AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pre-EMI आणि Full EMI च्या गोंधळात अनेकांना नुकसान, जाणून घ्या सर्व काही

ज्यावेळेसही तुम्ही कंन्स्ट्रक्शन सुरु असलेल्या प्रॉपर्टीत पैसे गुंतवता आणि लोनच्या माध्यमातून पेमेंट करणार असाल तर प्री-ईएमआय आणि फूल ईएमआयबद्दल माहिती असणं कामाला येतं.

Pre-EMI आणि Full EMI च्या गोंधळात अनेकांना नुकसान, जाणून घ्या सर्व काही
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 11:26 AM

ज्यांना घर घ्यायचंय, ते फ्लॅट खरेदीला पसंती देतात. त्यातही ज्यांना लगेचच रहाण्यासाठी फ्लॅटची आवश्यकता नसते ते काही ठराविक काळानंतर तयार होईल अशा फ्लॅटमध्ये पैसे गुंतवतात. म्हणजेच ज्या घराचं बांधकाम सुरु आहे किंवा सुरु होणार आहे अशा प्रॉपर्टीत ते पैसे गुंतवतात. ज्यावेळेस तो फ्लॅट तयार होतो, त्यावेळेस त्यात रहायला जातात. असाच काहीसा विचार तुम्ही घर खरेदी करण्यासाठी करत असाल तर प्री ईएमआय आणि फूल ईएमआय काय आहे ते जाणून घ्या.

ज्यावेळेसही तुम्ही कंन्स्ट्रक्शन सुरु असलेल्या प्रॉपर्टीत पैसे गुंतवता आणि लोनच्या माध्यमातून पेमेंट करणार असाल तर प्री-ईएमआय आणि फूल ईएमआयबद्दल माहिती असणं कामाला येतं. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला दोन्ही प्रकारच्या ईएमआयबद्दल सांगत आहोत आणि तुम्हाला नेमका कोणता उपयोगाचा आहे तेही सांगणार आहोत.

काय असते प्री-ईएमआय? असं गृहीत धरा की, तुम्ही फ्लॅट बूक केलाय आणि त्यासाठी तुम्ही 50 लाखाचं लोण घेतलेलं आहे. अजून तुमच्या फ्लॅटचं बांधकाम सुरु आहे, लगेच रेडी टू मुव्ह इन नाही. तरीही तुम्ही ईएमआय देत आहात. तर त्याला प्री ईएमआय असं म्हणतात. यात जोपर्यंत कंन्स्ट्रक्शन सुरुच असतं तोपर्यंत बँक बिल्डरला पूर्ण पैसे देत नाही. विशेष म्हणजे तुमच्या फ्लॅटचं जसं बांधकाम सुरु असतं त्याच प्रमाणात बँक त्या बिल्डरला पैसे देते. यात तुम्ही बिल्डरला ईएमआयच्या माध्यमातून पार्शियल पेमेंट करता. यात फक्त इंटरेस्ट दिला जातो.

ईएमआय कसा ठरवला जातो? Pre-EMI मध्ये फक्त साधं व्याज लागतं. असं गृहीत धरा की तुम्ही 50 लाखाचं होम लोण घेतलेलं आहे. त्याचं पहिलं डिस्बर्समेंट 5 लाख रुपये आहे आणि इंटरेस्ट रेट 7.5 %. म्हणजेच फ्लॅटचं पजेशन मिळण्याआधीच बिल्डरला 5 लाख रुपये पोहोचलेले असतात. मग जसजसे बिल्डरला पैसे मिळत जातात तसतसा तुमचा EMI ही वाढत जातो. जर तुम्ही किरायाच्या घरात रहाता तर तुमच्यासाठी हा पर्याय चांगला आहे. कारण सुरुवातीला तुमचा EMI कमी रहातो. जर तुम्ही गुंतवणूक करु पहाता तर पजेशन मिळाल्यानंतर प्रॉपर्टी विकण्यासाठीही हा पर्याय चांगला आहे.

काय आहे फूल ईएमआय? जर बिल्डरला थोडे पैसे द्यावे लागले तर तुम्हाला प्री ईएमआय द्यावा लागतो. तसच पजेशन मिळेपर्यंत ते फेडत रहावं लागतं. पण जेव्हा बिल्डरला पूर्ण पेमेंट केलं जातं, त्यावेळेस तुम्हाला फूल ईएमआय द्यावा लागतो. ज्यात व्याजही असतं आणि मुद्दलही. (what is pre emi and full emi know everything about

home loan and process )

मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
बलुचिस्तानकडून पाक आणि चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन.
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं
पाकड्यांना पाडलं उघडं, भारतीय लष्करानं सांगितलं काय खरं काय खोटं.