मुकेश अंबानी यांनी अवघ्या 15 मिनिटात 53 हजार कमावले; कसे?
मुकेश अंबानी जिथे हात लावतात त्याचं सोनं होतं असं सांगितलं जातं. रिलायन्स एजीएम सुरू होण्याच्या 15 मिनिटाच्या आतच कंपनीच्या शेअरचा भाव वाढला. कंपनीने 53 हजार कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे कंपनीचा चांगलाच नफा झाला. रिलायन्सने हे पैसे कमावले तरी कसे?

देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 35 लाख शेअरहोल्डर्सना संबोधित केलं. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मार्केट कॅपच्या एक दिवसाच्या तुलनेत 53 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. आज दुपारी 2 वाजल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये दोन टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. शेअरहोल्डर्सना संबोधित करत असताना मुकेश अंबानी यांच्या कंपनीने अवघ्या 15 मिनिटात 53 हजाराची कमाई केली आहे.
रिलायन्स एजीएम सुरू होताच रिलायन्सच्या शेअरमध्ये पटापट वाढ होताना दिसली. कंपनीचा शेअर 2.64 टक्क्याने वेगाने वाढून 3074.80 रुपयांवर गेला. सकाळी कंपनीच्या शेअरमध्ये किरकोळ तेजी पाहायला मिळाली होती. सकाळी कंपनीचा शेअर बीएसईवर 3014.95 रुपयांवर ओपन झाला. तर दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी कंपनीचा शेअर 1.84 टक्क्याने वाढून 3050.95 वर गेला. एक दिवस आधी कंपनीच्या शेअरमध्ये किरकोळ घसरण झाली होती. काल हा शेअर 2,995.75 रुपयांवर बंद झाला होता.
वर्षभरात किती वाढ?
गेल्या एजीएमपासून या एजीएमपर्यंत रिलायन्सच्या शेअरमध्ये चांगली वाढ झाली आहे. आकडे पाहिले तर शेअरमध्ये 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या एजीएममध्ये एक टक्क्याने शेअरमध्ये घसरण झाली होती. 2442.55 रुपयांवर शेअर बंद झाला होता. याचा अर्थ या शेअरमध्ये 572.4 रुपयांची वाढ दिसत आहे. जाणकारांच्या मतानुसार या शेअरमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
झटपट कमाई
कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झालेली असतानाच मार्केट कॅपमध्येही वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. एक दिवस आधी कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 53 हजार कोटी रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. आकडेवारीनुसार एक दिवस आधी कंपनीचा मार्केट कॅप 20,27,100.67 कोटी रुपये झाला होता. नंतर कंपनीचे शेअर हाय लेव्हलला गेल्यावर 20,80,590.55 कोटी रुपयांवर पोहोचले होते. याचा अर्थ एजीएमची सुरुवात होताच मार्केट कॅपमध्ये 53,489.88 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यावरून शेअरधारकांचा मुकेश अंबानी यांच्यावर प्रगाढ विश्वास असल्याचंही अधोरेखित झालं आहे. अंबानी जे करतील त्याचं सोनं होईल अशी नागरिकांची धारणा झाली आहे. तेच रिलायन्सच्या यशाचं गमक असल्याचंही सांगितलं जातं.