Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC – Jio Fin Deal | LIC आणि Jio Fin ची मोठी डील, मुकेश अंबानी यांच्या Jio Fin मध्ये LIC चा वाटा 6.66 टक्के

जिओ फायन्साशिअल सर्व्हिसेस शेअर्सची सोमवारी मार्केटमध्ये एन्ट्री झाली आहे. यापूर्वी ही कंपनी रिलायन्सचा एक भाग होती. मात्र आता वेगळी झाली असून मार्केटमध्ये लिस्ट झाली आहे. एलआयसीने या कंपनीमध्ये रस दाखवला असून 6.66 टक्के शेअर घेतले आहेत.

LIC - Jio Fin Deal | LIC आणि Jio Fin ची मोठी डील, मुकेश अंबानी यांच्या Jio Fin मध्ये LIC चा वाटा 6.66 टक्के
मुकेश अंबानी यांच्या Jio Fin मध्ये LIC चा केवढा वाटा, असा होवू शकतो एलआयसीला फायदा, LIC 6.66 टक्के वाटेकरी
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 8:38 PM

मुंबई : जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असलेल्या एलआयसीने जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेजमध्ये (JFSL) 6.66 टक्के शेअर घेतले आहेत. एलआयसीने सांगितलं आहे की, शेअर्स डिमर्जर प्रक्रियेद्वारे मिळाले आहेत. कंपनीने रिलायन्स इंडस्टीजपासून वेगळे झालेल्या जिओ फायन्सासशिअल सर्व्हिसेसमध्ये 6.66 टक्के हिस्सेदारी घेतली आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्सची सोमवारी मार्केटमध्ये एंट्री झाली होती.  रिलायन्स इंडस्ट्रीजपासून जिओ फायनान्शिअलच्या विलगीकरणाचा फायदा विमा कंपनीला झाला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या विलगीकरणापूर्वी एलआयसीला हा स्टॉक 4.68 टक्के खर्चाच्या बरोबरीने मिळाला आहे. 30 जून 2023 पर्यंत एलआयसीची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 6.49 टक्के भागीदारी होती. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 4.68 टक्के समभागांच्या डिमर्जरच्या बदल्यात मिळालेली रक्कम नॉन-बँकिंग वित्तीय संस्था जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या अधिग्रहणासाठी वापरली गेली आहे. 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.  जिओ फायनान्सशिअल सर्व्हिसेस कंपनीत अंबानी कुटुंबाचा 46 टक्के वाटा आहे आणि एलआयसी कंपनीच्या प्रमुख भागधारकांपैकी एक आहे.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेजचा शेअर 21 ऑगस्टला बीएसईवर 265 रुपयांना लिस्ट करण्यात आला होता.जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेजच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी लोवर सर्किट लागलं आहे. या कंपनीचा स्टॉक 4.99 टक्के घसरणीसह 239.20 वर ट्रेड करत होता. फायनान्शिअल सर्व्हिसेज कंपनीच्या मार्केट कॅप जवळपास 1.60 लाख कोटी रुपये आहे.

जिओ फायनान्सशिअल सर्व्हिसेस कंपनीकडे इंश्युरन्स आणि म्युचुअल फंडचा परवाना आहे. तसेच 6 कंपन्यांमध्ये होल्डिंग आहे. रिलायंस इंडस्ट्रियल इन्वेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स (RIIHL), रिलायंस पेमेंट सॉल्यूशन्स, रिलायन्स रिटेल फायनान्स, जियो पेमेंट्स बँक, जियो इंफॉर्मेशन एग्रीगेटर सर्व्हिस आणि रिलायन्स रिटेल इंश्योरेंस ब्रोकिंग लिमिटेड या कंपन्यांमध्ये होल्डिंग आहे.

एलआयसीच्या शेअर्सवर सकारात्मक परिणाम

एलआयसीच्या शेअर्समध्येही आज एक टक्क्यांनी वाढ होऊन ट्रेड करत होता. दुपारी दीडच्या आसपास एलआयसीचा शेअर 11.60 रुपये किंवा 1.78 टक्क्यांच्या तेजीसह 663.75 रुपये प्रति शेअर ट्रेड करत होता.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.