LIC Share : एलआयसीची रॉकेट भरारी! असा गाठला सात महिन्यातील रेकॉर्ड

LIC Share : एलआयसीच्या शेअरमध्ये सातत्याने चौथ्या दिवशी उसळी घेतली. बुधवारी व्यापारी सत्रात या शेअरमध्ये 4.5 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली. गौतम अदानी समूहाविरोधात हिंडनबर्गनंतर आणखी एका अमेरिकन फर्मने आवाज उठवल्यावर एलआयसीला फटका बसला होता.

LIC Share : एलआयसीची रॉकेट भरारी! असा गाठला सात महिन्यातील रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 6:33 PM

नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या (LIC) शेअरमध्ये सातत्याने चौथ्या दिवशी तेजी दिसून आली. सध्या एलआयसीच्या शेअरने सात महिन्यातील उच्चांक गाठला आहे. बीएसईवरील व्यापारी सत्रात हा शेअर 4.5 टक्क्यांसह वधारला. हा शेअर 690 रुपयांवर पोहचला आहे. किंमतीसोबत एलआयसीचा व्हॅल्यूम पण वधारला आहे. 27 जानेवारी, 2023 रोजी नंतर हा शेअर उच्चांकावर पोहचला आहे. आजच्या तेजीसह कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या निच्चांकी स्तरावरुन 30 टक्के उसळला. 29 मार्च 2023 रोजी 530.20 रुपयांवर हा शेअर होता. या शेअरची सर्वात उच्चांकी कामगिरी 918.95 रुपये आहे. गेल्या वर्षी 20 डिसेंबर 2023 रोजी एलआयसीच्या शेअरने (LIC Share) ही कामगिरी बजावली होती. सध्या गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या समूहावर पुन्हा आरोपांचे बालंट आले आहे. हिंडनबर्ग अहवालानंतर दुसऱ्या अमेरिकन फर्मने त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यावेळी एलआयसीला मोठा फटका बसला होता.

तीन महिन्यांत 14 टक्क्यांची तेजी

एलआयसीच्या शेअरमध्ये गेल्या तीन महिन्यांत 14 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. यावर्षात एलआयसीच्या शेअरला मोठी कामगिरी बजावता आली नाही. पण गेल्या तीन महिन्यात या शेअरने चांगला पल्ला गाठला आहे. एका वर्षांत या शेअरने पाच टक्क्यांचा परतावा दिला आहे. एलआयसीच्या व्यवस्थापनाने विमा विक्रीसाठी काही नवीन तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला आहे. त्याचा परिणाम दिसून येत आहे. काही तज्ज्ञांनी एलआयसी शेअरसाठी 917 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे.

हे सुद्धा वाचा

वेलस्पनने केली विक्री

वेलस्पन कॉर्पने (Welspun Corp) एलआयसी कंपनीतील मोठा हिस्सा विक्री केला. गेल्या दहा महिन्यात या कंपनीने एलआयसीमधील 2.05 टक्क्यांचा हिस्सा विकला. वेलस्पन ग्रुपने त्यांची हिस्सेदारी 7.252% हून घटवून 5.202% केली आहे. 10 नोव्हेंबर 2022 ते 4 सप्टेंबर 2023 या कालावधीत या समूहाने एलआयसीतील 53,62,088 इक्विटी शेअरची विक्री केली आहे. यावर्षी वेलस्पनच्या शेअरमध्ये 45 टक्क्यांची तेजी आली आहे. गेल्या तीन महिन्यात हा शेअर 27 टक्क्यांनी तर एक वर्षांत हा शेअर 36 टक्क्यांनी वधारला आहे.

एलआयसी बसला फटका

अदानी समूहाला गेल्या आठवड्यात 35,000 कोटींचा फटका बसला होता. रुपयांच्या या नुकसानीत एलआयसी पण एकाच सत्रात 1,439.8 कोटी रुपयांचा वाटा आहे. एलआयसीला इतका फटका बसला आहे. LIC ने अदानी समूहातील सहा कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. डाटानुसार, 30 जून रोजी एलआयसीकडे अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिकमध्ये 9.12 टक्के, अदानी इंटरप्राईजेसमध्ये 4.26 टक्के, अदानी टोटल गॅस, एससीसी आणि अंबुजा सिमेंट्समध्ये 6 टक्क्यांहून अधिकचा वाटा आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.