Maharashtra political crisis: महाराष्ट्राचे बंडखोर आमदार गुवाहटीला गेले अन् विमान तिकिटाचे भाव वाढले, पण राज्याच्या राजकारणात किती भाव?

गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनले आहे. गुवाहाटीला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने विमानाचे तिकीट देखील महाग झाले आहेत.

Maharashtra political crisis: महाराष्ट्राचे बंडखोर आमदार गुवाहटीला गेले अन् विमान तिकिटाचे भाव वाढले, पण राज्याच्या राजकारणात किती भाव?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 11:34 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांचा आकडा वाढत असून, तो 41 वर पोहोचला आहे. तसेच सहा अपक्ष आमदारांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता हा आकडा 47 च्या घरात पोहोचला आहे. आज देखील तीन आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना आसामच्या गुवाहाटीमधील (Guwahati) एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र बनले आहे. गुवाहाटीला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने विमानाचे तिकीट (Plane ticket) देखील महाग झाले आहेत. विमानाच्या तिकीटाचे दर हे एक हजार ते दोन हजार रुपयांनी महागले आहेत. आता मुंबईहून गुवाहाटीला जाण्यासाठीच्या विमान तिकीटांसाठी सात ते  दहा हजार रुपये मोजावे लागत आहेत.

गुवाहाटीला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ

शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेल्या आमदारांना सध्या गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील घडामोडींच्या दृष्टीने  गुवाहाटीला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. गुवाहाटीला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. राज्यासह देशातील बड्या नेत्यांच्या गुवाहाटीला चकरा सुरूच असल्याने विमानाचे तिकीट वाढले आहे. एकनाथ शिंदेंसह या 47 आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या हॉटेलच्या बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे या आमदारांना भाजप मदत करत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

ईडीच्या भीतीने आमदार पळाले

दरम्यान दुसरीकडे संजय राऊत यांचा आरोपांचा सपाटा सुरूच आहे. ईडीच्या भीतीने आमदार पळाले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेचे आमदार पळवण्यामागे भाजपाचे कारस्थान असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. यापूर्वी त्यांनी एकनाथ शिंदेंवर देखील आरोप केले होते. आमदारांवर दबाव टाकून त्यांचे अपहरण करून त्यांना सुरतला नेण्यात आले असं राऊत यांनी म्हटलं होतं. राऊत यांच्या या टीकेला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जर आमदारांवर दबाव टाकला तर ते आसामला कसे पोहोचले असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.