुकीला ‘एकदा’ माफी; 31 डिसेंबरची मुदत टळली, तुमच्यासमोरीला ‘हा’ पर्याय!

ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
युद्धाच्या मोहिमेवर दुश्मनांना..; मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा.
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री
दुश्मनांना मातीत गाडणंही भारताला जमत, मोदींनी सैन्याला दिली त्रिसूत्री.