Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची कहाणी; वाचा, मुकेश अंबानीं यांच्या मेहनतीच्या यशस्वी प्रवासाची सफर…

भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यशाची गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ चे चेअरमन मुकेश अंबानी Mukesh Ambani यांचा आज (19 एप्रिल) वाढदिवस आहे. मुकेश अंबानीं यांच्या मेहनतीच्या यशस्वी प्रवासातील अनेक रोमचकांरी प्रसंग आहेत. त्यांना मध्येच ‘स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी’ सोडून देशात का परतावे लागले त्यानंतर त्यांनी काय केले वाचा त्यांची यशोगाथा...

Mukesh Ambani Birthday : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची कहाणी; वाचा, मुकेश अंबानीं यांच्या मेहनतीच्या यशस्वी प्रवासाची सफर...
अदानींना अंबानीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 9:48 AM

आज (19 एप्रिल) आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा वाढदिवस (Mukesh Ambani Birthday) आहे. जर आपण त्यांच्या कामगिरीचा आलेख पाहिला तर, आपली नजर थकेल पण आलेखाची उंची सतत वाढतांनाच दिसेल. देशातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने, देशाच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे. भारतातील ‘डिजिटल क्रांती’ च्या मागेही मुकेश अंबानींचे नाव घेतले जाते. त्यांच्या कंपन्या अनेक असल्या तरी सर्वसामान्यांच्या जिभेवर आलेल्या ‘रिलायन्स जिओ’(Reliance Jio) या कंपनीचे नाव सर्वात वेगळे आहे. असे म्हणतात की, मुकेश अंबानी हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी पेट्रोकेमिकल व्यवसाय इतका उज्ज्वल केला की त्यातून बाहेर पडणारी उत्पादने सोन्यासारखा नफा देऊ लागली. ‘रिलायन्स पेट्रोकेमिकल’ (Reliance Petrochemical) ही अशा कंपन्यांपैकी एक आहे ज्यांनी तोट्याचा विदारक चेहरा कधीही पाहिला नाही. वाढदिवसाच्या या खास प्रसंगी आपण मुकेश अंबानींच्या अशाच काही यशस्वी गोष्टीबाबत जाणून घेऊया ज्यापासून आपण सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठ सोडले

मुकेश अंबानी यांच्या अभ्यासाविषयी सांगायचे तर, त्यांनी मुंबईच्याच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात एमबीएचे शिक्षण सुरू केले. त्यानंतर व्यवसाय वृद्धीसाठी त्यांच्या वडिलांनी मुकेश अंबानींना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी मुंबईला बोलावले. मुकेश अंबानी मुंबईत परतले आणि वडिलांसोबत रिलायन्स पेट्रोलियम केमिकल्स सुरू केले. या कंपनीची सुरुवातच खूप मोठी असल्याने, त्यांना कधीही तोट्याचा सामना करावा लागला नाही.

अंबानी कुटुंबाचे घर

अशा अनेक कथा इंटरनेटवर सापडतील, ज्यामध्ये मुकेश अंबानी आणि अंबानी कुटुंबाच्या यशाबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ, मुकेश अंबानी यांचे कुटुंब पूर्वी भुलेश्वर, मुंबई येथे दोन खोल्यांच्या घरात राहत होते. नंतर त्यांच्या वडिलांनी कुलाब्यात सी-विंड नावाची 14 मजली इमारत विकत घेतली. मुकेश अंबानी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी या घरात बरीच वर्षे घालवली. आता मुकेश अंबानी दक्षिण मुंबईतील ‘अँटिला’ या जगातील सर्वात महागड्या 400,000 चौरस फूट इमारतीत कुटुंबासह राहतात.

भारतात कसे आले परत

भारत सरकारने त्यावेळी पॉलिस्टर फिलामेंट यार्नला परवानगी दिली, ज्याचा व्यवसाय रिलायन्स सुरू करण्याच्या तयारीत होती. त्यानंतर टाटा, बिर्लासह 43 कंपन्यांनी त्याच्या परवान्यासाठी बोली लावली, पण त्यात फक्त रिलायन्सला यश मिळाले. परवाना मिळताच त्याच्या वडिलांनी मुकेश अंबानींना अमेरिकेतून भारतात येण्याचे आमंत्रण पाठवले. मुकेश अंबानीही भारतात परतले आणि त्यांनी 1981 मध्ये कारखाना सुरू केला. त्यानंतर रिलायन्स पेट्रो केमिकल्स सुरू झाली. आज ही कंपनी पॉलिमर, इलास्टोमर्स , पॉलिस्टर, अरोमॅटिक्स , फायबर संबंधित वस्तू बनवते. या कंपनीने इतके नाव आणि किंमत कमावली की लोक त्याचे शेअर्स मिळवण्यासाठी डोळे लावून बसतात.

रिलायन्सच्या विशेष कंपन्या

रिलायन्सची मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली आणखी वाढ झाली आणि या कंपनीने रिलायन्स इन्फोकॉम लिमिटेडची स्थापना केली, ज्याचे नाव आता रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड आहे. भारतातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्येही तिचे नाव घेतले जाते. 2008 मध्ये, या कंपनीने मुंबई इंडियन्स हा आपला क्रिकेट संघ देखील विकत घेतला आणि त्यावर $111.9 दशलक्ष खर्च केले. संघ इंडियन प्रीमियर लीग आयपीएलचा एक भाग असून, सुरुवातीपासूनच प्रसिद्धीच्या झोतात राहीला आहे.

जामनगरमधील अद्वितीय कामगिरी

कमल मुकेश अंबानी यांनी जामनगरमधील ‘बँक ऑफ अमेरिका कॉर्पोरेशन’ आणि ‘इंटरनॅशनल अॅडव्हायझरी बोर्ड ऑफ कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ च्या संचालक मंडळावर काम केले आहे. त्यांनी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बेंगलोर’ (IIMB) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. मुकेश अंबानींच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम आणि तो म्हणजे तळागाळात जामनगर (गुजरात) येथे जगातील सर्वात मोठी पेट्रोलियम रिफायनरी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.