Economic Recession | लिपस्टिक आणि अंडरवेअरने मंदीचा काढा माग! विश्वास नाही ना, पण बांधता येतो अचूक अंदाज, वाचाल तर वाचाल!

Economic Recession | आता तुम्ही म्हणाल काही काय सांगता राव, पण हा अंदाज खरा ठरला आहे. लिपस्टिक आणि अंडरवेअरच्या आधारे मंदीचा अचूक अंदाज लावण्यात आला आहे.

Economic Recession | लिपस्टिक आणि अंडरवेअरने मंदीचा काढा माग! विश्वास नाही ना, पण बांधता येतो अचूक अंदाज, वाचाल तर वाचाल!
लिपस्टिक, अंडरवेअरचा निर्देशांक जाणून घ्याImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 7:07 AM

Economic Recession | सध्या जागतिक ब्रँड आणि कंपन्या धडाधड कर्मचाऱ्यांना घरी पाठवत आहेत. अमेरिकन मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँकेने (American Federal Bank) व्याजदर वाढीचा कोण सपाटा लावला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात जगावर पुन्हा मंदीचे सावट (Economic Recession)येते की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहेत. पण मंदीचा फेरा येतो म्हणजे नेमकं काय होतं? तर मोठ्या प्रकल्पांना तडी बसते. बाजारातील खेळतं भांडवल कमी होतं. शेअर बाजार ढेपाळतो. घरांची विक्री झपाट्याने खाली येते, लोकांची क्रयशक्ती कमी होते. नोकऱ्यांचे, रोजगाराचे प्रमाण घटते अशी मुख्य लक्षणे दिसू लागतात. हे मंदीचा फेरा येण्याची संकेत (Signs of Recession)मानले जातात. पण जर तुम्हाला कोणी लिपस्टिक (Lipstick) आणि अंडरवेअर (Underwear)यावरुन मंदीचा माग काढता येतो, मंदी येणार की नाही हे सांगता येतं असं सांगितलं, तर तुम्ही त्याची पार येड्यात गिणती कराल. थाप मारावी ती किती? असं तुम्हाला वाटेल. पण ही बाब अगदी खरी आहे मंडळी, मंदी येणार की नाही याचा अचूक अंदाज हा लिपस्टिक आणि अंडरवेअरवरुन लावू शकता. कसा ते, आता पाहुयात.

लिपस्टिकची विक्री वाढते

आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे. मंदी आली तर सर्वच वस्तूंची मागणी कमी होते. प्रत्येक उद्योगाला, कंपनीला त्याचा फटका बसतो. मग लिपस्टिकमध्येच असं काय आहे की, मंदीच्या काळात हा उद्योग बहरतो. लिपस्टिकची अधिक विक्री होते. हे थोडं चक्रम वाटणारं आहे. पण गणित आहे व्यवहाराचं. ते समजलं की हे कोडं ही आपोआप सूटले. लिओनार्ड लॉडर या तज्ज्ञाने हा सिद्धांत शोधला आहे. अर्थशास्त्र शिकणाऱ्यांना हा विषय माहिती आहे. त्यांचा सिद्धांत ‘लिपस्टिक निर्देशांक’ (Lipstick Index) म्हणूनही ओळखला जातो. त्यांच्या ठोकताळ्यानुसार, अर्थव्यवस्था जेवढी बिकट होते, तेवढी लिपस्टिकची विक्री वाढते. हा सिद्धांत (Lipstick Index Theory) वेळोवेळी आलेल्या मंदीदरम्यान या ठोकताळ्यावर अगदी अचूक उतरला आहे. 2001 साली अमेरिकेत आलेल्या महामंदीच्या वेळीदेखील लिपस्टिकची विक्रीत अनाकलनीयरित्या वाढ झाली होती.

हे सुद्धा वाचा

पण नेमकं कारण काय?

लिओनार्ड यांनी यामागे अगदी सोप्प व्यावहारिक गणित समजून सांगितलं आहे. महिला या जात्याच व्यवहारी असतात. ज्यावेळी मंदी येते. त्यावेळी पैशाचे स्त्रोत आटतो. त्यामुळे महिला अधिक काटकसरी होतात. त्या महागड्या वस्तूंची कमी खरेदी करतात. मग त्यात त्यांचं नेटणं मुरडणंही आलंच. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यावर त्या अगदी कमी प्रमाणात खर्च करतात. मेकअप आणि मेकअप साहित्यावरचा त्यांचा खर्च त्या पार कमी करुन टाकतात. पण त्याचवेळी लिपस्टिकची किंमत वाजवी असल्याने त्याचा वापर त्या अधिक करतात. परिणाम अगदी स्पष्ट आहे, लिपस्टिकची विक्री अधिक होते. त्यामुळे लिपस्टिक इंडेक्स वाढतो. हा तो मंदीशी थेट आलेला संबंध असतो.

अंडरवेअरवर मात्र थेट परिणाम

आता पुरुष फार व्यवहारी नसला तरी मंदीच्या काळात तो ही काटकसरी होतो. लिपस्टिक इंडेक्ससारखा हा निर्देशांक काम करत नाही तर अंडरवेअर निर्देशांकावर (Underwear Index) मंदीचा थेट परिणाम दिसून येतो. अर्थात मंदी आली की अंडरवेअरची विक्री घटते. 1970 च्या दशकात एलन ग्रीनस्पॅन यांनी या इंडेक्सचा शोध लावला होता. बापुडे पुरुष सम पातळीवर चालतात, ते महिलासारखे व्यस्त चालत नाहीत. जीवनावश्यक वस्तूंवर खर्च वाढल्याने फाटक्या अंडरवेअरवर पुरुष दिवस काढतात. ते अंडरगार्मेंटसवरील खर्च टाळतात, असा हा इंडेक्स इंगित करतो. तर या दोन इंडेक्सद्वारे तुम्ही ही मंदीचा अंदाज बांधू शकतात.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.