Mukesh Ambani | गौतम अदानी पडले मागे, मुकेश अंबानी यांनी मारली श्रीमंतीत बाजी
Mukesh Ambani | भारतातील 1,319 श्रीमंतांकडे 1,000 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती आहे. श्रीमंतांच्या संपत्ती गेल्या पाच वर्षांत 76 टक्क्यांहून अधिकची वृद्धी झाली आहे. या यादीत शिव नादर यांच्याकडे 2,28,900 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. देशात सध्या 259 अब्जाधीश आहेत.
नवी दिल्ली | 10 ऑक्टोबर 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. हुरुन इंडिया श्रीमंतांची यादी 2023 (Hurun India Richest List) नुसार, मुकेश अंबानी यांनी गौतम अदानी यांना या यादीत धोबीपछाड दिली आहे. या वर्षात अदानी समूहाला जोरदार धक्के बसले. या समूहावर शॉर्ट सेलिंग फर्मचा हल्लाबोल सुरुच आहे. रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. 2014 मध्ये त्यांची संपत्ती 1,65,100 कोटी रुपये होती. आता ती 8,08,700 कोटी रुपये झाली आहे. त्यात चार पट वाढ झाली आहे. भारतातील श्रीमंतांच्या संख्यात जवळपास 38 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
अशी वाढली संख्या
या रिपोर्टनुसार देशामधील 1,319 श्रीमंतांकडे 1,000 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती आहे. गेल्या पाच वर्षांत श्रीमंतांच्या संपत्तीत एकूण 76 टक्क्यांहून अधिकची वृद्धी झाली आहे. या यादीत शिव नादर यांच्याकडे 2,28,900 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. देशात सध्या 259 अब्जाधीश आहेत.
गौतम अदानी यांच्याकडे इतकी संपत्ती
हुरुन इंडियाच्या आकडेवारीनुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण दिसून आली आहे. अदानी यांच्याकडे 4,74,800 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 2,78,500 कोटी रुपयांसह सायरस पुनावला या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
हुरुन इंडिया श्रीमंतांची यादी 2023
- 1) मुकेश अंबानी- 808,700 कोटी रुपये
- 2) गौतम अडानी- 474,800 कोटी रुपये
- 3) सायरस एस पूनावाला- 2,78,500 कोटी रुपये
- 4) शिव नाडर- 2,28,900 कोटी रुपये
- 5) गोपीचंद हिंदुजा- 1,76,500 कोटी रुपये
- 6) दिलीप सांघवी – 1,64,300 कोटी रुपये
- 7) एलएन मित्तल आणि कुटुंबीय- 1,62,300 कोटी रुपये
- 8) राधाकिशन दमानी- 1,43,900 कोटी रुपये
- 9) कुमार मंगलम बिर्ला- 1,25,600 कोटी रुपये
- 10) नीरज बजाज- 1,20,700 कोटी रुपये
देशातील श्रीमंतांची यादी
या यादीत शिव नाडर चौथ्या क्रमांकावर आहेत. 2,28,900 कोटींची त्यांची एकूण संपत्ती आहे. गोपीचंद हिंदूजासह त्यांचे कुटुंबिय यांच्याकडे 1,76,500 कोटींची संपत्ती असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत. दिलीप संघवी हे 1,64,300 कोटी रुपयांसह सहाव्या क्रमांकावर आहेत. एलएन मित्तल आणि कुटुंबिय 1,62,300 कोटींसह सातव्या क्रमांकवर आहेत. तर राधाकिसन दमानी आणि कुटुंबिय 1,43,900 कोटीसह आठव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर बिर्ला आणि बजाज कुटुंबियांचा क्रमांक लागतो.