मुकेश अंबानींकडून राम मंदिरासाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींंचं दान, कुटुंबासह घेतलं रामलल्लाचं दर्शन

राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह प्रभू श्री रामांचं दर्शन घेतलं. मुकेश अंबानी यांनी राम मंदिराला केलेल्या दानाची किंमत समोर आली आहे.

मुकेश अंबानींकडून राम मंदिरासाठी तब्बल 'इतक्या' कोटींंचं दान, कुटुंबासह घेतलं रामलल्लाचं दर्शन
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 9:50 PM

मुंबई : राम मंदिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. अयोध्याच नाहीतर अवघा देश रामलल्लाच्या भक्तीमध्ये तल्लीन झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. आजच्या ऐतिहासिक सोहळ्याला सर्व क्षेत्रातील दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलं होतं. देशातील प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोहळ्याला आपल्या सर्व कुटुंबासह हजेरी लावली होती. मुकेश अंबानी यांनी राम मंदिर ट्रस्टला दिलेल्या देणगीचा आकडा समोर आला आहे.

मला भारतीय संस्कृतीचा अभिमान- नीता अंबानी

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा अंबानी, मुले आकाश अंबानी-अनंत अंबानी, जावई आनंद पिरामल आणि सून श्लोका उपस्थित होते. संपूर्ण अंबानी कुटूंब कडेकोट बंदोबस्तामध्ये विमानतळावरून राम मंदिरात पोहोचलं. यावेळी, जय श्री राम… हा ऐतिहासिक दिवस आहे. मला भारतीय संस्कृतीचा अभिमान असल्याचं नीता अंबानी म्हणाल्या.

इतक्या कोटींचं अंबानींनी केलं दान

मुकेश अंबानी यांनी राम मंदिर ट्रस्टला 2.51 कोटी रूपयांचं दान केल्याची माहिती समोर आली आहे. देशभरात दिवाळी साजरी झाली, या क्षणाचं साक्षीदार होता आलं हे माझं भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी दिली. यावेळी अंबानी कुटुंब हे आनंदी आणि उत्साही असलेलं पाहायला मिळालं. आजचा दिवस हा इतिहासाच्या पानांमध्य लिहिला जाईल, असं आकाश अंबानी म्हणाले. तर आजचा दिवस हा सर्वात पवित्र दिवसांपैकी एक असल्याचं ईशा अंबानी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा विधी पूर्ण करण्यात आला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.