Meesho Employees | मीशोचा ग्रोसरी शो ऑफ! 300 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Meesho Employees | ऑनलाईन कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोने 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनीने नुकतेच किराणा व्यवसायात पाऊल ठेवले होते. पण त्याचा पसारा वाढण्यापूर्वीच कंपनीने या व्यवसायाचे शटर डाऊन केले.

Meesho Employees | मीशोचा ग्रोसरी शो ऑफ! 300 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
कर्मचाऱ्यांना काढले Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 3:14 PM

Meesho Employees | ऑनलाईन कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोने (Meesho) 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनीने नुकतेच किराणा व्यवसायात(Grocery) पाऊल ठेवले होते. पण त्याचा पसारा वाढण्यापूर्वीच कंपनीने या व्यवसायाचे शटर डाऊन केले. मीशोची सुपरस्टोअर 6 राज्यांमध्ये होती. या किराणा स्टोअरची सुरुवात कर्नाटकपासून झाली आणि या वर्षाच्या अखेरीस आणखी 6 राज्यांमध्ये (State)स्टोअर सुरू करण्याची योजना होती. पण कंपनीने त्यांचा ग्रोसरीचा 90 टक्के व्यवसाय बंद केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ही कपात (Employees Reduction) करण्यात आली. कंपनीने आता केवळ नागपूर आणि म्हैसूर येथीलच स्टोअर सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात स्टार्टअपमध्ये नव्याने नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाने धक्का बसला आहे. गेल्या वर्षभरात स्टार्टअपमध्ये नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला नाही.

मीशोकडून प्रतिक्रिया नाही

ग्रोसरी बंद करण्याविषयी आणि कर्मचारी काढण्याविषयी मीशोकडून सध्या कोणतेही वक्तव्य आलेले नाही. यापूर्वी ही औषधी ऑनलाईन व्यवसायासाठी कंपनीने 150 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. तेव्हा किराणा व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याचे सांगितले होते. तसेच फार्मसीचा व्यवसाय सुरु नव्हता आणि कंपनीकडे उत्पन्न येत नसल्याने हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले होते.

भांडवलाची कमतरता प्रमुख कारण

कोरोना काळात कंपनीने 200 कर्मचाऱ्यांना कमी केले होते. एका वृत्तानुसार, या कंपनीकडे भांडवलाची कमतरता आहे. परिणामी कंपनी सातत्याने कर्मचाऱ्यांना नारळ देत आहे. तसेच कंपनीला नवनवीन व्यवसायात ही भूर्दंड सहन करावा लागला आहे. ग्रोसरीचा व्यवसाय कंपनीने 6 राज्यांत सुरु केला होता. परंतू, पुरवठ्याची साखळी तयार करण्यात आणि मालाची पोहच मिळवण्यात कंपनीला अडचणी आल्या. त्यामुळे शेवटी ग्रोसरी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. कंपनीचे सीईओ विदित अत्रे यांना सुपरस्टोअरला मीशोच्या मुख्य अॅपसह एकत्रित करायचे आहे.

हे सुद्धा वाचा

स्टोअर कुठे होती?

मीशोने कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सुपर स्टोअर सुरू केले होते. कंपनीने कर्नाटकात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुपरस्टोअर सुरू केले. 2022 च्या अखेरीस 12 राज्यांमध्ये सुपरस्टोअर्स सुरू करण्याचे कंपनीचे लक्ष्य होते.

कंपनीच्या युजर्सची संख्या वाढली

एकीकडे कंपनी कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकत असताना, दुसरीकडे त्यांच्या युजर्सची संख्या वाढत आहे. कंपनीनेच दावा केला आहे की मार्च 2021 नंतर त्यांच्या प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांची संख्या 5.5 पट वाढली आहे. मीशोने अलीकडेच 100 दशलक्ष युर्जसचा टप्पा गाठला आहे.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.