Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LEGO : लेगो प्‍ले आणि लेगो लव्‍ह टू इंडियाच्या 90वा वर्धापनदिनानिमित्त विशेष उपक्रम, जाणून घ्या…

ऑगस्टपासून 2 महिन्यांहून अधिक काळ चालणार्‍या सणासुदीच्‍या कालावधीत धमाल खेळाच्या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून लेगो® ग्रुप आपल्या जीवनातील खेळाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्‍न करतो. नेमका काय उपक्रम घेणार जाणून घ्या...

LEGO : लेगो प्‍ले आणि लेगो लव्‍ह टू इंडियाच्या 90वा वर्धापनदिनानिमित्त विशेष उपक्रम, जाणून घ्या...
विशेष उपक्रमImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 9:45 AM

मुंबई : नव्वद वर्षांपूर्वी एका डॅनिश सुताराने त्याच्या बिलंड, डेन्मार्क येथील कार्यशाळेत लहान लाकडी खेळण्यांची एक लाइन (Line) तयार केली. त्याच्या पहिल्या संग्रहात साधारण 36 वस्तू होत्या, ज्‍यामध्‍ये कार, विमाने व योयो चकती यांचा समावेश होता. या सर्व वस्‍तू स्थानिक मुलांना जगाबद्दल जाणून घेण्यात मदत करण्यासाठी काळजीपूर्वक तयार करण्‍यात आल्‍या होत्या. 1932 मध्ये ओले कर्क क्रिस्टियनसेनला माहित नव्हते की, लेगो® (LEGO) ग्रुप (Group) जगातील सर्वात मोठ्या खेळण्यांच्या कंपन्यांपैकी एक बनेल आणि लाखो मुलांना दरवर्षी खेळण्यासाठी प्रेरित करेल. ओलेने त्याचे पहिले लाकडी खेळणी बनवल्यानंतर सव्वीस वर्षांनी त्याचा मुलगा गॉडफ्रेड याने लेगो® विटाचे पेटंट घेतले, जे आज आपल्‍याला माहित आहे. त्याची इंटरलॉकिंग ट्यूब सिस्टिम अनेक सर्जनशील निर्माण क्षमता देते, तेव्हापासून लेगो® ब्रिक व्यस्त आहे. प्राथमिक रंगांच्या काही सोप्या ब्रिक्समधून सर्वोत्तम विटांनी 18,000 हून अधिक लेगो उत्पादनांचा आधार बनवला आहे

‘द लेगो मूव्‍ही™’च्‍या माध्‍यमातून हॉलिवूडमध्‍ये स्‍थान मिळवले आहे, मुलांना लेगो® माइण्‍डस्‍टॉर्म्‍स®द्वारे रोबोटिक्स व कोडिंगबद्दल शिकण्यास आणि 180 हून अधिक लेगो® व्हिडिओ गेम्‍समध्‍ये काही तास उत्‍साहपूर्ण डिजिटल साहसांचा आनंद घेण्‍यास मदत केली आहे. खरेतर, ‘लेगो’ हे नाव दोन डॅनिश शब्द ‘लेग गोड्ट’मधून आले आहे, ज्‍याचा अर्थ ‘प्‍ले वेल’ असा होता. आणि आपल्‍या 90व्‍या वर्धापन दिन साजरीकरणाचा भाग म्‍हणून अनेक प्‍ले उपक्रमांच्‍या माध्‍यमातून उत्तमप्रकारे खेळण्‍याच्‍या उत्‍साहाला प्रशंसित करण्‍याची लेगो® ब्रॅण्‍डला आशा आहे. यामध्‍ये त्‍यांची उत्‍साहपूर्ण ब्रॅण्‍ड जाहिरात ‘वी आर ऑल बिल्‍डर्स’चे लाँच, अनेक प्रभावक सहयोगांच्‍या माध्‍यमातून खेळाच्‍या महत्त्वाला प्रशंसित करणे, लेगो® इंडियाचा सर्वात मोठा प्‍ले इव्‍हेण्‍ट, पहिलाच लेगो® प्‍लेग्राऊंडसह अनेक धमाल उपक्रम, आवडीनुसार खेळ, क्रिएटिव्‍हीटी कॉर्नर्स, लेगो® स्‍पीड चॅम्पियन्‍स एरिना, मिनिफिगर मॅस्‍कट मीट अॅण्‍ड ग्रीट्स, अनेक लेगो® गूडीज, अविरत खेळ आणि खास आकर्षण – आपल्‍या मोहक देशाच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या 75 वर्षपूर्तीला मानवंदना ‘द लार्जेस्‍ट इंडीपेण्‍डन्‍स डे लेगो® ग्रॅफि‍टी वॉल यांचा समावेश आहे. पहिला लेगो® प्‍लेग्राऊंड 12 ऑगस्‍ट ते 21 ऑगस्‍टपर्यंत मुंबईतील आर सिटी मॉल येथे स्‍थापित करण्‍यात येईल, तर सप्‍टेंबरमध्‍ये लेगो® प्‍लेग्राऊंड दिल्‍ली व बेंगळुरू येथे स्‍थापित करण्‍यात येईल.

ऑगस्टपासून 2 महिन्यांहून अधिक काळ चालणार्‍या सणासुदीच्‍या कालावधीत धमाल खेळाच्या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून लेगो® ग्रुप आपल्या जीवनातील खेळाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्‍न करतो! खरेतर, जगभरातील 35 देशांमधील 55,000 पालक व मुलांचे खेळाबाबतच्‍या मतासंदर्भात केलेल्‍या संशोधानामधून निदर्शनास येते की, 90 टक्‍के भारतीय मुलांनी त्यांच्या पालकांसोबत अधिक खेळण्याची इच्छा व्यक्‍त केली. मुलांच्या विकासात खेळाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर पालकांचाही विश्‍वास आहे आणि संशोधनामधून निदर्शनास आले की, जवळ-जवळ सर्व पालकांना वाटते की मुले खेळताना त्यांची सर्जनशीलता (93 टक्‍के), संवाद (92 टक्‍के), समस्या सोडवण्याची कौशल्ये (92 टक्‍के) आणि आत्मविश्‍वास (91 टक्‍के) मजबूत करतात. मुले खेळतात तेव्हा त्यांच्यात अशी कौशल्ये विकसित होतात, जी त्यांना वेगाने बदलणार्‍या जगात तग धरून राहण्‍यास मदत करतात!

हे सुद्धा वाचा

अधिकाधिक खेळण्‍याची गरज

“माझ्या आजोबांनी 90 वर्षांपूर्वी कंपनीची स्थापना केली, तेव्हा त्यांनी ओळखले की खेळामुळे मुलांचे जीवन बदलू शकते. तसेच खेळ कुटुंबांना एकत्र आणतात आणि मुलांना कौशल्ये विकसित करण्यास मदत करतात, ज्यामुळे ते त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचू शकतात. त्यांच्याकडे फक्‍त एक लहान कार्यशाळा होती, पण खेळामुळे होणारे फायदे जास्तीत-जास्त मुलांना अनुभवता यावे ही त्‍यांची मोठी महत्त्वाकांक्षा होती,” असे लेगो ग्रुपचे अध्‍यक्ष थॉमस कर्क क्रिस्टियनसेन म्हणाले. “1932 असो, 2022 असो किंवा 2031 मध्ये आमचा 100व्या वर्धापन दिन असो, आम्ही सर्व कुटुंबांना ते जगात कुठेही असले तरी त्यांना चांगले खेळण्यासाठी मदत करून हा वारसा पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्‍न करतो.”

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.