LIC shares : एलआयसीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली; शेअर्समधील घसरण कधी थांबणार?, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

एलआयसीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढलीये, अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला.

LIC shares : एलआयसीने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली; शेअर्समधील घसरण कधी थांबणार?, जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 2:55 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीत (LIC) गुंतवणूक (Investment) केलेले गुंतवणूकदार निराश आहेत. आयपीओमध्ये (IPO) शेअर्स मिळाल्यानंतर नफा बूक करून बाहेर पडण्याची संधी मिळालीच नाही. आयपीओ आल्यानंतर एलआयचीच्या शेअर्सची किंमत 900 रुपये झालीच नाही. कंपनीनं प्रति शेअर दीड रुपयांच्या लाभांशाची घोषणा केली. म्हणजेच ज्यांना 15 शेअर्स मिळाले आहेत त्यांना 22 रुपये 50 पैसे डिव्हिडंट मिळणार आहे. बाजार संकटात आला असताना एलआयसी संकटमोचक म्हणून काम करत होती. सरकारी कंपन्यांचा आयपीओ असू दे किंवा परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री असो एलआयसी प्रत्येक वेळी बाजाराला सांभाळून घेत असे. आता गुंतवणूकदार एलआयसीमध्ये गुंतवणूक करायला पुढे येत नाहीत, त्यामुळे एलआयसीला कोण बाहेर काढणार हा खरा प्रश्न आहे.

शेअर्समध्ये घसरण सुरूच

कंपनीला सहाय्याची गरज आहे. सुरुवातीला लिस्टिंग डिस्काऊंटमध्ये झाली त्यानंतर सतत शेअर्समध्ये घसरण सुरू आहे. त्यातच अपेक्षेप्रमाणं कंपनीचा निकाल सुद्धा लागला नाही. जानेवारी ते मार्च दरम्यान कंपनीच्या निव्वळ नफ्यात 17 टक्क्यांहून जास्त घट झालीये. देशातील अर्ध्यापेक्षा जास्त विमा व्यवसाय एलआयसीच्या हातात आहे, ग्राहकांनी पॉलिसीचे नूतनीकरण न केल्यास नफ्यावर परिणाम होणारच. गेल्या वर्षी 100 पैकी 74 ग्राहक पॉलिसीचे नूतनीकरण करत होते, तो आकडा आता 70 पेक्षा खाली आलाय. एजंटच्या कमिशनवर जास्त खर्च झाल्याची कंपनीनं माहिती दिलीय. त्यातच व्यवस्थापनाचा खर्च 2,800 कोटी रुपये आलाय. कंपनीच्या या खर्चाचा फटका गुंतवणूकदारांना बसलाय.

हे सुद्धा वाचा

दीर्घकाळासाठी गुंतवणूक फायद्याची

मात्र, LIC च्या निकालात सॉलव्हन्सी रेशिओबद्दल सकारात्मक माहिती समोर येत आहे. कंपनी बुडाल्यास गुंतवणूकदारांना पैशांची गॅरंटी मिळते. गेल्या वर्षी मार्च त्रैमासिकात सॉलव्हन्सी रेशिओ 1.76 टक्के होता. या वर्षी सॉलव्हन्सी रेशिओ वाढून 1.85 टक्क्यांवर पोहचलाय. हा रेशिओ पाहूनच शेअर बाजारातील तज्ज्ञ दीर्घकाळासाठी एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. दीर्घ कालावधीसाठी एलआयसीतील गुंतवणूक फायदेशीर आहे. ज्यांनी आयपीओमध्ये गुंतवणूक केलीय ते सध्या अधिक गुंतवणूक करू शकतात. येत्या दोन ते तीन वर्षांत एलआयसीचा शेअर्स 1,150 रुपयांपर्यंत पोहचेल अशी माहिती जियोजित फाइनेंशियल सर्विसेसचे मुख्य रणनीतिकार गौरांग शाह यांनी दिलीये.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.