आरोग्य विमा सुद्धा विकणार आता LIC, कंपनीची योजना काय, सीईओंनी केला मोठा खुलासा

LIC In Health Insurance News : एलआयसीकडे सध्या 14.1 लाखांहून अधिक एजेंट आहेत. जगातील मोठ्या विमा कंपन्यात एलआयसीचे क्रमांक वरचा आहे. जीवन विमा विकणारी एलआयसी लवकरच आरोग्य क्षेत्रात दमदार पाऊल टाकणार आहे.

आरोग्य विमा सुद्धा विकणार आता LIC, कंपनीची योजना काय, सीईओंनी केला मोठा खुलासा
एलआसी आरोग्य विमा
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 10:10 AM

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) आता आरोग्य विमा क्षेत्रात दमदार पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. आरोग्य क्षेत्रासाठी नवीन विभाग सुरू करण्याऐवजी एलआयसी आता आरोग्य विमा विक्री करणारी कंपनी अधिग्रहण करण्याच्या विचारात आहे. देशात सध्या पाच प्रमुख विमा कंपन्या स्टार हेल्थ अँड एलाईड इन्शुरन्स, निवा बूपा, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, केअर हेल्थ इन्शुरन्स आणि मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स काम करत आहेत. तर विमा नियामक IRDAI ने दोन विमा कंपन्या गॅलेक्सी हेल्थ आणि नारायण हेल्थ यांना परवानगी दिली आहे.

एका कंपनीचा ताबा घेऊ शकतो

एलआयसीचे एमडी आणि सीईओ सिद्धार्थ मोहंती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. एलआयसीच्या जून तिमाहीचे निकाल त्यांनी जाहीर केले. त्यावेळी त्यांनी आरोग्य विमा क्षेत्रात दमदार पाऊल टाकण्याविषयी एक महत्वपूर्ण माहिती दिली. त्यानुसार, एका कंपनीचा ताबा घेतल्या जाऊ शकतो, त्यामुळे एलआयसीला देशभरात आरोग्य विमा विक्रीची परवानगी मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षातच आरोग्य विमा कंपनीच्या अधिग्रहणाचा इरादा त्यांनी बोलून दाखवला. त्यामुळे या एक दोन महिन्यातच आरोग्य विमा कंपनी खरेदी करुन लागलीच आरोग्य विमा क्षेत्रात मांड ठोकण्याचा एलआयसीचा प्रयत्न असेल.

हे सुद्धा वाचा

14 लाखांहून अधिक एजेंट

एलआयसीकडे जवळपास 14.1 लाखांहून अधिक एजेंट आहेत. जगातील मोठ्या विमा कंपनी नेटवर्कसारखाच हा मोठा आकडा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एलआयसीचे काही एजेंट हे अगोदरच दुसऱ्या आरोग्य विमा कंपनीसाठी काम करत आहेत. नियमानुसार एजेंट हा जीवन विमा सोबत इतर विमा कंपनीसाठी काम करु शकतो. आता एलआयसी आरोग्य विमा विक्रीत उतरली तर एजेंटला मोठा फायदा होऊ शकतो. तर ग्राहकांचा एलआयसीवर अजूनही विश्वास कायम असल्याने ग्राहक जोडण्यासाठी मोठी अडचण येणार नाही.

इतका झाला फायदा

जून 2024 च्या संपलेल्या तिमाहीत भारतीय आयुर्विमा महामंडळाचा निव्वळ नफा 10 टक्क्यांनी वाढला. तो 10,461 कोटींच्या घरात पोहचला. तर या कालावधीत कंपनीचा महसूल वाढून 2,10,910 कोटी रुपये झाला. तर गुंतवणुकीतून एलआयसीला 96,183 कोटींचा महसूल मिळाला. गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा याच कालावधीसाठी 90,309 कोटींच्या घरा होता.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.