Rupees : जगावर राज्य करेल ‘रुपया’, अमेरिका आणि चीनची अशीच नाही उडाली झोप

Rupees : सध्या अमेरिकेसह चीनला भारतीय रुपयाच्या अधिक्रमणाची विशेष चिंता वाटत आहे. रुपयाची आक्रमक वाटचाल त्यासाठी कारणीभूत ठरत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असली तरी डॉलर पर्याय ठरण्याची तयारी रुपयाने सुरु केली आहे.

Rupees : जगावर राज्य करेल 'रुपया', अमेरिका आणि चीनची अशीच नाही उडाली झोप
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 2:42 PM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात डॉलरचा (Dollar) धाक कमी झाल्याचे दिसते. चीनचे चलन जागतिक बाजारात आगेकूच करण्यासाठी प्रयत्न करत आहे. जागतिक बाजारात रशिया-युक्रेन युद्धाने समीकरणं बदलली. युरोपात भारतीय तेल उत्पादक कंपन्यांमार्फत कच्चे तेल आणि नैसर्गित गॅस पोहचत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं नाणं खणखणत आहे. चीन (China) डॉलरला आव्हान देत असतानाच भारतीय रुपयाने जगातील अनेक अर्थव्यवस्थांना भूरळ घातली आहे. चीन कर्जाच्या विळख्यात अडकवून मांडलिकत्व स्वीकारायला लावत आहे. तर भारत सौहार्दपूर्ण व्यापारामुळे अनेक देशांना आपलंस करत आहे. त्यामुळेच अमेरिका आणि चीनला भारतीय रुपयाची (Indian Currency Rupees) भीती वाटत आहे.

रुपया जागतिक बाजारात बुधवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्यी इंटर डिपार्टमेंटल ग्रुपची बैठक झाली. बैठकीनंतर जे धोरण समोर आली आहेत. त्यामुळे चीन आणि अमेरिकेचा तिळपापड झाला. सध्याच्या जागतिक बाजाराचा आढावा घेता, भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय चलन म्हणून सक्षम असल्याचा दावा आरबीआयने केला. त्यामुळे अनेक मोठ्या अर्थव्यवस्थांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लवकरच चित्र पालटेल मोदी सरकार आणि आरबीआयच्या मते, रुपया लवकरच सक्षम पर्याय ठरणार आहे. डॉलर, युआन, युरोला रुपयाचा सक्षम पर्याय मिळले. रशियावर अमेरिकेसह युरोपने आर्थिक प्रतिबंध लावले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात रशियाची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळेच डॉलरला सक्षम पर्याय देण्यासाठी चीन गतीने पुढे आला असला तरी चीन विश्वाहर्तेच्या कसोटीवर खरा उतरत नाही. चीनची प्रतिमा डागळलेली आणि विश्वासघातकी म्हणून आहे. त्याचा भारताला फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

डॉलरचे वर्चस्व का? गेल्या दोन शतकांपासून अमेरिकेच्या घडामोडींचा मोठा परिणाम जगावर झाला. मोठा लोकशाहीवादी देश म्हणून अनेक देशांना अमेरिका आजही जवळचा वाटतो. त्यातच दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचा सुकाणू अमेरिकेने हातात घेतला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था बलाढ्य आहे. अनेक देशांचा कारभार अमेरिकेवर निर्भर आहे. तिचे आर्थिक नेटवर्क, राजकीय दहशत, शेअर बाजाराची छाप संपूर्ण जगावर आहे. आधुनिक तंत्रज्ञान, शस्त्रास्त्र निर्मिती, संशोधन, शिक्षण, आरोग्य क्षेत्रात आजही अमेरिकेचे वर्चस्व कायम आहे. त्यामुळेच डॉलरचे वर्चस्व कायम आहे.

रुपयामुळे काय होणार फायदा जागतिक बाजारात आता अनेक देश भारतीय रुपयाला प्राधान्य देत आहेत. कारण भारतीय रुपया जोखीम कमी करतो. भारतीय बाजाराची स्थिरता, आर्थिक मंदीचा दोन वेळा कमी प्रभाव भारतीय बाजारपेठेवर दिसून आला. तर गेल्या काही वर्षांपासून भारत झपाट्याने बदलला आहे. अनेक मोठे उद्योग, स्टार्टअप, युनिकॉर्न कंपन्यांचे जाळे उभारण्यात आले आहे. जागतिक बाजारात भारतीय कंपन्यांचा डंका वाजत आहे. भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत थेट पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे रुपयाची ताकद जागतिक समुदाय ओळखून आहे.

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.