Maharashtra Budget 2021 highlights | अजित पवारांकडून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर

| Updated on: Apr 15, 2021 | 3:50 PM

Maharashtra Budget 2021 Ajit Pawar Speech Live : महाराष्ट्राचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प अजित पवार विधानसभेत सादर करत आहेत.

Maharashtra Budget 2021 highlights | अजित पवारांकडून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर
अजित पवार

Maharashtra Budget 2021 मुंबई :  महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22  (Maharashtra Budget 2021) उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.  (Maharashtra budget 2021-22 live updates Ajit Pawar speech live)

राज्यातील माता-भगिणी, युवती-विद्यार्थींना शुभेच्छा देऊन अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडण्यासाठी सुरुवात केली. महाराष्ट्राच्या अर्थकारणात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Mar 2021 04:06 PM (IST)

    शेतकऱ्यांमुळं राज्याचा विकासदर सावरला: अजित पवार

    मी काय आज अर्थसंकल्प मांडत नाही. सर्व घटकाला बरोबर घेऊन अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचा राज्यावर परिणाम झाला. साडे सात हजार कोटी रुपयांच्या कार्यक्रमाद्वारे आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. महिला दिनादिवशी महिलांना घर खरेदी करण्यासाठी मुद्रांक शुल्कात 20 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी संत जनाबाई यांच्या नावानं योजना आणली 250 कोटी रुपये दिले. घरकाम करणाऱ्या 40 लाख महिला आहेत.

    शेतकऱ्यांमुळं राज्याचं अर्थकारण सावरला. शेतकऱ्यांच्यामुळे साडेअकरा विकासदर वाढला. शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याज दरानं कर्ज देण्यात येणार आहे.

  • 08 Mar 2021 04:00 PM (IST)

    महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    अजित पवार आणि शंभुराज देसाई यांचं अभिनंदन करतो. आजपर्यंत आपण पाहिलं असेल दरवर्षीप्रमाणं अर्थसंकल्प माडला गेला. संपूर्ण जगाची आर्थिक उलाढाल मंदावणारी गतवर्षीची वाटचाल होती. कोणतेही रडगाणं न गाता प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पातून दिसते. महिलांना स्वत:च्या पायावर स्वाभिमानानं उभं करण्यासाठी प्रयत्न, कृषी, शिक्षण, दळणवळण या क्षेत्रांना गती देण्याचं काम अर्थसंकल्पानं केलं आहे.प्रत्येकाला त्यांच्या चष्म्यातून पाहण्याचा अधिकार आहे.

  • 08 Mar 2021 03:16 PM (IST)

    Alcohol VAT increase in Budget | दारुच्या किमती वाढणार, व्हॅटमध्ये 5% वाढ

    मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये वाढ

    मद्यावरील व्हॅटमध्ये 60 वरुन 65% वाढ

    महाराष्ट्रात दारुच्या किमती वाढणार

    देशी बनावटीच्या मद्याच्या उत्पादन शुल्कात निर्मिती मूल्याच्या 220% किंवा 187 रुपये राहणार

    सर्व प्रकारच्या मद्यावरील व्ह्रॅटचा दर 35 % वरुन 40%

  • 08 Mar 2021 03:11 PM (IST)

    Corona Effect on Budget | कोरोनाचा अर्थकारणावर परिणाम काय ?

    ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शनसाठी 25 कोटीत आणखी 10 कोटींची भर

    नागपुरात नव्या प्रशासकीय इमारतीसाठी 250 कोटींचा खर्च

    महसूल विभागास 289 कोटी रुपये देणार

    सामान्य प्रशासन विभागासाठी 1035 कोटींचा निधी

    जिल्हा नियोजन विभागासाठी 11,035 कोटींचा निधी

    यंदा 3,47,457 कोटींचा महसूल अपेक्षित होता

    महसुली उत्पन्नाचे नवे उद्दिष्ट 2,89,494 कोटी

    यंदा 10,226 कोटी रुपयांची महसुली तूट अपेक्षित

    राजकोषीय तूट 66641 कोटी असेल

  • 08 Mar 2021 03:07 PM (IST)

    Mahatrashtra Budget on Pilgrim Centres | पोहरादेवीच्या विकासाच्या कामास हवा तेवढा निधी

    परळी-वैजनाथ, औंढा नागनाथ, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर तीर्थक्षेत्रासाठी विशेष निधी देणार

    जेजुरीगडासाठी, सांगलीतले बिरुदेव देवस्थानच्या विकास आराखड्यास निधी देणार

    अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकासालाही पुरेसा निधी उपलब्ध करुन देणार

    नामदेव महाराजांच्या नरसी नामदेवच्या विकासाला पुरेसा निधी देणार

    बसवेश्वरांचे मंगळवेढ्यात स्मारक उभारणार

    पोहरादेवीच्या विकासाच्या कामास हवा तेवढा निधी देऊ

  • 08 Mar 2021 03:05 PM (IST)

    Mahatrashtra Budget on Tourism | संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारी

    सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी पथदर्शी प्रकल्प, 3 वर्षात दरवर्षी 100 कोटी देणार

    रोजगार हमी विभागासाठी 1,231 कोटी रुपये

    गोंडवाना थीम पार्कची निर्मिती करुन सफारी सुरु करणार

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंह सफारीवर भर

    राणीची बाग प्राणीसंग्रहालयात नवे प्राणी आणणार

    वनविभागास 1,723 कोटींची मंजुरी

  • 08 Mar 2021 02:58 PM (IST)

    गोपीनाथ मुंडे महामंडळाला कारखान्यांइतका निधी देणार

    गोपीनाथ मुंडे विकास महामंडळासाठी कारखान्यांकडून प्रतिटन 10 रु.घेणार

    गोपीनाथ मुंडे महामंडळास कारखान्यांच्या निधीएवढा निधी सरकार देणार

    रायगड जिल्ह्यात कातकरी समाजाची एकात्मिक वसाहत उभारणार

    आदिवासी विकास विभागासाठी 9738 कोटींची तरतूद

    सारथी, बार्टी संस्थांना प्रत्येकी 150 कोटी रुपयांची तरतूद

    बार्टी, सारथीला अजून पैसा लागला तर देणार

    इतर मागास कल्याण विभागासाठी 3 हजार 210 कोटी रुपये

    अल्पसंख्याक विभागासाठी 590 कोटींची तरतूद

  • 08 Mar 2021 02:53 PM (IST)

    Mahatrashtra Budget on Tourism | महाराष्ट्राचे नवे पर्यटन धोरण, 1367 कोटींची तरतूद

    महाराष्ट्राचे नवे पर्यटन धोरण लवकरच जाहीर करणार

    महाबळेश्वर, पाचगणी, लोणार सरोवराचा विकास आराखडा तयार

    वरळीच्या डेअरीच्या जागेवर पर्यटन केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरु करणार

    पर्यटन विभागासाठी 1 हजार 367 कोटी रुपयांची तरतूद

    महाराष्ट्र राज्य संग्रहालय उभारणार

    सांस्कृतिक कार्य विभागासाठी 121 कोटी रुपये

    प्राचीन मंदिरांचे जतन करणार, 8 प्राचीन मंदिरांची निश्चिती

    प्राचीन मंदिरांच्या जतनासाठी यंदा 101 कोटी रुपये

  • 08 Mar 2021 02:52 PM (IST)

    कोणत्या विभागासाठी किती तरतूद

    धान्य साठवण्यासाठी 280 नवीन गोदामे

    अन्न व नागरी पुरवठा विभागास 321 कोटी रुपये मंजूर

    गृहविभागासाठी 1700 कोटी रुपयांची तरतूद

    गृहनिर्माण विभागासाठी 931 कोटींची तरतूद

  • 08 Mar 2021 02:46 PM (IST)

    Mahatrashtra Budget on Women | महिलांसाठी काय मिळणार ?

    जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा

    घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार

    शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास

    केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी 1398 कोटी

    संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा, 250 कोटींचे बीज भांडवल

    घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना

  • 08 Mar 2021 02:43 PM (IST)

    Mahatrashtra Budget on Roadways | समृद्धी महामार्ग, नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर

    उद्योग विभागासाठी 3500 कोटी रुपये

    25 हजार मेगावॅटचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणार

    समृद्धी महामार्ग, नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार

    ऊर्जा विभागासाठी 9 हजार कोटी रुपयांची तरतूद

    जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा

  • 08 Mar 2021 02:40 PM (IST)

    Urban Development Department | नगरविकास विभागासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा

    Urban Development Department | नगरविकास विभागासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा

    मुंबई पूर्व,पश्चिम द्रुतमार्गालगत सायकलिंग मार्ग उभारणार

    मुंबईत सांडपाण्यासाठी 19500 कोटी रुपये

    मिठी नदी प्रकल्पासाठी यंदा 400 कोटी रुपये

    नगरविकास विभागाला 8420 कोटी रुपये मंजूर

    खादी ग्रामोद्योग विभागासाठी 70 कोटी रुपये

  • 08 Mar 2021 02:38 PM (IST)

    Maharashtra Budget Railway | मुंबईत रेल्वे रुळांवरील 7 उड्डाणपूल उभारणार

    Maharashtra Budget Railway | मुंबईत रेल्वे रुळांवरील 7 उड्डाणपूल उभारणार

    शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प 2022 ला पूर्ण करणार वरळी ते शिवडी पूलाचे काम 3 वर्षात पूर्ण करणार मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार वसई ते कल्याण जलमार्ग सुरु करणार कोलशेत, काल्हे, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभाणार मुंबईतील 14 मेट्रोलाईनचे 1 लाख 40 हजार कोटी खर्च अपेक्षित मेट्रो मार्ग 2 अ, 7 चे काम 2021 पर्यंत पूर्ण करणार मुंबईतील कोस्टल मार्ग 2024 पर्यंत पूर्ण करणार

    मुंबईत रेल्वे रुळांवरील 7 उड्डाणपूल उभारणार बाळासाहेबांच्या स्मारकाच्या खर्चासाठी यंदा 400 कोटी

  • 08 Mar 2021 02:36 PM (IST)

    Maharashtra Budget on water supply | स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागासाठी 2533 कोटी

    Maharashtra Budget on water supply | स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागासाठी 2533 कोटी

    जलजीवन अभियानांतर्गत 84 लाख नळजोडण्या दिल्या मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत 448 पेयजल योजना स्वच्छता व पाणीपुरवठा विभागासाठी 2533 कोटी

  • 08 Mar 2021 02:32 PM (IST)

    Maharashtra Budget Education | शालेय शिक्षण, क्रीडा विभागासाठी 2400 कोटी

    Maharashtra Budget Education | शालेय शिक्षण, क्रीडा विभागासाठी 2400 कोटी

    जिल्हा परिषद शाळांच्या पुनर्बांधणीसाठी 3 हजार कोटी पुण्यातल्या क्रीडा विद्यापीठात 4 अभ्यासक्रम सुरू, 200 विद्यार्थ्यांना प्रवेश शालेय शिक्षण, क्रीडा विभागासाठी 2400 कोटी नेहरु सेंटरला 10 कोटी रुपयांचा निधी अमरावती विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेला 10 कोटी रुपये उच्च शिक्षण विभागास 1300 कोटी रुपये

  • 08 Mar 2021 02:31 PM (IST)

    Maharashtra Budget on Education | सातारच्या सैनिक शाळेला 300 कोटींचा निधी देण्यात येणार

    सातारच्या सैनिक शाळेला येत्या तीन वर्षात 300 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्यापैकी 2021-22 मध्ये 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल.

    प्रत्येक जिल्ह्यात राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान पार्क उभारलं जाणार त्यासाठी 300 कोटींची तरतूद

    उच्च व तंत्र शिक्षण विभाग

    राज्यात कौशल्य विद्यापीठांची स्थापणा करण्यास मंजुरी

  • 08 Mar 2021 02:29 PM (IST)

    Maharashtra Budget Transport | परिवहन क्षेत्रासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा 

    Maharashtra Budget Transport | परिवहन क्षेत्रासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा

    पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16139 कोटी मंजूर नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार अहमदनगर,बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गाचे काम वेगाने करणार बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी 1400 कोटी रुपये परिवहन विभागाला 2500 कोटी रुपये एलोरोच्या विमानतळाचा विस्तार करणार

    सोलापुरातल्या बोरामणी विमानतळाचे काम वेगाने करणार पुण्याजवळ नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार

  • 08 Mar 2021 02:26 PM (IST)

    Maharashtra Budget Road Development | रस्ते बांधकामासाठी अर्थसंकल्पातील घोषणा

    Maharashtra Budget on Road Development | रस्ते बांधकामासाठी अर्थसंकल्पातील घोषणा

    महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाची तुकडी ठेवणार आपत्ती व्यवस्थापन विभागासाठी 11315 कोटी समृद्धी महामार्गाचे काम 44% पूर्ण झाले, 500 किमीचा रस्ता 1 मे ला खुला करणार नांदेड ते जालना 200 किमीचा नवा मार्ग उभारणार गोव्याला जाण्यासाठी 540 किमीच्या समुद्री मार्गासाठी 9540 कोटी पूर्वमुक्त मार्गाला विलासराव देशमुखांचे नाव देणार 5689 कोटींचे रस्त्यांची कामे हाती घेणार सा.बांधकाम विभागास रस्ते बांधकामासाठी 12,950 कोटी सा.बांधकाम विभागास इमारत बांधकामासाठी 946 कोटी रुपये मंजूर ग्रामविकास मंत्रालयाला 7350 कोटी

  • 08 Mar 2021 02:26 PM (IST)

    Maharashtra Budget on Road Development| पुणे शहराच्या बाजूनं चक्राकार मार्ग उभारला जाणार

    राज्यातील ग्रामीण भागात 10 हजार किमी रस्त्यांची कामं करण्यात येतील

    पुणे-नाशिक जलद रेल्वे मार्गाच्या कामाला राज्यसरकारची मंजुरी

    पुणे-नाशिक मार्गावर 24 प्रकल्प

    एसटी विभागाला  1 हजार 400 कोटी निधी देण्यात येणार

  • 08 Mar 2021 02:24 PM (IST)

    Maharashtra Budget Water Resource | सहकार आणि पणन विभागासाठी महत्त्वाच्या घोषणा

    सहकार व पणन विभागासाठी 1284 कोटी रुपये देणार जलसंपदा विभागाच्या 278 कोटींच्या प्रकल्पांचे काम सुरु आहे 278 सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत 26 प्रकल्पांना 21698 कोटी गोसेखुर्दसाठी 1 हजार कोटी मंजूर, डिसेंबर 23 अखेर पूर्ण करणार 12 धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी रुपये मंजूर

    जलसंपदा विभागासाठी 12951 कोटी रुपयांची तरतूद

  • 08 Mar 2021 02:21 PM (IST)

    Maharashtra Agriculture Budget | राज्याच्या अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा

    Maharashtra Agriculture Budget | राज्याच्या अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा

    उद्योग व सेवा क्षेत्रात विकास दर घटला कृषी क्षेत्रानेच यंदा अर्थव्यवस्थेला सावरले शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन दिले 42 हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटले 3 लाख रुपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने

    बाजार समित्यांच्या बळकटीसाठी 2 हजार कोटींची योजना 4 वर्षात बाजारसमित्यांसाठी 2 हजार कोटी कृषी पंप जोडणी धोरण राबवणार कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी रुपये विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार 500 भाजीपाला रोपवाटिका उभारणार

    4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी देणार 4 कृषी विद्यापीठांना 3 वर्षात प्रत्येकी 600 कोटी संशोधनासाठी देणार पुण्यात जैवसुरक्षा प्रयोगशाळा उभारणार पदुम मंत्रालयासाठी 3274 कोटी रुपये देणार सहकार व पणन विभागासाठी 1284 कोटी रुपये देणार जलसंपदा विभागाच्या 278 कोटींच्या प्रकल्पांचे काम सुरु आहे 278 सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे. प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत 26 प्रकल्पांना 21698 कोटी

  • 08 Mar 2021 02:20 PM (IST)

    Maharashtra Budget on Water Resource | राज्यात 278 सिंचन प्रकल्पांची कामं सुरु

    राज्यात 278 सिंचन प्रकल्पांची कामं सुरु

    बळीराजा जलसिंचन प्रकल्पाअतंर्गत 91 प्रकल्पांची कामं

    जलसंपदा विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.

    गोसी खूर्द प्रकल्प डिसेंबर  2023 पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.

  • 08 Mar 2021 02:17 PM (IST)

    Maharashtra Agriculture Budget | राज्यात कृषीपंप जोडणी धोरण राबवणार, महावितरणला 1500 कोटी रुपये प्रस्तावित

    Maharashtra Agriculture Budget | बाजार समित्यांच्या बळकटीसाठी 2 हजार कोटींची योजना 4 वर्षात बाजारसमित्यांसाठी 2 हजार कोटी कृषी पंप जोडणी धोरण राबवणार कृषीपंप जोडणीसाठी महावितरणला 1500 कोटी रुपये विकेल ते पिकेल या धोरणाद्वारे 2100 कोटींची खरेदी संत्रा उत्पादकांसाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार 500 भाजीपाला रोपवाटिका उभारणार 4 कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दरवर्षी 200 कोटी देणार

  • 08 Mar 2021 02:15 PM (IST)

    Maharashtra Agriculture Budget | राज्य सरकारची मोठी घोषणा, 3 लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने

    Maharashtra Agriculture Budget | उद्योग व सेवा क्षेत्रात विकास दर घटला कृषी क्षेत्रानेच यंदा अर्थव्यवस्थेला सावरले शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार कोटी थेट वर्ग केले शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करुन दिले 42 हजार कोटींचे यंदा पीक कर्ज वाटले 3 लाख रुपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने

  • 08 Mar 2021 02:13 PM (IST)

    Maharashtra Budget Health | ससून कर्मचारी निवाससाठी 28 कोटी रुपये मंजूर

    Maharashtra Budget Health | 11 परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करणार लातूरच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी 73 कोटी ससून कर्मचारी निवाससाठी 28 कोटी रुपये मंजूर आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय बनवणार मोशीमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारणार आरोग्य विभागास यंदा 2900 कोटी रुपये मंजूर वैद्यकीय शिक्षण विभागास 1517 कोटी

  • 08 Mar 2021 02:11 PM (IST)

    Maharashtra Budget on Agriculture | कृषी क्षेत्रानं राज्याच्या अर्थव्यवस्थेला सावरलं: अजित पवार

    केंद्र सरकारनं पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात  शेतकऱ्यांचं 100 दिवस आंदोलन,  त्या शेतकऱ्यांच्या  आहोत.

    राज्य सरकारनं सुलभ अशी महात्मा फुले कर्जमाफी करण्यात आली.  31 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी

    कर्जमुक्तीनंतर 42 हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलं आहे.

    तीन लाख पर्यंतंच कर्ज परतफेड केल्यास राज्य सरकार शुन्य टक्के व्याजानं कर्ज देईल.

    विकेल ते पिकेल योजनेसाठी 2100 कोटी किमतीचा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय प्रकल्प राबवला जातोय.

    विदर्भातील अमतरावतीमध्ये संत्रा संशोधन केंद्र

    प्रत्येक तालुक्यात अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना सुरु करण्यात येईल.

    महाडीबीटी पोर्टलवर 11 लाख शेतकऱ्यांची नोंदणी, 25 लाख अर्ज प्राप्त झाले आहे.

    चार कृषी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी प्रमाणं तीन वर्षे 600 कोटी रुपये देण्यात येणार आहे.

    मत्सव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी नाबार्डकडून अर्थसहाय्य

    कुक्कुटपालन व्यवसायासाठी पुणे येथे संशोधन केंद्र

    कृषी आणि इतर क्षेत्रासाठी  3274 कोटी निधी प्रस्तावित

  • 08 Mar 2021 02:11 PM (IST)

    रुग्णालयात आगप्रतिबंधक उपकरणे उभारणार : अजित पवार

    संसर्गजन्य रोगांचे प्रत्येक जिल्ह्यात हॉस्पिटल उभारणार 8 मध्यवर्ती ठिकाणी हृदरोगासंबंधी हॉस्पिटल रुग्णालयात आगप्रतिबंधक उपकरणे उभारणार उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार डॉक्टरांच्या पदवीच्या 1990, पदव्युत्तर 1000 जागा वाढणार PPP मॉडेलवर आरोग्य सेवा उभारणार

  • 08 Mar 2021 02:10 PM (IST)

    कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारण्याची गरज, आरोग्यसेवेसाठी 7 हजार कोटींचा प्रकल्प : अजित पवार

    कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज आरोग्यसेवेसाठी 7 हजार कोटींचा प्रकल्प जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारणार मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतीत आरोग्य पायाभूत सुविधा उभारणार मनपाक्षेत्रासाठी 5 वर्षात 5 हजार कोटी, यंदा 800 कोटी देणार

  • 08 Mar 2021 02:09 PM (IST)

    राज्यातील अर्थसंकल्पात महिलांसाठी काही विशेष योजना : अजित पवार

    मुंबई : अर्थसंकल्पाचे सादरीकरण सुरु अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात राज्यातील माताभगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा महिलांचा राज्यात 48 टक्के वाटा महिलांसाठी काही विशेष योजना महाराष्ट्र संकटापुढे झुकला नाही अर्थकारण हे सरकारपुढे आव्हान आहे जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हा सिद्धांत डोळ्यासमोर गेल्या अर्थसंकल्पात कोरोनाचे गांभीर्य विषद केले

  • 08 Mar 2021 02:08 PM (IST)

    अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला प्राधान्य

    अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला अजित पवारांकडून आरोग्य विभागावर करण्यात येणाऱ्या तरतुदी सादर करण्यात येत आहेत.

    कोरोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज पडली आरोग्यसेवेसाठी 7 हजार कोटींचा प्रकल्प जिल्हा रुग्णालय, मनो रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारणार मनपा, नगरपरिषदा, नगरपंचायतीत आरोग्य पायाभूत सुविधा उभारणार मनपाक्षेत्रासाठी 5 वर्षात 5 हजार कोटी, यंदा 800 कोटी देणार संसर्गजन्य रोगांचे प्रत्येक जिल्ह्यात हॉस्पिटल उभारणार

  • 08 Mar 2021 02:02 PM (IST)

    अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात

    अजित पवारांकडून राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात,

  • 08 Mar 2021 12:56 PM (IST)

    अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील मात्र फारशा अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही: प्रविण दरेकर

    जनतेच्या राज्यसरकारच्या अर्थसंकल्पतुन अपेक्षा आहेतच. मात्र, राज्य सरकार कितपत उदार आहे हे पाहायला मिळेल, अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करतील मात्र फारशा अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. कोरोना नियंत्रणावर राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरलेला आहे हे आरोग्य यंत्रणेचा फेल्युअर आहेच, मात्र राज्य सरकारचा देखील फेल्युअर आहे, अशी टीका विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

  • 08 Mar 2021 12:48 PM (IST)

    अर्थसंकल्पातून जनतेला काही मिळणार नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्या: नितेश राणे

    भाजप आमदार नितेश राणे यांनी या अर्थसंकल्पातून जनतेला काही मिळणार नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं राज्य सरकार केवळ टेंडर भरण्यात आणि पैसे जमा करण्यात व्यस्त असल्याचा आरोप केला आहे.  त्यामुळे जनतेला काहो मिळणार नाही हे स्पष्ट आहे. केंद्रीय नियंत्रण पथकाचा अहवाल राज्ययील वस्तुस्थिती दर्शवतो, असे ते म्हणाले.

  • 08 Mar 2021 12:47 PM (IST)

    केंद्राकडं बोट न दाखवता पेट्रोल डिझेलवरील अधिभार कमी करा: प्रसाद लाड

    सरकार बजेट सादर करण्याआधीच कमी असेल असं सांगत आहे , कोरोनाच कारण दिलं जात आहे. बिल्डर आणि धनदाडग्यांसाठी सूट देत मग आता सर्वसामान्य जनतेला बजेट मध्ये काही तरी दिलं पाहिजे. राज्य सरकार पेट्रोल आणि डिझेल वरील अधिभार किती कमी करत हे पाहावे लागेलं , फक्त केंद्राकडे बोट दाखवू नका, असं भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले.

  • 08 Mar 2021 12:44 PM (IST)

    राज्यातील सर्व महिलांना बजेटकडून आशा: राज्यमंत्री आदिती तटकरे

    आज महिला दिन आणि राज्याचा अर्थ संकल्प सादर होत आहे , हा योगायोग आहे

    सर्वच महिलांच्या बजेट मधून अपेक्षा आहेत , अर्थ मंत्री पूर्ण करतील

    एक दिवस मर्यादित न राहता राज्यातील सर्वाना हक्कच व्यासपीठ मिळालं पाहिजे

    भाजपच्या महिला आमदारांनी निषेध केला पण आत्महत्या च्या घटना घ्या कोणाच्या कालावधी जास्त म्हणता येणार नाही , हे घडत आहेत हे दुर्दैवी आहे ,

    सर्व महिलांच्या विषयात सर्वांनी समोर आलो पाहिजे

  • 08 Mar 2021 12:42 PM (IST)

    साडे बारा कोटी लोकांना या अर्थसंकल्प कडून अनेक आशा: सुधीर मुनगंटीवार

    महाराष्ट्राच्या निर्मितीला 61 वर्ष झाली आहे आणि जागतिक महिला दिनाच्या दिवशी मांडणारा अर्थसंकल्प आहे.कोरोनाचा वेळेस हा अर्थसंकल्प आहे त्यामुळे घट तर ही झाली आहे. साडे बारा कोटी लोकांना या अर्थसंकल्प कडून अनेक आशा अपेक्षा आहेत. त्या त्यांनी पूर्ण कराव्या अशी आमची मागणी आहे.सगळे काही आश्वासन पूर्ण तर होणार नाही काही तरी आशा अपेक्षा पूर्ण कराव्यात. पोलीस,महिला,कायदा सुव्यवस्था या संदर्भात तरतुदी केली पाहिजे. शक्तिशाली महाराष्ट्र आणि वैभवशाली भारत बनवण्याचं काम केलं पाहिजे आणि लोक त्या अपेक्षेने लोक सरकार कडे पाहत आहे. अर्थसंकल्पाला चालना देण्याचं काम मंत्र्यांनी केलं पाहिजे, अशी अपेक्षा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

Published On - Mar 08,2021 6:28 PM

Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.