Liquor Share | दारु होणार महाग, मद्यप्रेमीच नाही तर शेअरधारकांचा बिघडला ‘मूड’

Liquor Share | राज्य सरकारने मद्यप्रेमींना जोरदार झटका दिला आहे. या 1 नोव्हेंबरपासून राज्यात दारु महागणार आहे. सरकारने मूल्यवर्धित करात (VAT) 5 टक्के वाढीची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम केवळ मद्यबाजारावरच दिसणार नाही तर शेअर बाजारात पण त्याचे पडसाद उमटणार आहे. काही शेअरवर गुंतवणूकदारांना लक्ष ठेवावे लागणार आहे. सोमवारी बाजारात हे शेअर कसे ट्रेड करतात, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

Liquor Share | दारु होणार महाग, मद्यप्रेमीच नाही तर शेअरधारकांचा बिघडला 'मूड'
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 8:05 PM

मुंबई | 22 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्र सरकारने मद्यप्रेमींना जोरदार झटका दिला आहे. राज्य सरकारने मूल्यवर्धित करात (VAT) 5 टक्के वाढीची घोषणा केली आहे. आता व्हॅट 10 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून राज्यात दारु महागणार आहे. हा बदल केवळ क्लब, लाऊंज, बारमधील मद्यप्रेमींवर लागू असेल. नॉन काऊंटर सेलवर त्याचा परिणाम होणार नाही. पण या दरवाढीचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटतील. राज्य सरकारच्या या निर्णयाचा परिणाम Liquor Segment मध्ये दिसेल. मद्यविक्री करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरवर त्याचा परिणाम दिसेल. हा परिणाम शॉर्ट टर्म असेल. महसूल वाढविण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. सोमवारी त्याचा परिणाम शेअरवर दिसेल. तेव्हा बाजारात या स्टॉकवर गुंतवणूकदारांना लक्ष ठेवावे लागणार आहे.

या कंपन्यांच्या शेअरवर दिसू शकतो परिणाम

राज्य सरकारच्या या निर्णयाचा परिणाम युनायटेड स्पिरिट्स (United Spirits), युनायटेड ब्रूअरीज (united breweries), रेडिको खेतान (Radico Khaitan), सुला वाईनयार्ड्स (Sula Vineyards) तिलक नगर इंडस्ट्री (Tilaknagar Industries), सोम डिस्टिलरीज अँड ब्रेवरीज लिमिटेड (SOM Distilleries and Breweries), पिकाडली एग्रो (Piccadilly Agro Inds) या कंपन्यांच्या शेअरवर दिसू शकतो. याशिवाय भारतीय शेअर बाजारात इतर पण दारु कंपन्यांचे शेअर आहेत, त्यावर कदाचित परिणाम दिसू शकतो.

हे सुद्धा वाचा

युनायटेड ब्रुअरीजमध्ये शुक्रवारी तेजी

युनायटेड ब्रुअरीज या कंपनीने या आर्थिक वर्षातील तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. त्यात कंपनीचा नफा 20 टक्के घसरुन 107.6 कोटींवर आला आहे. तर कंपनीचा महसूल 14.13% वाढून 1890.1 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीचा एबिटडा मार्जिन 13.04% घसरुन 9.75 टक्क्यांवर आला आहे. तरीही शुक्रवारी या कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 4 टक्क्यांची तेजी दिसून आली. गेल्या सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने केवळ 11 टक्क्यांचा फायदा मिळवून दिला आहे.

भारतात दारुची आयात वाढली

गेल्या काही वर्षांपासून भारतीयांना पण महागड्या दारुचा शौक चढला आहे. गेल्या वर्षी जगभरात 6.2 अब्ज पौंडची व्हिस्की आयात करण्यात आली होती. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आयातीत 37 टक्के वृद्धी आली. ब्रिटन हा व्हिस्कीचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक आहे. इंग्लंडने सर्वाधिक स्कॉच अमेरिकाला निर्यात केली आहे. स्कॉटलँडकडून अमेरिकेला 105.3 कोटी डॉलरची व्हिस्की पाठविण्यात आली आहे. तर भारताला 28.2 कोटी पौंडची व्हिस्की पाठविण्यात आली आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.