LIC पॉलिसीधारकांसाठी मोठी बातमी, बंद पडलेली पॉलिसी नियमित करण्यासाठी विशेष अभियान
एलआयसीनं अपरिहार्य कारणामुळं बंद झालेली पॉलिसी नुतनीकरणासाठी नवीन अभियान सुरु केलेय. LIC special revival campaign for lapsed policy
नवी दिल्ली: भारतीय जीवन विमा निगमनं (LIC) पॉलिसीधारकांसाठी महत्वाचं अभियान सुरु केलं आहे. त्याअतंर्गत अपरिहार्य कारणामुळं बंद झालेली पॉलिसी नियमित करता येणार आहे. एलआयसीनं पॉलिसी नुतनीकरणासाठी नवीन अभियान सुरु केलेय. हे अभियान 7 जानेवारीला सुरु झालं असून 6 मार्च 2021 पर्यंत सुरु राहणार आहे. या अभियानांतर्गत विमाधारक त्यांची कालावधी पूर्ण करण्यापूर्वी बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरु करु शकतील. मात्र, एलआयसीनं त्यासाठी काही नियम लागू केले आहेत. (LIC special revival campaign for lapsed policy)
एलआयसी विलंब शुल्क माफ करणार
एलआयसीनं कालावधी संपण्यापूर्वी बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी नवीन अभियान सुरु केले आहे. जीवन विमा निगमनं यासाठी विशेष अभियान सुरु केलेय. त्याअतर्गत अपरिहार्य कारणांमुळे हप्ते भरता न आल्यानं ज्यांची पॉलिसी लॅप्स झालीय त्यांना ती पुन्हा नियमित करता येतील. एलआयसीनं यासाठी एक कालमर्यादा निश्चित केली आहे. विमाधारक या योजनेचा फायदा घेऊ शकतात. मात्र, प्रीमियमची तारीख 5 वर्षांपेक्षा जुनी असू नये. पॉलिसी पुन्हा नियमित करण्यासाठी विलंब शुल्क माफ करण्या येणार आहे.
— LIC India Forever (@LICIndiaForever) February 3, 2021
किती सूट मिळणार
पॉलिसीधारकांना बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरु करायची असेल तर 1 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक प्रीमियमवरील 20 टक्के विलंब शुल्क किंवा 2 हजार रुपयांची सूट मिळेल. वार्षिक प्रीमियम 1 लाख ते 3 लाखांदरम्यान असेल तर विलंब शुल्कात 25 टक्के सूट किंवा 2500 रुपयांपर्यत सूट मिळेल. ज्यांचा वार्षिक प्रीमियम तीन लाखांपेक्षा जास्त असेल त्यांच्यासाठी विलंब शुल्क 30 टक्के सूट किंवा 3 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळेल.
अतिजोखमीच्या योजनांवर सूट मिलणार नाही
LIC सूचनांनुसार टर्म इंन्शुरन्स, आरोग्य विमा, मल्टीपल रिस्क पॉलिसीज, यासारख्या विमा पॉलिसींवर कोणतीही सूट दिली जाणार नाही.
एलआयसी जीवन उमंग योजना
एलआयसीची ही योजना वयाच्या 100 वर्षांपर्यंत कव्हर करते. या पॉलिसीच्या मॅच्युअरिटीची रक्कम 100 वर्षे पूर्ण झाल्यावर मिळेल. जर पॉलिसीधारकाचा अचानक मृत्यू झाला तर त्याने भरलेला सर्व प्रीमियम नामित व्यक्तीला परत केला जाईल. LIC जीवन उमंग योजना असं या खास योजनेचं नाव आहे. यामध्ये प्रीमियम पेमेंट कालावधीनंतर विमाराशीच्या 8 टक्के रक्कम आयुष्यासाठी किंवा 100 वर्षे वयापर्यंत दिली जाते.
जर एखाद्या व्यक्तीने वयाची 100 वर्षे पूर्ण केली तर कंपनी एकरकमी रक्कम विमाधारकास देईल. इतकंच नाहीतर वयाच्या 100 व्या वर्षी पॉलिसीधारकास सम अॅश्युअर्ड, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि अंतिम एडिसन बोनस दिला जाईल.
संबंधित बातम्या:
RBI चा मोठा निर्णय, ‘या’ बँकेच्या ग्राहकांना आता काढता येणार फक्त 1 हजार
Petrol Diesel Price: मुंबईत 97 रुपये झालं पेट्रोल, डिझेलच्या किंमतीही वाढल्या; वाचा आजचे दर
कर्ज घेण्यासाठी धमाकेदार ऑफर, सगळ्यात कमी व्याज दरावर मिळणार 50 लाखांपर्यंत लोन
LIC special revival campaign for lapsed policy