Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sovereign Gold Bond Scheme | स्वस्तात सोने खरेदीची अशी संधी पुन्हा नाही, सरकारने जाहीर केला दर, या भावाने मिळणार सोने

Sovereign Gold Bond Scheme | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा (Sovereign gold bond scheme 2022-23) दुसरा टप्पा आज 22 ऑगस्टपासून सुरु होत आहे. या योजनेतंर्गत ग्राहकांना 5,197 रुपये प्रति ग्रॅम दराने सोन्यात गुंतवणूक करता येणार आहे.

Sovereign Gold Bond Scheme | स्वस्तात सोने खरेदीची अशी संधी पुन्हा नाही, सरकारने जाहीर केला दर, या भावाने मिळणार सोने
सोन्यात गुंतवणुकीचा मुहुर्तImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 7:00 AM

Sovereign Gold Bond Scheme | सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत गुंतवणूकदारांना जून महिन्यानंतर पुन्हा गुतंवणूक करण्याची संधी मिळाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign gold bond scheme 2022-23)आणली आहे. गोल्ड बाँडच्या विक्रीचा हा दुसरा टप्पा आहे. या योजनेची दुसरी मालिका आज, 22 ऑगस्टपासून सुरू होत आहे. 26 ऑगस्टपर्यंत या योजनेत देशातील गुंतवणूकदारांना गुंतवणूक करता येईल. सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) सातत्याने चढ उतार होत असते. आता तर भारतातच बुलियन एक्स्चेंजची(Billion Exchange) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोने आयात करणे सोप्पं झालं आहे. त्याचबरोबर देशभरात काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आता सोन्याचा एकच भाव (One Nation One Rate) राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणे हे फायदेशीर ठरणार आहे. रिझर्व्ह बँकेने या वर्षी 20 जून ते 24 जून दरम्यान पहिली मालिका सुरू केली होती.

एक ग्रॅमसाठी असा राहील दर

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने सोन्याचा दर निश्चित केला असून त्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, सोन्याची किंमत 5,197 रुपये प्रति ग्रॅम जाहीर करण्यात आली आहे. गुंतवणूकदार अगदी एक ग्रॅम सोने खरेदी करुन या योजनेत सहभागी होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

खरेदीवर 500 रुपयांचा फायदा

सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. हे रोखे केवळ निवासी व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे, ट्रस्ट् आणि धर्मादाय संस्थांना विक्री केले जाते. डिजिटल माध्यमातून गोल्ड बाँडसाठी अर्ज करणार्‍या आणि पैसे भरणार्‍या गुंतवणूकदारांना इश्यू किंमतीवर 50 रुपये प्रति ग्रॅम सूट दिली जाईल. म्हणजेच 10 ग्रॅम खरेदी केल्यास 500 रुपयांचा त्वरीत फायदा होईल. गुंतवणूकदारांना सहामाही आधारावर निश्चित किंमतीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज दिले जाईल.

सोने खरेदीचा नियम काय सांगतो?

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत, सरकार गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोने हातात देत नाही. परंतु सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी देते. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात 1 ग्रॅम ते 4 किलोपर्यंतचे सोने खरेदी करू शकतो. तर संस्थांना कमाल 20 किलो सोन्यात गुंतवणूक करता येते. या गुंतवणुकीवरील परतावा ही चांगला मिळतो. गेल्या एका वर्षात सोन्याने गुंतवणूकदारांना 7.37 टक्के नफा दिला आहे. बाँडचा एकूण कालावधी 8 वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास, ते 5 व्या वर्षानंतर बाँडमधून बाहेर पडू शकतात.

चोरीची भीती नाही

चोरट्यांना हे सोने चोरता येते नाही. कारण ते बॉंड स्वरुपात असते. गुंतवणूकदाराला सोने प्रत्यक्षरित्या साठवण्याची किंवा ठेवण्याची गरज नसते. याशिवाय, गुंतवणूकदाराला या योजनेतंर्गत बॉंड परिपक्तेवर सोन्याचा सध्याचा जो बाजार भाव सुरु असेल त्यानुसार परतावा मिळतो.

सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय

सोन्यात गुंतवणुकीचे (Gold Investment) अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत. भारतीयांचे सुवर्णवेड जगप्रसिद्ध आहे. चीन नंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने आयातदार आहे. किमतींतील अस्थिरता पाहता बाजारातील तज्ज्ञ आता सोन्यात हळूहळू आणि विविध पर्यायांसह गुंतवणूक करण्याचा सल्ला देत आहेत. भारतात सोन्यात गुंतवणुकीचे अनेक मार्ग आहेत ज्यांचा वापर केला जाऊ शकतो. साधारणपणे गुंतवणुकीचे तीन भाग केले जाऊ शकतात ज्यात सॉलिड सोने (Solid Gold) , पेपर सोने (Paper Gold) आणि डिजिटल सोने (Digital Gold) यांचा समावेश आहे.

IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं
IPL बघणं महागात पडलं; एसटी प्रशासनाने चालकाला थेट बडतर्फच केलं.
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध
'.. तर गावबंदी करू', मल्हार सर्टिफिकेटला जेजूरीच्या ग्रामस्थांचा विरोध.
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान
'मला शरद पवारांनी मंत्री केलं..', खतगावकरांचं अजितदादांसमोरच विधान.
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला
'तो आमचा विठ्ठल..' धाराशीवात खोक्याच्या समर्थनार्थ आदिवासी समाज एकवटला.
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास
संचारबंदी निघाली, नागपूरकरांनी 6 दिवसांनी घेतला मोकळा श्वास.
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका
एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका.
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना
मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना.
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.