Kirloskar : एकुलती एक मुलगी 500 कोटींच्या व्यवसायाची मालकीण, टाटांच्या सूनेच्या खाद्यांवर आली मोठी जबाबदारी..

Kirloskar : कोण आहेत मानसी किर्लोस्कर? या समूहाच्या मालकीच्या इतक्या आहेत कंपन्या..

Kirloskar : एकुलती एक मुलगी 500 कोटींच्या व्यवसायाची मालकीण, टाटांच्या सूनेच्या खाद्यांवर आली मोठी जबाबदारी..
मोठ्या व्यावसायिक समूहाची जबाबदारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 8:40 PM

नवी दिल्ली : उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांच्या मृत्यूनंतर त्यांची एकुलती एक मुलगी मानसी किर्लोस्कर (Manasi Kirloskar) यांच्या खाद्यांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. असा अंदाज लावण्यात येत आहे की, त्याच या कुटुबांची उत्तराधिकारी असतील. अद्याप अधिकृतरित्या याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मानसी किर्लोस्कर यांनी यापूर्वी ही अनेक जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.

32 वर्षांच्या मानसी किर्लोस्कर या वडिलांची कंपनी किर्लोस्कर सिस्टम लिमिटेडच्या (Kirloskar Systems Ltd) संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडिलांसोबत विविध जबाबदाऱ्या स्वीकारल्या आहेत.

त्यांचे लग्न 2019 साली नोएल टाटा यांचा मुलगा नेविल टाटा याच्यासोबत झाला आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे भाऊ आहेत. मानसी किर्लोस्कर यांनी वडिलांच्या कंपनीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांचे पतीही मोठे उद्योजक आहेत.

हे सुद्धा वाचा

मानसी किर्लोस्कर यांची त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच उत्तुंग भरारी घेतली. 2018 साली संयुक्त राष्ट्रांच्यावतीने त्यांची बिझनेस लिडर म्हणून निवड झाली. त्यांनी अमेरिकेतील रोड आयलंड स्कूल ऑफ डिझाईनमधून पदवी घेतली आहे.

मानसी यांना व्यावसायासोबतच पेटिंगची ही मोठी आवड आहे. त्यांनी वयाच्या 13 वर्षी त्यांच्या पेटिंगचे प्रदर्शन भरवले होते. त्यांना पोहण्याचीही मोठी आवड आहे. त्यांच्याकडे नेतृत्व गुण असून निर्णय घेण्याची क्षमता ही आहे. त्यांनी व्यवसायातही मोठंमोठ्या पदावर काम केले आहे.

किर्लोस्कर समूहात सध्या 8 कंपन्या आहेत. या कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. या कंपन्यांमध्ये किर्लोस्कर ब्रदर्स (KBL),किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड (KIL),किर्लोस्कर फेरम इंडस्ट्रीज लिमिटेड(KFIL), किर्लोस्कर ऑयल इंजिन लिमिटेड (KOIL), किर्लोस्कर न्यूमेटिक कंपनी लिमिटेड (KPCL), किर्लोस्कर इलेक्ट्रिक लिमिटेड ( KECL), एनवायर इलेक्ट्रोडाइन लिमिटेड आणि जी जी दांडेकर मशिन वर्क्स लिमिटेड यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.