LPG Price : करा आताच दिवाळी साजरी! घरगुती गॅस लवकरच स्वस्त होणार, पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदवार्ता

LPG Price : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सर्वसामान्य ग्राहकांना आनंदवार्ता दिली आहे. लवकरच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती आटोक्यात येऊ शकतात असा त्यांनी दावा केला. पण एक आडकाठी आहे, ही समस्या दूर झाल्यास किचन बजेट कमी होऊ शकते.

LPG Price : करा आताच दिवाळी साजरी! घरगुती गॅस लवकरच स्वस्त होणार, पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदवार्ता
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 10:20 AM

नवी दिल्ली : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी आनंदवार्ता आणली आहे. त्यांनी लोकसभेत घरगुती गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) किंमती कमी करण्याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती कमी झाल्या तर केंद्र सरकार सबसिडीच्या (Subsidy) मार्फत ग्राहकांना दिलासा देऊ शकते, असे वक्तव्य त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर 750 डॉलर प्रति मॅट्रिक टनाच्या दरापेक्षा कमी आल्यास घरगुती गॅसच्या किंमती कमी होऊ शकतील, असे संकेत त्यांनी दिले. सर्व गोष्टी अनुकूल झाल्यास, केंद्र सरकार घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी करु शकते, अथवा त्यावरील सबसिडी वाढवू शकते. त्यामुळे सर्वसामान्यांचे किचन बजेट कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्या चार वर्षांत घरगुती गॅसच्या किंमती झरझर वाढल्या. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने गॅसवर मिळणारी सबसिडी सरसकट कमी केली. अगदी नगण्य 3-4 रुपयांची सबसिडी ग्राहकांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. ही थट्टा थांबविण्याची विनंती सातत्याने करण्यात येत आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीही कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

केंद्र सरकार सध्या जवळपास 60 टक्के गॅसची आयात करते. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सध्या 200 रुपये सबसिडी देण्यात येत असल्याचा दावा केला आहे. ही सबसिडी करदात्यांचा पैसा असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सबसिडी सोडण्यावर भर दिला. देशातील जनतेने सबसिडी सोडावी असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

हे सुद्धा वाचा

गेल्या दोन वर्षात सऊदी करार दर (Saudi Contract Price) 250 डॉलर प्रति मॅट्रिक टनने वाढले आहेत. या किंमती 900 डॉलर मॅट्रिक टन झाल्या आहेत. जर सऊदी करार दर 750 डॉलर प्रति मॅट्रिक टन अथवा त्यापेक्षा कमी झाल्यास घरगुती गॅस सिलिंडर किफायतशीर दरांवर विक्री करता येईल, असे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती सातत्याने वाढ होत आहे. तरीही केंद्र सरकार भारतातील ग्राहकां प्रति संवेदनशील असल्याचा दावा पुरी यांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती भडकलेल्या असतानाही त्याची झळ भारतीय ग्राहकांना बसू दिली नसल्याचा दावा त्यांनी केला. सऊदी करार दरात 333 टक्के वृद्धी झाली असून भारतीय बाजारावर त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोविड महामारीच्या काळात केंद्र सरकारने गरीब जनतेला मोठा दिलासा दिला. त्यांना तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्यात आले. 2014 मध्ये देशात 14 कोटी घरगुती गॅस कनेक्शन होते. त्यानंतर आता देशातील 31 कोटी जनतेकडे गॅसची जोडणी असल्याचे ते म्हणाले. तेल विपणन कंपन्यांना 28,000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.