LIC ची कॅन्सर कव्हर पॉलिसी काय आहे? तुम्हाला काय फायदा मिळणार?
या पॉलिसीची विषेशता म्हणजे ही तुम्हाला कॅन्सरपासून सुरक्षा देते. एलआयसीचा कॅन्सर कव्हर प्लान रेग्युलर प्रिमिअम प्लान आहे.
नवी दिल्ली : सध्याच्या परिस्थितीत आजारांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो (LIC Cancer Cover Plan). गंभीर आजाराच्या उपचारासाठी लोकांच्या त्यांची आयुष्यभराची कमाई खर्च होते. कर्करोगासरख्या गंभीर आजापासून बचावासाठी एलआयसी (LIC) एक कॅन्सर कव्हर प्लान (Cancer Cover Plan) देते. या पॉलिसीची विषेशता म्हणजे ही तुम्हाला कॅन्सरपासून सुरक्षा देते. एलआयसीचा कॅन्सर कव्हर प्लान रेग्युलर प्रिमिअम प्लान आहे. जास्तकरुन हेल्थ इन्श्यूरन्स देणाऱ्या कंपन्या कर्करोगासारख्या आजाराच्या उपचारावर कव्हर देतात (LIC Cancer Cover Plan).
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगमचा (LIC) कॅन्सर कव्हर प्लान हा रेग्युलक प्रिमिअम प्लान आहे. याअंतर्गत तुम्हाला विम्याचा हप्ता वार्षिक किंवा सहा महिने असा द्यावा लागते. या विम्याचा कालावधी 10 -30 वर्षांचा असेल. कॅन्सर आजार झाल्यावरच या पॉलिसीचा फायदा मिळेल. यामध्ये कुठलीही मॅच्युरिटी नाही. सोबतच यावर तुम्ही कर्ज घेऊ शकत नाही.
दोन पर्याय मिळतात
कॅन्सर कव्हर प्लानअंतर्गत दोन लाभ पर्याय देण्यात आले आहेत जे तुम्ही तुमच्या सुविधेनुसार खरेदी करु शकतात.
पहिला पर्याय – Level Sum Insured आहे. यामध्ये इन्श्यूरन्सच्या सुरुवातीलाच याची रक्कम निश्चित होऊन जाते. कुठल्याही परिस्थितीत यापेक्षा जास्तची रक्कम मिळणार नाही.
दूसरा पर्याय – Increasing Sum Insured आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी बेसिक सम इन्श्योर्डचा 10 टक्के सम इन्श्योर्ड वाढून जाते.
योग्यता
>> ही पॉलिसी घेण्यासाठी कमीत कमी वय : 20 वर्ष
>> पॉलिसी घेण्यासाठी जास्तीत जास्त वय : 65 वर्ष
>> पॉलिसीची किमान मुदत : 10 वर्ष
>> पॉलिसीची जास्तीत जास्त मुदत : 30 वर्ष
>> मॅच्युरिटीच्या वेळी कमीत कमी वय : 50 वर्ष
>> मॅच्युरिटीच्या वेळी जास्तीत जास्त वय : 75 वर्ष
>> किमान प्रीमिअम : 2400 रुपये
>> किमान बेसिक सम इन्श्योर्ड : 10 लाख रुपये
>> सर्वाधिक बेसिक सम इ्नश्योर्ड: 50 लाख रुपये
Early Stage Cancer पॉलिसी घेण्याचे फायदे
सम इन्श्योर्डची 25 टक्के पॉलिसी ग्राहकाला देईल. पुढील 3 वर्षांचं प्रीमियम माफ केलं जाईल. तुम्ही Early Stage Cancer बेनिफिट पूर्ण पॉलिसी फक्त एकदाच घेऊ शकता. जेव्हा तुम्हाला Early Stage Cancer चा डायग्नोसिस होतं, तेव्हा पॉलिसीमधून काहीही मिळणार नाही (LIC Cancer Cover Plan).
Major Stage Cancer कव्हर घेण्याचे फायदे
जर कॅन्सर हा आजार मेजर स्टेजवर कळाला तर, इन्श्योरन्सची पूर्ण रकम LIC कडून दिली जाईल. जी उपचारादरम्यान महत्त्वाची ठरु शकते. जर सुरुवातीला तुम्ही कुठला क्लेम केला तर तेवढी रक्कम कापून तुम्हाला रक्कम मिळेल. त्याशिवाय कुठलाही हप्ता भरावा लागणार नाही.
क्रिटिकल इलनेस प्लान आणि कॅन्सर कव्हर प्लानमध्ये काय फरक?
क्रिटिकल इलनेस कव्हर गंभीर आजार जसे स्ट्रोक, प्रमुख अंग प्रत्यारोपण, लकवा, कार्डिअॅक अरेस्ट, मल्टीपल स्केलेरोसिस, किडनी फेल्युअर, टोटल ब्लाइन्डनेस, बहिरेपणा इत्यादी महाग आजारांसाठी कव्हर देते, ज्यामध्ये काही प्रकारच्या जीवघेण्या कॅन्सरचाही समावेश आहे. तर, एक रेग्युलर कॅन्सर इन्श्योरन्स प्लान पॉलिसीधारकद्वारे कव्हर करण्यात आलेली गंभीर आजाराची माहिती मिळताच पूर्ण रक्कम देते.
LIC कडे सध्या 30 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम; आपल्या जमा रकमेचे सरकार काय करते?#LICInvested #LICpolicyholders https://t.co/hxxLXzMKfq
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 3, 2021
LIC Cancer Cover Plan
संबंधित बातम्या :
पोस्टात 60 हजार रुपये कमावण्याची सुवर्णसंधी; जबरदस्त फायदा आणि बरंच काही….
विमा पॉलिसी खरेदी करणार्यांसाठी मोठी बातमी! लवकरच नवा नियम, काय आहे युलिप योजना
LIC चा IPO लवकरच; एअर इंडिया आणि BPCL ला कधी विकणार?; मोदी सरकारकडून खुलासा