कमी पैशांत करा मोठी गुंतवणूक; जाणून घ्या, LIC ची खास योजना
LIC निवेश प्लस (LIC Nivesh Plus) ही योजना एकच प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, यूनिट-लिंक्ड आणि वैयक्तिक जीवन विमा पॉलिसी आहे. या पॉलिसीच्या कालावधी दरम्यान, विम्यातदेखील गुंतवणूक करण्याची संधी आहे.

नवी दिल्ली : कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गामुळे अनेकांना भविष्याची चिंता वाटते. अशात प्रत्येकावर आर्थिक अडचण ओढवली आहे. यामुळे बचत (Saving) आणि गुंतवणूक (Investment) करण्याआधी लोक विचारात पडतात. पण आता बचतीची चिंता सोडा. कारण, भारतीय जीवन विमा निगम (Life Insurance Corporation) नागरिकांसाठी एक खास योजना आणली आहे. यामध्ये कमी गुंतवणुकीवर तुम्हाला घसघशीत नफा मिळेल. खरंतर LIC निवेश प्लस (LIC Nivesh Plus) ही योजना एकच प्रीमियम, नॉन पार्टिसिपेटिंग, यूनिट-लिंक्ड आणि वैयक्तिक जीवन विमा पॉलिसी आहे. या पॉलिसीच्या कालावधी दरम्यान, विम्यातदेखील गुंतवणूक करण्याची संधी आहे. (lic Investment nivesh plus scheme Know benefits and features)
मूलभूत रकमेची निवड करण्याचा पर्याय LICच्या यो योजनेचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ऑफलाइन सोबतच ही ऑनलाइनदेखील खरेदी करता येते. पॉलिसी घेणाऱ्या या योजनेत मूलभूत रकमेची निवड करण्याचा पर्याय आहे. विमाच्या रकमेचा पर्याय सिंगल प्रीमियमच्या 1.25 पट किंवा सिंगल प्रीमियमच्या 10 पट आहेत.
पात्रता LIC निवेश प्लस योजनेअंतर्गत किमान प्रवश वय 90 दिवस ते 70 वर्ष आहे.
मुदत आणि प्रीमियम लिमिट पॉलिसीची मुदत 10 ते 35 वर्ष आहे तर लॉक-इन पीरियड 5 वर्ष आहे. प्रीमियमवर कमीत कमी लिमिट 1 लाख रुपये आहे तर याची जास्तीत जास्त लिमिट देण्यातच आलेली नाही. मॅच्युअरिटी वय 85 वर्ष आहे.
मॅच्युअरिटीचे फायदे जर पॉलिसी होल्डर पॉलिसी टर्मपर्यंत जिवंत राहतो, तर त्याला मॅच्युअरिटीचे खूप फायदे मिळतात. जे यूनिट फंड किंमतीच्या बरोबर असतो. पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर ही रक्कम दिली जाते. (lic Investment nivesh plus scheme Know benefits and features)
फ्री-लुक पीरियड या योजनेत कंपनी तुम्हाला फ्री-लुक पीरियड देते. यामध्ये ग्राहक पॉलिसी हवी तेव्हा परत करू शकतात. जर कंपनीकडून पॉलिसी सरळ विकत घेतली गेली तर 15 दिवसांत ती ऑनलाइन खरेदी केली जाते. यानंतर 30 दिवसांचा फ्री-लुक प्रीरियड लागू होतो.
डेथ बेनिफिट जर पॉलिसीच्या कालावधी वेळी विमा धारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला डेथ बेनिफिट मिळतात. पॉलिसी धारकाच जर जोखिम सुरू होण्याच्या तारखेआधीच मृत्यू झाला तर त्याला यूनिट फंड रकमेच्या बरोबरीची रक्कम दिली जाते.
आंशिक पैसे काढण्याची परवानगी LIC निवेश प्लस प्लानमध्ये कंपनी ग्राहकांना 6व्या पॉलिसी वर्षानंतर ग्राहकांना आंशिक पैसे काढण्याची परवानगी देते. अल्पवयीन मुलांच्या बाबतीत, 18 वर्षांच्या वयानंतर अंशतः पैसे काढण्याची परवानगी आहे.
इतर बातम्या –
5 लाख देऊन ऑनलाइन मागवलं मांजराचं पिल्लू, बॉक्स उघडताच फुटला घाम
Fact Check : केंद्र सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार 90 हजार रुपये?, वाचा काय आहे सत्य
VIDEO : Navi Mumbai | मनसेच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा #NaviMumbai #MNS pic.twitter.com/cMjeo8ksLp
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2020
(lic Investment nivesh plus scheme Know benefits and features)