Maya Tata : टाटा समूहात मोठी जबाबदारी खांद्यावर, माया टाटा आहेत तरी कोण?

Maya Tata : टाटा समूहाचा पुढील वारस कोण याची चर्चा सातत्याने सुरु असते. माया टाटा यांच्याविषयी चर्चा होत असते. रतन टाटा यांच्याशी त्यांचे खास नाते आहे. कंपनीत त्या मोठी जबाबदारी पेलत आहेत. ती आता 34 वर्षांची आहे. ती सोशल मीडियापासून दूर असते.

Maya Tata : टाटा समूहात मोठी जबाबदारी खांद्यावर, माया टाटा आहेत तरी कोण?
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 3:02 PM

नवी दिल्ली | 25 ऑगस्ट 2023 : टाटा समूहाच्या (Tata Group) पुढील वारसाची सातत्याने चर्चा सुरु असते . टाटा समूहाचा कारभार देशासह परदेशात पण पसरलेला आहे. टाटा समूहाचा कारभार पुढील पिढीकडे देण्याची वेळ आली आहे. त्यादृष्टीने पाऊलं पण टाकण्यात येत आहे. माया टाटा (Maya Tata ) ही या नवीन पिढीचा चेहरा आहे. यामध्ये इतर पण वारस आहे. पण माया टाटा विषयी फारच कमी लोकांना माहिती आहे. माया टाटा प्रसिद्धीपासून दूर असते. ती सोशल मीडियापासून दूर आहे. टाटा समूहातील जबाबदारीचे पद तिच्याकडे आहे. ती सिमोना टाटा (Simona Tata) यांची नात आहे. तर रतन टाटा (Ratan tata) यांची पुतणी आहे. टाटा समूहाने मध्यंतरी दिवंगत सायरस पालोनजी मिस्त्री यांच्यावर भरवसा दाखवला होता. पण टाटा समूह आणि त्यांच्यात बेबनाव झाला होता. यावर्षी एका रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू ओढावला होता. त्यानंतर समूहाची जबाबदारी आता कोणत्या टाटांच्या वारसदारांकडे जाणार, यावर चर्चा झडत असते.

सायरस मिस्त्री यांच्या घरात जन्म

रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा आणि टाटा समूहाचे पूर्व चेअरमन सायरस मिस्त्री यांची बहिण आलू मिस्त्री यांच्या घरी मायाचा जन्म झाला होता. माया ही नवल टाटा आणि त्यांची दुसरी पत्नी सिमोना टाटा यांची नात आहे. मायाची आजी सिमोना टाटा यांनी लॅक्मे अँड ट्रेंट्सची स्थापना करण्यात मोठी भूमिका निभावली होती. त्यांनी जागतिक पातळीवर हा ब्रँड नावारुपाला आणला होता.

हे सुद्धा वाचा

कुठे झाले शिक्षण

माया टाटा यांचे शिक्षण इंग्लंडमधील बेयस बिझनेस स्कूल आणि वारविक विश्वविद्यालयात झाले आहे. त्यांनी टाटा कॅपिटलची सहायक कंपनी टाटा अपॉर्च्युनिटीज फंडमध्ये महत्वाच्या पदी जबाबदारी घेतली. त्यांनी टाटा समूहात एंट्री घेतली. माया टाटाने पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि गुंतवणुकीसंबंधी व्यवसायात तिचे कौशल्य दाखवले आहे. त्यामुळे कॉर्पोरेट जगतातील आव्हाने आणि ती सोडविण्याचे कसब तिने आत्मसात केले.

टाटा डिजिटलमध्ये अनुभव

टाटा अपॉर्च्युनिटीज फंड बंद झाल्यानंतर मायाच्या करिअरने नवीन वळण घेतले. ती टाटा समूहाची सहायक कंपनी टाटा डिजिटलसोबत जोडल्या गेली. एन चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वात टाटा डिजिटलसाठी 1,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली.

रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल

टाटा समूहात रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली माया टाटा यांची वाटचाल सुरु आहे. माया टाटा यांना टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या मंडळात माया, तिची बहिण लिआ आणि भाऊ नेविल यांच्यासोबत समावेश करण्यात आला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.