AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी, गौतम अदानी या व्यक्तीसमोर टिकले नाही, केवळ नऊ महिन्यात कमवले 6.52 लाख कोटी रुपये

mukesh ambani and gautam adani net worth: मेटा पुढील 20-30 वर्षांसाठी आघाडीची तंत्रज्ञान कंपनी राहील. त्यांचे लक्ष नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर आहे. सध्याच्या काळात केवळ नफा मिळवणे हे त्यांचे लक्ष्य नाही. तर पुढील 100 वर्षांसाठी मेटाची वेगळी ओळख निर्माण करणे आहे.

मुकेश अंबानी, गौतम अदानी या व्यक्तीसमोर टिकले नाही, केवळ नऊ महिन्यात कमवले 6.52 लाख कोटी रुपये
mukesh ambani and Gautam Adani
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 12:35 PM

भारतातील शेअर बाजारात दोन दिवसांपासून जोरदार घसरण सुरु आहे. या घसरणीमुळे रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या मालमत्तेत चांगलीच घट झाली आहे. जागतिक श्रीमंताच्या यादीत टॉप 10 मध्ये हे नाहीत. परंतु 2004 पूर्वी ज्या व्यक्तीचे नाव माहीत नव्हते, त्याने मागील नऊ महिन्यात 78 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 6.52 लाख कोटी रुपये कमवले आहे. जागतिक श्रीमंताच्या यादीत ते दुसऱ्या क्रमांकावर पोहचले आहे. ते व्यक्ती म्हणजे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग आहे.

2004 मध्ये फेसबुकची स्थापना

मार्क झुकरबर्ग यांनी 20 वर्षांपूर्वी 2004 मध्ये फेसबुकची स्थापना केली. आता फक्त 20 वर्षांत ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्त झाले आहेत. मेटाचे सीईओ असलेल्या झुकरबर्ग यांनी अ‍ॅमेझानचे फाऊंडर जेफ बेजोस यांना मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार, मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती 206.2 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 17.22 लाख कोटी झाली आहे.

9 महिन्यात कमवले 6.52 लाख कोटी रुपये

मार्क झुकरबर्ग यांची संपत्ती 2024 मधील पहिल्या 9 महिन्यांत 78 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 6.52 लाख कोटी रुपये वाढली आहे. मेटाच्या शेअरमध्ये 70% वाढ झाल्यामुळे ही संपत्ती वाढली आहे. मेटाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानात गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. यामुळे मार्क झुकरबर्ग यांना चांगलाच फायदा झाला आहे.

हे सुद्धा वाचा

मेटाचे यश AI मधील गुंतवणुकीमुळे वाढले आहे. यापूर्वी 2022 मध्ये कंपनी संकटात आली होती. त्यानंतर कॉस्ट कटींगमुळे करत 21 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले होते. मात्र, यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवला आणि कंपनी पुन्हा स्थिर झाली.

मार्क झुकरबर्गने आपल्या कंपनीच्या दीर्घकालीन योजना आधीच सांगितल्या आहेत. मेटा पुढील 20-30 वर्षांसाठी आघाडीची तंत्रज्ञान कंपनी राहील. त्यांचे लक्ष नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर आहे. सध्याच्या काळात केवळ नफा मिळवणे हे त्यांचे लक्ष्य नाही. तर पुढील 100 वर्षांसाठी मेटाची वेगळी ओळख निर्माण करणे आहे.

जगातील टॉप 5 श्रीमंत व्यक्ती

  1. इलॉन मस्क- 256 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 21.40 लाख कोटी
  2. मार्क झुकरबर्ग- 206.2 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 17.22 लाख कोटी
  3. जेफ बेझोस- 205.1 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 17.13 लाख कोटी
  4. बर्नार्ड अर्नॉल्ट- 203 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 16.96 लाख कोटी
  5. वॉरेन बफेट- 121.7 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 10.16 लाख कोटी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.