रतन टाटा यांच्या या कंपनीची कमाल, शेवटच्या सत्रात छापले इतके कोटी
Ratan Tata | रतन टाटा यांच्या या कंपनीने वर्षाच्या अखेरीस गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करुन दिली. बाजाराच्या अखेरच्या सत्रात अवघ्या काही मिनिटात कंपनीने इतिहास रचला. एकाच फटक्यात कंपनीने 11,500 कोटी रुपयांची कमाई केली. या फायद्यामुळे गुंतवणूकदारांची नवीन वर्षाची पार्टी रंगणार आहे.
नवी दिल्ली | 29 डिसेंबर 2023 : रतन टाटा यांची फेव्हरेट कंपनीने गुंतवणूकदारांना एका फटक्यात मालामाल केले. कंपनीने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली. वर्षाच्या अखेरच्या सत्रात कंपनीने गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करुन दिली. अवघ्या काही मिनिटात या कंपनीचे बाजारातील मूल्य 11,500 कोटी रुपयांनी वाढले. पूर्ण वर्षाचा विचार करता या शेअरमध्ये जवळपास 100 टक्के वृद्धी दिसून आली. म्हणजे कंपनीने गुंतवणूकदारांना दुप्पट कमाई करुन दिली. टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र दिसून आले. गुंतवणूकदारांना जोरदार फायदा झाला.
विक्रमी स्तरावर पोहचला टाटा मोटर्सचा शेअर
टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्सने ही कमाल केली आहे. शेवटच्या व्यापारी सत्रात कंपनीचा शेअर विक्रमी स्तरावर पोहचला. आकड्यानुसार, कंपनीचा शेअर 6.41 टक्क्यांनी वधारला. हा शेअर तेजीसह 802.60 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला. दुपारी 1 वाजून 45 मिनिटांवर हा शेअर जवळपास 4 टक्क्यांच्या तेजीसह 783.75 रुपयांवर व्यापार करत होता. एक दिवसापूर्वी कंपनीचा शेअर 754.20 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरने आज पहिल्यांदा 800 रुपयांचा टप्पा ओलांडला.
मूल्यात 11,500 रुपयांचा फायदा
टाटा मोटर्सच्या मूल्याचा विचार करता, कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार वाढ दिसून आली. व्यापारी सत्रात कंपनीचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहचला. कंपनीचे मार्केट कॅप 2,62,056.34 कोटी रुपयांवर पोहचले. तर एक दिवसापूर्वी कंपनीचे बाजारातील भांडवल 2,50,561.47 कोटी रुपये होते. काही मिनिटांच्या व्यापारी सत्रात कंपनीच्या भांडवलात 11494.87 कोटी रुपयांची वाढ दिसून आली. सध्या कंपनीचे मूल्य 2,60,428.14 कोटी रुपये आहे.
कंपनीने केली दुप्पट कमाई
टाटा मोटर्सचे शेअर या वर्षात दुप्पट झाले. टाटा मोटर्सने गुंतवणूकदारांना डबल कमाई करुन दिली. गेल्या वर्षाच्या अखेरीस जेव्हा शेअर बाजार बंद होता. तेव्हा कंपनीचा शेअर 388.10 रुपयांवर पोहचला होता. त्यानंतर या शेअरमध्ये वाढ दिसून आली. कंपनीचा शेअर 802.60 रुपयांच्या पुढे गेला. कंपनीच्या शेअरमध्ये 107 टक्क्यांची वाढ दिसून आली. 28 डिसेंबर रोजी रतन टाटा यांचा वाढदिवस होता. टाटा मोटर्सने जणू टाटा यांना वाढदिवसाच्या एक दिवसानंतर ही अनोखी भेट दिली आहे. गुंतवणूकदारांना त्याचा फायदा झाला आहे.