M S Dhoni | बिझनेसच्या पिचवर महेंद्रसिह धोनीची बॅटिंग! अशी होत आहे कमाई

M S Dhoni | महेंद्र सिंह धोनी याची क्रिकेटच्या मैदानातील तुफान फटकेबाजी आपण पाहली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता धोनीने व्यवसायात झेप घेतली आहे. धोनी रांचीमध्ये विविध प्रयोग करत आहे. या उद्योगांनी त्याला मालामाल केले आहे. हा व्यवसाय करुन तुम्हाला पण कमाई करता येऊ शकते.

M S Dhoni | बिझनेसच्या पिचवर महेंद्रसिह धोनीची बॅटिंग! अशी होत आहे कमाई
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 10:11 AM

नवी दिल्ली | 24 February 2024 : महेंद्र सिंह धोनी हा भारतीय टीमसाठी क्रिकेट खेळत नाही. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आजही त्याची लोकप्रियता कायम आहे. सोशल मीडियापासून ते जाहिरात जगतापर्यंत धोनीची आजही क्रेझ आहे. त्याच्या फॅन फॉलोअर्सची संख्या पण जास्त आहे. धोनी आता काय करतोय, आयपीएलशिवाय तो काय काम करतो याविषयीची अनेकांची उत्सुकता असते. क्रिकेटप्रमाणेच धोनीने या व्यवसायात नशीब आजमावलं आहे. या व्यवसायाने त्याला मालामाल केले आहे. तुम्ही सुद्धा हे व्यवसाय करुन कमाई करु शकता.

महेंद्र सिंह धोनीचा बिझनेस

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या कडकनाथ कोंबड्याच्या व्यवसायात आहे. कुक्कटपालनात त्याने आघाडी घेतली आहे. कडकनाथ कोंबड्याचे त्याच्याकडे मोठे पोल्ट्री फॉर्म आहे. देशात पोल्ट्री फार्म उद्योग वाढत आहे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याकडे कोट्यवधी रुपये असण्याची गरज नाही. काही लाखातच हा व्यवसाय उभारता येतो. पोल्ट्री फॉर्म उद्योग हा खास करुन गाव, निमशहरात आणि मोठ्या शहरांच्या आजूबाजूला जोम धरत आहे. चिकनसह अंड्यांची मागणी वाढल्याने या व्यवसायाने चांगलाच जम बसवला आहे.

हे सुद्धा वाचा

होईल बंपर कमाई

  • हिवाळ्यात अंड्यांची मागणी वाढते. तर उन्हाळ्यात चिकनची मागणी वाढते. पण खवय्यांना कोणत्याही ही ऋतूत अंडे आणि चिकन चालते. संध्याकाळी अनेक ढाब्यांवर या चिकनची खास मागणी असते. तुम्ही जर कडकनाथ कोंबडीचे पालन केले तर अधिक कमाई करु शकता.
  • कडकनाथ कोंबडी महाग असते. त्यांच्या अंड्याची किंमत 50 रुपयांपेक्ष अधिक असल्याचे बोलले जाते. तर मांस 1000 रुपये किलोप्रमाणे विक्री होते. दिल्ली, मुबंई आणि कोलकत्तासारख्या महानगरात कडकनाथ कोंबडीची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय केल्यास अधिक कमाई करता येईल.

मध्यप्रदेश मालामाल

कडकनाथ ही प्रामुख्याने मध्यप्रदेशातील कोंबडी आहे. पण ती आता देशभरातील अनेक राज्यात पोहचली आहे. कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय वाढला आहे. या कोंबडीचे मास चविष्ट असल्याचे खवय्यांचे म्हणणे आहे. या कोंबडीचे पंख, चोच, पाय, रक्त आणि मांस सर्व काळे असते. तर या कोंबडीचे अंडे सुद्धा काळे असते. यामध्ये साध्या कोंबडीपेक्षा अधिक प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात.

Non Stop LIVE Update
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाकरे बंधू भिडले, कोणाची तोफ कोणावर धडाडली?.
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'
'थडग्यावर चादर चढवणारा, हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला जरांगे राक्षस'.
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.