Gold Silver Price Today : मन गेलं हरकून, सोने-चांदी आपटले दणकावून!

Gold Silver Price Today : सोने-चांदीने खरेदीदारांसाठी आनंदवार्ता आणली आहे. आज दोन्ही मौल्यवान धातू स्वस्तात खरेदी करता येणार आहे. जाणून घ्या आज किती आहे भाव..

Gold Silver Price Today : मन गेलं हरकून, सोने-चांदी आपटले दणकावून!
आज चला खरेदीला
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 10:42 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीने ग्राहकांसाठी आज साखर पेरणी केली. दोन्ही धातूंच्या किंमतीत मोठी घसरण झाली. सोने-चांदीने खरेदीदारांसाठी आज आनंदवार्ता आणली. 17 मे रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली. तर चांदीत सुरु असलेली घसरण कायम आहे. भावात सातत्याने चढउतार होत असला तरी गेल्या पंधरवाड्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी मोठी उसळी घेतली नाही. या पडझडीचा ग्राहकांना फायदा घेता येईल. त्यांना इतक्या स्वस्तात सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदी करता येतील.

असा बदलला भाव गुडरिटर्न्सनुसार, सोमवारी 15 मे रोजी सोन्याच्या भावात मोठा बदल झाला नाही. 22 कॅरेटचा भाव 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,940 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 16 मे रोजी हा भाव अनुक्रमे 56,790 रुपये आणि 61,940 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 17 मे रोजी 22 कॅरेट सोन्यात 450 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण झाली तर 24 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्रॅम जवळपास 500 रुपयांची, 490 रुपयांची घसरण झाली. भाव अनुक्रमे 56,900 रुपये आणि 62,060 रुपये प्रति 10 ग्रॅम आहेत.

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,066 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,821 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,937 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,800 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

हे सुद्धा वाचा

चांदीत घसरण ibjarates.com नुसार, एक किलो चांदीचा भाव 15 मे रोजी 72,455 रुपये होता. तर 16 मे रोजी संध्याकाळी हा भाव 71,930 रुपये होता. तर गुडरिटर्ननुसार, 1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये होता. त्यानंतर घसरण सुरु झाली. 16 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 74,800 रुपये होता. आज हा भाव 74,600 रुपये आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.