AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mobikwik चं डिजिटल प्रीपेड कार्ड, वॉलेटमध्ये 1 लाखापर्यंत रक्कम मिळणार

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे एक डिजिटल प्रीपेड कार्ड (Digital Prepaid Card) असणार आहे.

Mobikwik चं डिजिटल प्रीपेड कार्ड, वॉलेटमध्ये 1 लाखापर्यंत रक्कम मिळणार
Follow us
| Updated on: Nov 11, 2020 | 1:12 PM

नवी दिल्ली : घरेलू डिजिटल वॉलेट कंपनी मोबिक्विकने (MobiKwik) कार्ड कंपनी अमेरिकन एक्सप्रेससोबत एकत्र येत आपलं पहिलं ‘मोबिक्विक ब्लू अमेरिकन एक्सप्रेस कार्ड’ (MobiKwik Blue American Express Card) सादर केलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे एक डिजिटल प्रीपेड कार्ड (Digital Prepaid Card) असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोबिक्विकमध्ये अमेरिकेच्या एमेक्स व्हेंचर्सची गुंतवणूक आहे. हे कार्ड व्हॉलेटशी संलग्न करण्यात आलं आहे, असं कंपनीने सांगितलं. (mobikwik blue american express card get up to rs 100000 of mobikwik wallet balance)

मोबिक्विकचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपासना टाकू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबिक्विक ब्लू कार्ड मार्केटमध्ये आणणं हे एक विकसित वित्त तंत्रज्ञान कंपनी उभारण्याच्या दिशेने मोठं पाऊल आहे. तर ग्राहकांना गुंतवणूकीची सर्वाधिक उत्पादनं आणि सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं अमेरिकन एक्स्प्रेसचे उपाध्यक्ष आणि भारत आणि दक्षिण आशियासाठी ग्लोबल नेटवर्क सर्व्हिसेसच्या प्रमुख दिव्या जैन म्हणाल्या आहेत.

1 लाख रुपयांपर्यंत मिळेल मोबिक्विक वॉलेटचा बॅलेंस ग्राहकांना कंपनीने या कार्डद्वारे एक लाख रुपयांपर्यंत मोबिक्विक वॉलेटमध्ये बॅलेंस उपलब्ध करून दिला जाईल. आतापर्यंत मोबीक्विक ब्लू अमेरिकन एक्सप्रेस कार्ड हे सुमारे 2 लाख वापरकर्त्यांना देण्यात आलं असल्याची माहिती आहे. तुम्हीदेखील या कार्डसाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला आधी मोबिक्विक अॅप डाउनलोड करावा लागेल.

दिवाळी खरेदीवर मिळणार 20% बचत कार्ड यूजर्सना दिवाळी खरेदीवर दहा हजार रुपयांच्या खरेदीवर 1 टक्के सुपर कॅश आणि 20 टक्के बचत देण्यात आली आहे.

कसं कराल अल्पाय? मोबिक्विक ब्‍लू अमेरिकन एक्‍सप्रेस कार्ड मिळवण्यासाठी तुम्ही मोबाइलमध्ये मोबिक्विक अॅप डाऊनलोड करा. अर्ज कसा करावा. यानंतर अ‍ॅपमध्ये दिल्याप्रमाणे लॉगिन किंवा साइन अप करा. यावेळी तुम्हाला मोबाईल नंबर अ‍ॅपवर नोंद करावा लागेल. नोंदणी केलेल्या क्रमांकावर तुम्हाला ओटीपी येईल. संबंधित कोड टाकताच तुम्ही अ‍ॅप वापरण्यासाठी सक्षम असाल. यानंतर मुख्य स्क्रीनवर उजव्या कोपऱ्यात तुम्हाला अमेरिकन एक्सप्रेस लोगो दिसेल. लोगोवर क्लिक करून तुम्ही अमेरिकन एक्सप्रेसच्या प्रीपेड कार्डसाठी अल्पाय करू शकता.

इतर बातम्या – 

जनधन खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा नाही मिळणार 2.30 लाखांचा फायदा

Google Pay सह 5 बड्या कंपन्यांना मोठा झटका, CCI ने दिले चौकशीचे आदेश

(mobikwik blue american express card get up to rs 100000 of mobikwik wallet balance)

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.