Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी मारली बाजी! मिळवले BCCI चे टीव्हीसह डिजिटल मीडिया राईट्स
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी डिस्नी स्टार आणि सोनी स्पोर्टसला धोबीपछाड दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने कोट्यवधींची शॉपिंग केली आहे. ई-लिलावात कंपनीने BCCI चे टीव्ही आणि डिजिटल मीडियाचे हक्क पुढील 5 वर्षांसाठी खरेदी केले. ही मोठी खेळी आहे. त्यामुळे बीसीसीआयने खोऱ्याने पैसा ओढला असला तरी रिलायन्सला पण मोठा फायदा होणार आहे.
नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : क्रिकेटच्या मैदानात BCCI एक अनभिषिक्त राजा आहे. अब्जावधीची माया या भारतीय क्रिकेट मंडळाकडे आहे. त्यात आता रिलायन्सने पण उडी घेतली आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या या खेळीने डेस्नी स्टार आणि सोनी स्पोर्टच्या तोंडचे पाणी पळाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने आज कोट्यवधींची शॉपिंग केली आहे. ई-लिलावात कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून टीव्ही आणि डिजिटल मीडियाचे हक्क (Rights of TV and Digital Media) खरेदी केले. हा करार पुढील पाच वर्षांसाठी असेल. या करारातून बीसीसीआयला कोट्यवधींचा महसूल मिळेल. तर जाहिरातींच्या माध्यमातून रिलायन्सला खोऱ्याने पैसा ओढता येणार आहे. ई-लिलावात (e Auction) हे सर्व हक्क वायकॉम18 ने खरेदी केले आहे.
अशी झाली डील
वायकॉम18 ने सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्नी स्टारला हरवत हे हक्क मिळवले. वायकॉमने BCCI सोबत 5 वर्षांपर्यंत म्हणजे 2028 पर्यंत करार केला आहे. या करारानुसार, 88 आंतरराष्ट्रीय सामने असतील. वायकॉम18 BCCI ला प्रत्येक सामन्यासाठी 67.75 कोटी रुपये देईल. ही रक्कम 2018-23 मध्ये डिस्नी स्टारच्या 60 कोटी रुपयांपेक्षा 12.91% इतकी जास्त आहे.
डिस्नी प्लस आणि सोनी स्पोर्ट्सला आव्हान
वायकॉम-18 ने डिस्नी प्लस आणि सोनी स्पोर्ट्सला या मैदानात धोबीपछाड दिली. BCCI ने गेल्या वर्षी IPL मीडिया राइट्सचे ई-ऑक्शन केले होते. 2018 मध्ये BCCI राइट्स साठी ऑफलाइन ऑक्शन झाले होते. या ई-लिलावात अधिकची बोली लावून मुकेश अंबानी यांनी सामना त्यांच्या बाजूने फिरवला. यामाध्यमातून त्यांना मोठा फायदा होणार आहे.
Congratulations @viacom18 🤝 for winning the @BCCI Media Rights for both linear and digital for the next 5 years. India Cricket will continue to grow in both spaces as after @IPL, and @wplt20, we extend the partnership @BCCI Media Rights as well. Together we will continue to…
— Jay Shah (@JayShah) August 31, 2023
2 पॅकेजमध्ये खरेदी केले हक्क
मीडिया राईट्ससाठी BCCI ने ई-ऑक्शन केले. त्यातंर्गत मीडिया राईट्स दोन पॅकेजमध्ये होते. यामध्ये टीव्हीसाठी एक तर दुसऱ्या पॅकेजमध्ये डिजिटल आणि वर्ल्ड ब्रॉडकास्टिंग राईट्स होते. ब्रॉडकास्ट सायकल सप्टेंबर 2023 रोजी सुरु होऊन मार्च 2028 पर्यंत असेल. या दरम्यान जवळपास 88 आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येतील. 2023 ते 2028 च्या सायकलमध्ये इंडियन क्रिकेट टीम 88 मॅच खेळेल. यामध्ये ऑस्ट्रेलिया विरोधात 21 आणि इंग्लंडविरोधात 18 सामने खेळले जातील.
BCCI ने दिल्या शुभेच्छा
BCCI चे सचिव जय शाह यांनी वायकॉम 18 ला पुढील पाच वर्षांसाठी बीसीसीआयचे टीव्ही आणि डिजिटल अधिकार खरेदी करण्याच्या शुभेच्छा दिल्या. आयपीएल आणि डब्ल्यूपीएलच्या अधिकारानंतर बीसीसीआयने मीडिया अधिकार विकले. येत्या सप्टेंबर 2023 ते मार्च 2028 पर्यंत हे हक्क वायकॉम-18 कडे असतील.