महाराष्ट्रात कर भरणं सोपं झालं, सरकारकडून अनोखं मोबाईल ॲप लाँच

राज्यात आता कर भरणा करणं अगदी सोपं होणार आहे. राज्य सरकारने यासाठी 'ग्रास महाकोष' (Gras Mahakosh Maharashtra) या अँड्रॉइड मोबाईल ॲपची निर्मिती केलीय.

महाराष्ट्रात कर भरणं सोपं झालं, सरकारकडून अनोखं मोबाईल ॲप लाँच
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 7:40 PM

मुंबई : राज्यात आता कर भरणा करणं अगदी सोपं होणार आहे. राज्य सरकारने महसुली कर आणि करेतर रक्कमांचे भरणा सुलभ व्हावा यासाठी ‘ग्रास महाकोष’ (Gras Mahakosh Maharashtra) या अँड्रॉइड मोबाईल ॲपची निर्मिती केलीय. महाराष्ट्र राज्याच्या लेखा व कोषागरे संचालनालयाने यात पुढाकार घेतलाय. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या हस्ते या ॲप्लिकेशनचं उद्घाटन करण्यात आलंय (Maharashtra Government launch Gras Mahakosh Maharashtra GRAS App for Tax submission).

हे ॲप GRAS वेबसाईट आणि गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही विभागाशी संबंधित करदाते, इतर संस्था, शासकीय कार्यालये तसेच सर्वसामान्य नागरिक देखील 24×7 या ‘ग्रास’ ॲपचा वापर करु शकतात. यामुळे शासनाच्या खात्यात सहजपणे रक्कम जमा करू शकतात. देयकांचे आदान-प्रदान, कर व करेतर रकमा व इतर बहुतांशी कामकाज ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतं. त्यामुळे लेखा व कोषागरे संचालनालयामध्ये ग्रास (GRAS) मोबाईल अॅपची निर्मिती हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय.

नवीन निवृत्ती वेतनधारकांना तातडीने पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) व PRAN कार्ड ऑनलाईन मिळण्यासाठी ONLINE PRAN GENERATION MODULE (OPGM) हे जेथीस सेवार्थ प्रणालीसोबत संलग्न करण्यात आलाय. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेतन पडताळणी मार्गदर्शिका पु‍स्तकेचंही यावेळी प्रकाशन करण्यात आलं.

या व्यतिरिक्त एक पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली. यात अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई तसेच कोषागार व उपकोषागार कार्यालयाकडून देयकांना लावण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या आक्षेपांची माहिती आहे. याशिवाय या पुस्तकात आक्षेप लागू नयेत याबाबतची परिपूर्ण व अद्ययावत माहिती देणारे देयक वेळीच कशी पारित होतील? याविषयी देखील मार्गदर्शक करण्यात आलंय. ही पुस्तकं PDF स्वरुपात संचालनालयाच्या “महाकोष” या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने या ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे. एनआयसीचे तज्ज्ञ अधिकारी बालकृष्ण नायर आणि त्यांचे सहयोगी विशाल नळदुर्गकर यांचा हे ॲप विकसित करण्यात मोलाचा वाटा आहे. यावेळी प्रधान सचिव (ले व को) नितीन गद्रे, प्रधान सचिव (वित्तीय सुधारणा) राजगोपाल देवरा आणि सचिव (व्यय ) राजीव मित्तल, लेखा व कोषागरे संचालक ज.र. मेनन, सहसंचालक जि.रा. इंगळे, उपसंचालक विनोद शिंगटे, सहायक संचालक प्रगती धनावडे आणि चित्रलेखा खातू उपस्थित होते. यावेळी मेनन यांनी सर्व नागरिकांनी सर्व प्रकारच्या कर व करेतर रकमा जमा करण्यासाठी gras mahakosh Maharashtra या मोबाईल ॲपचा आणि इतर सर्व सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन केले आहे.

हेही वाचा :

सफरचंद ते मद्यपान, सेस लागू, काय स्वस्त, काय महाग?

गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, भांडवलावरील नफ्यासाठी 1 वर्षांसाठी करात सूट

तुम्ही सोने खरेदी आणि विक्री करता? तर जाणून घ्या कसा आणि किती लागतो टॅक्स…

व्हिडीओ पाहा :

Maharashtra Government launch Gras Mahakosh Maharashtra GRAS App for Tax submission

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.