Bombay Dyeing : मुंबईतील सर्वात मोठा सौदा! या मालमत्तेसाठी इतक्या हजार कोटींची बोली

Bombay Dyeing : बॉम्बे डाईंग कंपनीचे वरळीतील मुख्य कार्यालय विक्री होत आहे. ही आतापर्यंतची सर्वात हॉट डील ठरली आहे. वरळी हा मुंबईतील महागडा परिसर आहे. पण या मालमत्ता विक्रीने आतापर्यंतचे रेकॉर्ड इतिहास जमा केले आहेत. इतक्या हजार कोटींनी हा सौदा ठरला..

Bombay Dyeing : मुंबईतील सर्वात मोठा सौदा! या मालमत्तेसाठी इतक्या हजार कोटींची बोली
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 9:23 AM

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) मालमता विक्रीचे अनेक किस्से आपण ऐकतो. मुकेश अंबानी यांच्या आलिशान घरापासून ते मोठ-मोठ्या कार्यालयाच्या कोट्यवधींचे सौदे अचंबित करतात. मुंबईतील बड्या लोकांकडे कोट्यवधींची आलिशान बंगले आहेत. अशीच एक हॉट डील वरळी परिसरात झाली. बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे मुख्यालय (Bombay Dyeing Head Quarter) विक्री होत आहे. याठिकाणी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे बॅस्टियन रेस्टॉरंट होते, ते या डीलमुळे बंद होत आहे. वरळीच (Worli) नाही तर दक्षिण मुंबईतील हा सर्वात महागडा सौदा ठरला आहे. इतक्या हजार कोटींची बोली ऐकून अनेक दिग्गजांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. इतक्यात ठरला हा सौदा

इतक्या कोटींचा सौदा

मुंबईतील वरळी परिसरात बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे मुख्यालय आहे. जवळपास 22 एकरच्या भूभागासाठी मालमत्ता करार (Land Deal)झाला. बॉम्बे डाईंग दोन टप्प्यात ही डील पूर्ण करणार आहे. ही डील एक, दोन हजारात होत नसून 5200 कोटी रुपयांमध्ये होत आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीला गोईसू रियल्टीकडून 4,675 कोटी रुपये मिळतील. तर दुसऱ्या टप्प्यात बॉम्बे डाईंगला 525 कोटी रुपये अटी आणि शर्तीं पूर्ण (14 September 2023) झाल्यावर मिळतील.

हे सुद्धा वाचा

मुख्यालय रिकामे, शिल्पा शेट्टीचे रेस्टॉरंट पण होणार बंद

सध्या बॉम्बे डाईंगच्या या मुख्यालयावर वाडिया इंटरनॅशनल सेंटर आहे. गेल्या आठवड्यात मुख्यालयातील वस्तू दुसरीकडे नेण्यात आल्या. त्यासाठी मोठ्या वाहनांचा वापर करण्यात आला. आता मुख्यालय पूर्णपणे रिकामे झाले आहे. तर चेअरमन नुस्ली वाडिया यांचे कार्यालय दादर-नेगॉम या त्यांच्याच मालकीच्या कार्यालयात नेण्यात आले. ही इमारत सध्याच्या इमारतीच्या मागील बाजूस आहे.

या कंपनीने केली खरेदी

जापानमधील गोईसू रिअल्टीने ही हॉट डील केली आहे. यापूर्वी कंपनीने 2019 मध्ये बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये MMRDA कडून 12,141 चौरस फुटाची जागा भाडेतत्वावर घेतली आहे. त्यासाठी कंपनीने 2238 कोटी रुपये जमा केले आहे. वाडिया इंटरनॅशनल सेंटरमध्येच शिल्पा शेट्टी हिचे बॅस्टियन रेस्टॉरंट आहे. ते पण लवकरच बंद होणार आहे.

8 एकरवर पार्क, 8 एकरवर हाऊसिंग सोसायटी

महाराष्ट्र मिल लँड पॉलिसीनुसार बॉम्बे डाईंगने त्यांची दादर-नेगॉम मिलमधील 8 एकर जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेला बगिचा वा इतर कामासाठी सोपवली. तर 8 एकरवर हाऊसिंग सोसायटी होणार आहे. त्यासाठी म्हाडाकडे ही जागा देण्यात येईल. या मेगा डीलमुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.