Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni : कॅप्टन कूलकडे शानदार बाईकचे कलेक्शन, काय दर्दी माणूस आहे राव

MS Dhoni : कॅप्टन कूल एम एस धोनीचे बाईक प्रेम तर जगाला माहिती आहे. पण त्याच्या लक्झरीयस लाईफ स्टाईल आणि क्लासिक बाईकचे कलेक्शन पहिल्यांदाच समोर आले आहे. पाहा, या बाईकवर फिदा आहे, माही..

MS Dhoni : कॅप्टन कूलकडे शानदार बाईकचे कलेक्शन, काय दर्दी माणूस आहे राव
Follow us
| Updated on: Jul 18, 2023 | 7:06 PM

नवी दिल्ली | 18 जुलै 2023 : जगातील अव्वल दर्जाचा क्रिकेटर म्हणून एम एस धोनी (M S Dhoni) ओळखल्या जातो. क्रिकेट ही त्याची पॅशन आहे तर बाईक रायडिंग आणि त्यांचे कलेक्शन याचं त्याला वेड आहे. तो रन मशीन आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जातो. तसेच त्याच्या बाईक कलेक्शची चर्चा सातासमुद्रापार आहे. रांची येथील त्याच्या फार्महाऊसवर त्याचे बाईक कलेक्शन (Bike Collection) समोर आले आहे. त्याच्याकडे एका पेक्षा एक महागडी आणि आलिशान मोटरसायकल आहे. कॅप्टन कूल एम एस धोनीचे बाईक प्रेम जगासमोर आले आहे. त्याच्या लक्झरीयस लाईफ स्टाईल आणि क्लासिक बाईकचे कलेक्शन पहिल्यांदाच समोर आले आहे. पाहा, या बाईकवर फिदा आहे, माही..

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हे सुद्धा वाचा

धोनीनेच हे बाईक कलेक्शन जगासमोर आणले आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पूर्व भारतीय क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. MS Dhoni Viral Video पाहून तुम्हाला कॅप्टन कूलच्या बाईक कलेक्शनचा अंदाज येईल. धोनीकडे जवळपास 100 बाईक्स आहेत.

श्रीमंत क्रिकेटपटू

महेंद्र सिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भले ही संन्यास घेतला असला तरी तो आयपीएलमध्ये रन मशीन ठरला आहे. केवळ क्रिकेटच्या पिचवरच नाही तर तो इतर माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. श्रीमंत किक्रेटपटू त्याची पहिल्या काही क्रिकेटपटूमध्ये गणना होते. बिझनेसच्या पिचवर त्याने धमाल केली आहे. ब्राँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून तो कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.

कोणत्या बाईक कलेक्शनमध्ये

जितकी चर्चा धोनीच्या क्रिकेट आणि संपत्तीची होते, तेवढीच त्याच्या बाईक आणि कारच्या कलेक्शनची होते. धोनीच्या बाईक कलेक्शनमध्ये Kawasaki Ninja H2, Harley Davison FatBoy, Ducati 1098, Yamaha RD 350 यासारख्या अनेक बाईकचा समावेश आहे. व्यंकटेश प्रसाद याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या अनेक बाईक्सचे कलेक्शन सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

बाईकच नाही तर कारचे कनेक्शन

टीम इंडियाचे पूर्व कप्तान एम एस धोनी याचे बाईक कलेक्शनच शानदार नाही तर त्याच्याकडे आलिशान कार पण तैनात आहेत. त्याच्याकडे ऐका पेक्षा एक महागड्या कार आहेत. यामध्ये प्रामुख्याने Hummer H2, AudiQ7, Land Rover, Ferrari 599GTO, Nissan Jonga, Mercedes Benz GLE, Rolls Royals Silver Shadow यासारख्या कारचा समावेश आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.