Mukesh Ambani Birthday: अंबानींचं रिटर्न गिफ्ट! 65वा वाढदिवस 63 हजार कोटींचा नफा, रिलायन्स शेअर्स टॉपला

Reliance Share : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये तब्बल चार टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आणि आजच्या वधारणीच्या शेअर्समध्ये रिलायन्स अग्रक्रमावर पोहोचला.

Mukesh Ambani Birthday: अंबानींचं रिटर्न गिफ्ट! 65वा वाढदिवस 63 हजार कोटींचा नफा, रिलायन्स शेअर्स टॉपला
वाढदिवशी यापेक्षा सुंदर गिफ्ट काय असू शकेल?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 8:06 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात आज (मंगळवार) मोठ्या प्रमाणात घसरण नोंदविली गेली. सेन्सेक्स 700 अंकांनी गडगडला. एचडीएफसी बँक-एचडीएफसी विलनीकरणाचा उत्साह मावळल्यामुळं गुंतवणुकदारांना कोट्यावधी रुपयांवर पाणी सोडावं लागलं. मात्र, रिलायन्स शेअर्समध्ये (RELIANCE SHARE INVESTOR) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा दिवस आर्थिक हिताचा ठरला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये तब्बल चार टक्क्यांची वाढ नोंदविली गेली आणि आजच्या वधारणीच्या शेअर्समध्ये रिलायन्स अग्रक्रमावर पोहोचला. गुंतवणुकदारांच्या खिशात 63 हजार कोटी रुपयांची भर पडली. रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (MUKESH AMBANI) यांचा 65 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यामुळे स्टॉकमध्ये तेजी आणि अंबानीचा वाढदिवस असा दुहेरी आनंद रिलायन्स गुंतवणुकदारांच्या (RELIANCE INVESTOR) गोटात पसरला आहे.

रिलायन्स वाढता वाढे…

रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक आज (मंगळवार) 3.71 टक्क्यांच्या वाढीसह 2638.45 स्तरावर पोहोचला. कंपनीचा एकूण मार्केट कॅप 17,84,892.43 कोटी वर पोहोचला. आज व्यवहाराच्या दरम्यान स्टॉकची 2667 रुपयांवर ट्रेडिंग सुरू होती. आजच्या वधारणीसोबत गुंतवणुकदारांचे एकूण मूल्य एका दिवसात 67 हजार कोटींनी वाढले आहे. रिलायन्सने उर्जा क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अर्थ जाणकरांनी रिलायन्स स्टॉकमध्ये गुंतवणुकीला ग्रीन सिग्नल दर्शविला आहे.

रिलायन्स टॉप लिस्टेड :

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी मानली जाते. ही कंपनी फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या भारतीय कंपन्यांच्या यादीत समाविष्ट आहे. कंपनीचे इक्विटी शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) आणि BSE लिमिटेड वर सूचीबद्ध आहेत. कंपनीने जारी केलेल्या ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट्स (GDRs) लक्झेंबर्ग स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत. रिलायन्सच्या एकूण समभागांपैकी अंदाजे 3.46% लक्झेंबर्ग स्टॉक एक्सचेंजमध्ये देखील सूचीबद्ध आहेत.

रिलायन्सनं सावरला बाजार:

शेअर बाजारात (SHARE MARKET UPDATE) मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला. आज (मंगळवारी) सेन्सेक्समध्ये 700 अंकाहून अधिक घसरण नोंदविली गेली. आज सेन्सेक्स 703 अंकांच्या घसरणीसह 56463 वर पोहोचला. निफ्टी 215 अंकांच्या घसरणीसह 16958 वर बंद झाला. आज टॉप-30 शेअर्समध्ये केवळ रिलायन्स आणि आयसीआयसीआय बँक शेअरमध्ये तेजी नोंदविली गेली. तर सर्व 28 शेअर घसरणीसह बंद झाले. आजच्या घसरणीत सर्वाधिक भर एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि इन्फोसिस शेअ्र्रर्सची पडली.

संबंधित बातम्या :

Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची कहाणी; वाचा, मुकेश अंबानीं यांच्या मेहनतीच्या यशस्वी प्रवासाची सफर…

Today Gold Silver Price: आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्या चांदीच्या दरात तेजी, चांदी सत्तर हजारांवर, चेक करा तोळ्या तोळ्याचा भाव

Bank Merger : विलिनीकरणाचा उत्साह मावळला, एचडीएफसी गुंतवणुकदार तोट्यात; 9 दिवसात 2 लाख कोटींवर पाणी

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.