AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तरूण मंडळी विकत घेत आहेत घर, रियल इस्टेट क्षेत्रामध्ये घराची वाढू लागलीय मागणी!

रियल्टी सेक्टरमध्ये बाउंस बॅक एक ग्लोबल ट्रेंड म्हणून ओळखला जात आहे. अमेरिका, एम्सटर्डम, ब्रिटेन आणि सिंगापुर सारख्या प्रमुख प्रॉपर्टी बाजारात रियल्टी सेक्टरमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. सिंगापुरमध्ये रेजिडेंशियल की गगनाला भिडल्या आहेत.

तरूण मंडळी विकत घेत आहेत घर, रियल इस्टेट क्षेत्रामध्ये घराची वाढू लागलीय मागणी!
तरूण मंडळी विकत घेत आहेत घर, रियल इस्टेट क्षेत्रामध्ये घराची वाढू लागलीय मागणी !
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 9:43 PM

नवी दिल्ली : कोविड महामारीने (corona situation) सर्व सामान्य लोकांची जीवन शैलीच बदलून टाकली आहे. याचा परिणाम सगळे क्षेत्रावर प्रामुख्याने जाणवला यामध्ये असे कोणतेच क्षेत्र नाही आहे की ज्याला कोरोनाची बसली नाही, त्यातील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे बाजारातील रियल्टी सेक्टर. या रियल्टी सेक्टरवर (real sector) सुद्धा या कोरोना महामारीचा वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम जाणून आला. अनेक प्रोजेक्ट या काळात ठप्प झाले. अनेकांनी कोरोना पूर्वी घर घेतले त्यांचे ईएमआय थकले आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर या क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. हा सकारात्मक बदल आपल्याला जागतिक पातळीवर सुद्धा दिसून येत आहे. बिजनेस टुडेच्या Brainstorm Budget 2022 कार्यक्रमात एनारॉक प्रॉपर्टी कंसल्टेंटचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले की, 2020 वर्षी पहिल्या लॉकडाउननंतर रेजिडेंशियल सेक्टरमध्ये खूप घसरण झाली होती. परंतु 2021 मध्ये कोविडची दुसरी लाट आल्यानंतर या क्षेत्रात ऐतिहासिक डिमांड म्हणजेच मागणी (demand) पाहायला मिळाली. या क्षेत्रात झालेला तोटा पुन्हा आता नव्याने भरून निघण्याची आशा देखील वर्तवली जात आहे.

अशा प्रकारे लोकांनी दिला प्रतिसाद

पुरी यांनी सांगितले की, लोकांनी या क्षेत्राबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिसाद दिलेले आहेत. कोविड नंतर अनेकांच्या गरजा बदललेल्या आहेत. या महामारीच्या दरम्यान अनेकांनी वर्क फ्रॉम होम या बदललेल्या पद्धतीला पाठिंबा दिला. तसेच अनेकांना मोठ्या घरांची गरज भासू लागली. या काळा दरम्यान घराचे व्याजदर सुद्धा कमी झाले त्याचबरोबर भाडोत्री – मालक यांच्यासाठी असलेले नवीन नियम या सगळ्या गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या ठरत होत्या. म्हणूनच या सर्व गोष्टींच्या वाढत्या मागणीमुळे सकारात्मक परिणाम या सेंटरमध्ये पाहायला मिळत आहे. अनेकजण घर विकत घेण्यासाठी मोठी डिमांड सुद्धा करत आहेत.

अब्जाधीश लोक सुद्धा खरेदी करत आहेत घर

अनुज पुरी यांनी सांगितले की, या संपुर्ण परिस्थितीमध्ये एक ट्रेंड आवर्जून पाहायला मिळाला तो म्हणजे घर विकत घेण्यासाठी तरुण मंडळी महागडे घर मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी पुढे येत आहेत आणि म्हणूनच आधी घर नसलेले तरुण मंडळी सुद्धा या महामारीच्या दरम्यान स्वतःचे नवीन घर विकत घेण्याचे स्वप्न पाहत आहेत. या नवीन आलेल्या ट्रेंडमुळे घराच्या किमती देखील वाढताना पाहायला मिळत आहेत. या सर्वांचा परिणाम असा की रिअल इस्टेटमध्ये सोन्याचे दिवस येतील, असे पुन्हा सांगितले जात आहे.

ग्लोबल ट्रेंड ठरणार आहे रियल्टी सेक्टरमधील होणारा नफा..

रियल्टी सेक्टरमध्ये या सकारात्मक बदलांना एक ग्लोबल ट्रेंड म्हणून नाव दिले जात आहे. अमेरिका, एम्सटर्डम, ब्रिटेन आणि सिंगापुर सारखे प्रमुख प्रॉपर्टी बाजारात रियल्टी सेक्टरमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहे. सिंगापुरमध्ये रेजिडेंशियलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या वर्षात म्हणजे 2022 मध्ये मार्केट असेच रहावे अशी अनेक या सेक्टरमधील तज्ज्ञांची इच्छा आणि अपेक्षा आहे जेणेकरून कोविडमध्ये झालेली हानी आणि या क्षेत्रातील तोटा नव्याने भरून काढता येईल.

इतर बातम्या

GOLD PRICE TODAY: महाराष्ट्रात पन्नास हजारी ‘गोल्डन’ डंका; मुंबईत सोनं महागलं, जाणून घ्या आजचे भाव

शेअर बाजारात घसरणीचं सत्र, सेन्सेक्स 59 अंकांनी गडगडला; रशिया-युक्रेन वादाचे पडसाद

'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा
पहलगाम हल्ला कोणाच्या आदेशावरून? पाकिस्तानी पत्रकाराचा खळबळजनक दावा.
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस
परिवाराच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे - मुख्यमंत्री फडणवीस.
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन
पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, पाकच्या सैन्याच थेट कनेक्शन.
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
काश्मीरचं मुघल गार्डन, दल लेक पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय
हल्ल्यातील महाराष्ट्रातील पीडित कुटुंबाला 50 लाख, CM यांचा मोठा निर्णय.