AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Gas Cylinder : 819 रुपयांचा सिलेंडर फक्त 119 रुपयांत मिळवा, तब्बल 700 रुपयांची सूट कशी मिळेल?

पेटीएम तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलं आहे, त्याअंतर्गत तुम्ही फक्त 119 रुपयांमध्ये 819 रुपयांचे सिलिंडर घेऊ शकता.

LPG Gas Cylinder : 819 रुपयांचा सिलेंडर फक्त 119 रुपयांत मिळवा, तब्बल 700 रुपयांची सूट कशी मिळेल?
सिलिंडर खरेदी करा फक्त 9 रुपयात
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 11:03 AM

नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती (LPG Cylinder Prices) सध्या गगनाला भिडल्या आहेत. 2021 मध्ये अनुदानित सिलेंडरची किंमत आतापर्यंत 225 रुपयांपर्यंत वाढली आहे. दिल्लीत अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 819 रुपयांवर पोहोचली आहे. पण Paytm तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलं आहे, त्याअंतर्गत तुम्ही फक्त 119 रुपयांमध्ये 819 रुपयांचा गॅस सिलेंडर घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला थेट 700 रुपये कॅशबॅक मिळेल. तर मग जाणून घ्या या ऑफरचा कसा फायदा घ्यावा. (lpg gas cylinder booking on paytm get rs 700 cashback here is the full process of booking and promo code)

तुम्ही पेटीएमवर (Paytm) तुमचा एलपीजी सिलेंडर बुक करुन 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. अनुदानानंतर एलपीजी सिलेंडर 819 रुपये असून देशातील बहुतेक ठिकाणी पेटीएमच्या खास कॅशबॅकचा फायदा घेऊन तुम्ही तो फक्त 119 रुपयांत खरेदी करू शकता.

कशी मिळवणार ऑफर जाणून घ्या…

– फोनमध्ये पेटीएम अॅप (Paytm App) नसेल तर प्रथम डाऊनलोड करा.

– त्यानंतर पेटीएम वर जा आणि ‘शो’ (Show more) वर क्लिक करा.

– आता ‘recharge and pay bills’ वर जा.

– आता ‘बुक सिलेंडर’ पर्याय उघडा.

– भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमधून आपला गॅस निवडा.

– नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा तुमचा एलपीजी आयडी भरा.

– यानंतर तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल.

– आता देय देण्यापूर्वी ‘FIRSTLPG’ प्रोमो कोड ऑफरवर ठेवा.

नियम आणि अटी

पेटीएम अॅपच्या माध्यमातून प्रथमच एलपीजी गॅस सिलेंडर बुक करणार्‍या ग्राहकांना 700 रुपयांपर्यंतचा हा कॅशबॅक मिळू शकेल. ही कॅशबॅक ऑफर 31 मार्च 2021 पर्यंतच असणार आहे. म्हणजेच, स्वस्त एलपीजी सिलेंडर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. बुकिंगच्या 24 तासांच्या आत तुम्हाला कॅशबॅक स्क्रॅच कार्ड मिळेल. हे स्क्रॅच कार्ड 7 दिवसांच्या आत वापरावे लागेल.

Amazon Pay वरून मिळेल 50 रुपयांचा कॅशबॅक

गॅस खरेदी करताना 50 रुपये वाचवले जाऊ शकतात. त्यासाठी इंडियन ऑईलने खास ऑफर सांगितली आहे. इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार इंडियन ऑईल म्हणजेच इंण्डेन या कंपनीचा गॅस खरेदी केल्यांतर 50 रुपये कॅशबॅक मिळू शकतो. त्यासाठी एलपीजी सिलिंडरची बुकिंग अ‌ॅमेझॉन पे (Amazon Pay) च्या माध्यमातून करावी लागेल. अ‌ॅमेझॉन पेच्या माध्यमातून गॅस बुकिंग केल्यानंतर अ‌ॅमेझॉनतर्फे 50 रुपये खात्यात कॅशबॅक म्हणून परत पाठवले जातील. म्हणजेच या मार्गाने 14.2 किलोचा गॅस सिलिंडर खरेदी करताना 50 रुपयांची बचत केली जाऊ शकते. (lpg gas cylinder booking on paytm get rs 700 cashback here is the full process of booking and promo code)

संबंधित बातम्या – 

विमाधारकांसाठी Good News! नियम आवडले नाही तर खरेदी केलेली पॉलिसी करू शकता रद्द, वाचा सविस्तर

Ration Card : रेशनकार्डसाठी अतिशय महत्त्वाचं आहे हे डॉक्यूमेंट, तुम्हीही ‘असं’ करा अल्पाय

IRCTC ची खास ऑफर! 12 दिवसांत करा 4 धाम यात्रा, वाचा किती येणार खर्च?

(lpg gas cylinder booking on paytm get rs 700 cashback here is the full process of booking and promo code)

एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.