LIC IPO : एलआयसी आयपीओचं काऊटडाऊन सुरू; आयपीओमधील गुंतवणूक फायदेशीर राहू शकते? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

एलआयसीच्या आयपीओचं (LIC IPO) काऊटडाऊन सुरू झालंय. चार मे रोजी एलआयसीचा आयपीओ बाजारात दाखल होत आहे. मात्र अद्यापही या आयपीओबाबत गुंतवणूकदारांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तज्ज्ञांचे मत जाणून घ्या.

LIC IPO : एलआयसी आयपीओचं काऊटडाऊन सुरू; आयपीओमधील गुंतवणूक फायदेशीर राहू शकते? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Follow us
| Updated on: May 02, 2022 | 5:30 AM

एलआयसी आयपीओचं (LIC IPO) काऊटडाऊन सुरू झालंय. सगळ्यात मोठ्या आयपीओची शेअर बाजारात (stock market) लिस्टिंग करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. एलआयसीचं (LIC) मूल्यांकन खूपचं चांगलं असल्यानं गुंतवणूकदार आयपीओवर तुटून पडतील असा बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. एलआयसीमध्ये अल्प कालावधीत पैसे दुप्पट होण्याचाही शक्यता आहे. तुम्हीही एलआयसी आयपीओमध्ये गुंतवणूक करणार असाल तर त्यातील बारकावे समजाऊन घ्या. एलआयसीचा आयपीओ 4 मे रोजी खुला होणार आहे, तर 9 मे रोजी बंद होणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी आयपीओचं सबसक्रिप्शन तीन दिवस असते. मात्र, बाजारातील चढ-उतार आणि आयपीओचा मोठा आकार पाहून एक दिवस अतिरिक्त म्हणजेच चार दिवस सबसक्रिप्शन मिळणार आहे, अशी माहिती अनलिस्टेडचे फाऊंडर अभय दोशी यांनी दिलीये.

कर्मचारी, विमाधारकांसाठी सूट

एलआयसीच्या प्रति शेअर्सची किंमत 902 ते 949 रुपये निश्चित करण्यात आलीये. किरकोळ गुंतवणूकदार आणि एलआयसीच्या कर्मचाऱ्यांसाठी 45 रुपयांची सूट देण्यात आलीये. तर पॉलिसीधारकांना 60 रुपयांची सूट देण्यात आलीये. आयपीओमध्ये गुंतवणूकीसाठी एका लॉटमधील किमान 15 शेअर्स खरेदी करावे लागतील. 15 शेअर्ससाठी किमान 14,235 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. किरकोळ गुंतवणूकदार कमाल 14 लॉटसाठी गुंतवणूक करू शकतात. आयपीओमध्ये 50 टक्के हिस्सा हा संस्थागत गुंतवणूकदारांसाठी ठेवण्यात आलाय. तर 15 टक्के हिस्सा मोठ्या गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलाय. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. 30 कोटी पॉलिसीधारकांना 10 टक्के आणि कर्मचाऱ्यांना 0.7 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आलाय. एलआयसीमधील सरकार 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे, म्हणजेच एकूण 22 कोटी शेअर्स जारी करण्यात येणार आहेत. एलआयसीच्या आयपीओतून सरकारला 21,000 कोटी रुपयांची कमाई होणार आहे.

तज्ज्ञांचा सल्ला

एलआयसीची लिस्टिंग 949 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीवर झाल्यास एलआयसीचं एकूण बाजार मूल्य 6 लाख कोटी रुपयांच्यावर पोहोचू शकतं. आयपीओची लिस्टिंग 17 मे रोजी होण्याची शक्यता आहे. एलआयसी आयपीओची लिस्टिंग प्रीमियम किंमतीत होईल का ? गुंतवणूक करावी का ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. एलआयसीचं मूल्याकंन खूप चांगलं आहे. बाजारातील इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहे. येत्या 10 ते 12 वर्षात एलआयसीची मालमत्ता कित्येक पटीनं वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास चांगला नफा कमावता येऊ शकतो, असं मत चोकसी ब्रोकिंग कंपनीचे एमडी देवेन चोकसी यांनी व्यक्त केलंय. बाजारातील लिस्टेड कंपन्यां त्यांच्या एम्बेडेड मूल्याच्या तुलनेत तीन ते चार पटीत व्यवसाय करत आहेत. मू्ल्यांकनाच्या दृष्टीनं विचार केल्यास एलआयसीचा 1.1 पटीतील मूल्यांकन गुंतवणुकीसाठी खूपच फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.