LPG Price Hike | ग्राहकांच्या खिशाला पहिल्याच दिवशी झळ; महागले एलपीजी सिलेंडर

LPG Price Hike | लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना फटका दिला. देशात एलपीजी सिलेंडरच्या भावात वाढ झाली. गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट वाढणार आहे. ऑईल कंपन्यांनीन आजपासून ही दरवाढ लागू केली आहे.

LPG Price Hike | ग्राहकांच्या खिशाला पहिल्याच दिवशी झळ; महागले एलपीजी सिलेंडर
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 8:47 AM

नवी दिल्ली | 1 March 2024 : मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांच्या खिशाला फटका बसला. 1 मार्च रोजी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. 1 मार्च 2024 पासून सिलेंडर महागले आहे. तेल विपणन कंपन्यांनी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ही वाढ झाली आहे. दिल्लीत कर्मशियल गॅस सिलेंडरची किंमत 25 रुपये, तर मुंबईत ही किंमत 26 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हॉटेलिंग महागणार आहे. पार्ट्यांसाठी आता कदाचित अधिक दाम मोजावे लागतील.

तीन महिन्यांत अशी झाली वाढ

  1. गेल्या वर्षी डिसेंबर 2023 मध्ये 19 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरमागे 21 रुपयांची वाढ केली होती.
  2. या वर्षी फेब्रुवारी 2024 मध्ये 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलेंडरमागे 14 रुपयांची वाढ
  3. हे सुद्धा वाचा
  4. तर आता मार्च 2024 मध्ये 19 किलोग्रॅमचे व्यावसायिक सिलेंडर 25 रुपयांनी महागले
  5. तीन महिन्यांचा विचार करता 60 रुपयांची प्रति सिलेंडर वाढ झाली आहे
  6. तर जानेवारी 2024 मध्ये कंपन्यांनी 1.50 ते 4.50 रुपयांची कपात केली होती.

घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ नाही

केंद्र सरकारने घरगुती ग्राहकांना दिलासा दिला आहे. सबसिडी असलेल्या 14.2 किलोग्रम घरगुती गॅसच्या किंमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही. किचनचे बजेट कोलमडणार नाही. ग्राहकांच्या खिशावर कोणतीही परिणाम होणार नाही. गेल्या महिन्यात घरगुती गॅसच्या किंमतीत कपात करण्यात आली होती.

तीन महिन्यात 60 रुपयांची दरवाढ

डिसेंबरपासून मार्च महिन्यापर्यंत, जानेवारीचा अपवाद वगळता एलपीजी सिलेंडरचा दर 60 रुपयांनी वाढले आहेत. 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजीच्या भावात वाढ करण्यात आली आहे. लोकसभेचा बिगुल केव्हा पण वाजू शकतो. त्या आधी ग्राहकांच्या खिशावर ताण आला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली होती. सध्या ग्राहकांना हॉटेलिंगसाठी जादा पैसा मोजावा लागत आहे.

  • दिल्लीत 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅसची किंमत 1755.50 रुपयांहून वाढून 1769.50 रुपयांवर
  • मुंबईत 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅसची किंमत 1708 रुपयांहून वाढून 1723 रुपयांवर
  • चेन्नईत कर्मशियल गॅसची किंमत 1869 रुपयांहून 1887 रुपयांवर
  • तर चेन्नईत 19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस आता 1937 रुपये झाला. पूर्वी हा भाव 1924.50 रुपये होता

दरवाढीचा परिणाम

व्यावसायिक गॅस महागल्याचा थेट परिणाम खाद्यउद्योगांवर दिसून येतो. हॉटेलिंग आणि फूड डिलिव्हरी महागली आहे. रेस्टॉरंटमध्ये पण खाद्यपदार्थ्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी बाहेरील खाद्यपदार्थांसाठी आता अधिक पैसा मोजावा लागणार आहे.

घरगुती सिलेंडरची किंमत

काही वर्षांपूर्वी 500 रुपयांच्या पण आत मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर 1100 रुपयांच्या घरात पोहचले होते. याविषयी ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दिवाळीच्या जवळपास केंद्र सरकारने 200 रुपयांची सबसिडी दिली होती. त्यानंतर दिल्लीत 14.2 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत 903 रुपये, कोलकत्तामध्ये 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 918.50 रुपये आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.