EPFO Maharashatra | रोजगारातही महाराष्ट्र अग्रेसर! ईपीएफओच्या आकड्यांनी सरकारची डोकेदुखी कमी, काय सांगतायेत आकडे?

EPFO Maharashatra | सर्वच क्षेत्रात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्राने तरुणांच्या हातांना रोजगार दिला आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आकडेवारीने सरकारची डोकेदुखी कमी केली आहे तर तरुणांची उमेद वाढवली आहे.

EPFO Maharashatra | रोजगारातही महाराष्ट्र अग्रेसर! ईपीएफओच्या आकड्यांनी सरकारची डोकेदुखी कमी, काय सांगतायेत आकडे?
गूड न्यूज, रोजगार वाढलाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 12:12 PM

EPFO Maharashatra | रोजगाराच्या(Employment) संधीच्या शोधात असलेल्या तरुणांना खासगी क्षेत्रानेही मदतीचा हात दिला आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO)दिलेल्या आकडेवारीनुसार देशभरात रोजगार वाढला आहे. पण सर्वच क्षेत्रात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्राने (Maharashatra) तरुणांच्या हातांना जादा रोजगार दिला आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आकडेवारीने सरकारची डोकेदुखी कमी केली आहे तर तरुणांची उमेद वाढवली आहे. 20 ऑगस्ट 2022 रोजी ईपीएफओने ही आकडेवारी जारी केली आहे. वेतनश्रेणीच्या डेटावरुन (Payment Data) ही माहिती देण्यात आलेली आहे. ताज्या आकड्यांनुसार, EPFO ​​ने जून 2022 मध्ये एकूण 18.36 लाख सदस्य जोडले आहेत. जून 2022 मध्ये एकूण सदस्यांची संख्या मागील महिन्याच्या म्हणजेच मे 2022 च्या तुलनेत 9.21% वाढले आहेत. ही समाधानकारक बाब आहे. गेल्या वर्षी 2021 मधील जून महिन्याच्या तुलनेत या वर्षी जून महिन्यात 5.53 लाख पगारदार वाढले आहेत. हा आकडा कमी असला तरी उमेद जागवणार आहे.

तरुणांना सर्वाधिक नोकऱ्या

वेतन डेटावर नजर टाकल्यास, जून महिन्यात तरुणांना सर्वाधिक नोकऱ्या मिळाल्याचे दिसून येते. 22-25 वयोगटातील तरुणांना जून,2022 मध्ये 4.72 लाख नोकऱ्या मिळाल्या. याचा अर्थ व्यावसायिक अभ्यासक्रम अथवा पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तरुणांचे नोकरीचे स्वप्न लागलीच पूर्ण झाले आहे. संघटित क्षेत्रात या तरुणांना लागलीच पहिले नोकरी मिळाली आहे.

महाराष्ट्र आघाडीवर

वेतनश्रेणीच्या राज्यनिहाय आकडेवारीत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली या राज्यांचा क्रमांक लागतो. या राज्यांमधील आस्थापनांत एका महिन्यात सुमारे एकूण 12.61 लाख सदस्य वाढले आहेत. विशेष म्हणजे 68.66 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

महिलांना ही संधी

लिंगनिहाय आकडेवारीने महिलांनाही रोजगाराच्या संधी दिल्याचे दिसून येते. महिन्याभरात सुमारे 4.06 लाख महिलांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जून, 2022 मध्ये 18.37 टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 3.43 लाख तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. संघटित क्षेत्रातील महिला कर्मचार्‍यांचा सहभाग गेल्या 12 महिन्यांत सर्वाधिक झाल्याचे दिसून आले. मे 2022 मध्ये 20.37% टक्के महिलांना तर जून 2022 मध्ये 22.09% टक्के महिलांना नोकरी मिळाली.

या उद्योगांमध्ये रोजगार

उद्योग-निहाय वेतनश्रेणी डेटानुसार, लेबर फोर्स एजन्सी, खाजगी सुरक्षा एजन्सी आणि छोटे कंत्राटदारांना आणि व्यापार-व्यावसायिक आस्थापनांमध्ये एकूण 47.63 टक्के जणांना रोजगार दिला. शाळा, कापड गिरण्या, विशेष सेवा आणि ब्रँडेड कपड्यांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांमध्ये नोकरीसोबतच वेतनवाढ ही देण्यात आली आहे.  देशातील बेरोजगारांच्या हाताला या क्षेत्राने मदतीचा हात पुढे केला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.