ना अदानी, ना टाटा मग कोणी आशियातील सर्वात श्रीमंताच्या यादीतून मुकेश अंबानी यांना टाकले मागे

जेनसेन हुआंग यांनी 1993 मध्ये एनव्हीडियाची स्थापना केली. तेव्हापासून ते कंपनीचे सीईओ आणि अध्यक्ष आहेत. त्यांच्या कंपनीचे बाजार भांडवल 177% ने वाढून $3.33 ट्रिलियन झाले आहे. एआयमध्ये एनव्हीडिया आघाडीची कंपनी झाली आहे.

ना अदानी, ना टाटा मग कोणी आशियातील सर्वात श्रीमंताच्या यादीतून मुकेश अंबानी यांना टाकले मागे
मुकेश अंबानी गौतम अदानी रतन टाटा
Follow us
| Updated on: Aug 27, 2024 | 3:03 PM

रिलायन्स उद्योग समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंताच्या यादीत अव्वल होते. परंतु आता मागे पडले आहे. त्यांना मागे टाकणाऱ्यांमध्ये ना उद्योगपती गौतम अदानी आहेत, ना उद्योगपती रतन टाटा आहेत. त्यांना मागे टाकणारा व्यक्ती एनव्हीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग आहेत. जेनसेन यांच्या संपत्तीत जबरदस्त वाढ झाली आहे. श्रीमंताच्या यादीत त्यांचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. फोर्ब्सच्या रियल-टाइम अब्जाधिशांच्या यादीत ते 11 अकराव्या क्रमांकावर पोहचले आहे. त्यांनी र‍िलायन्स इंड‍स्‍ट्रीजचे (RIL) चेअरमन मुकेश अंबानी यांनाही मागे टाकले आहे. मुकेश अंबानी आता तेराव्या क्रमांकावर आहेत. मागील पाच वर्षांत जेनसेन हुआंग यांची संपत्ती 2280% वाढली आहे. त्यांची कंपनी एनवीडिया आर्टिफिशियल इंटेलिजेन्समध्ये (एआय) कार्यरत आहे. या क्षेत्रात एनव्हीडिया किती वेगाने पुढे आली आहे? हे आता दिसून आले आहे.

कंपनीच्या शेअरचे विभाजन

जेनसेन हुआंग यांनी 1993 मध्ये एनव्हीडियाची स्थापना केली. तेव्हापासून ते कंपनीचे सीईओ आणि अध्यक्ष आहेत. त्यांच्या कंपनीचे बाजार भांडवल 177% ने वाढून $3.33 ट्रिलियन झाले आहे. एआयमध्ये एनव्हीडिया आघाडीची कंपनी झाली आहे. हेच त्याच्या यशाचे सर्वात मोठे कारण आहे. 1999 मध्ये एनव्हीडियाचा IPO आला होता. तेव्हापासून ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स, एआय, डेटा सेंटर्स आणि सेल्फ-ड्रायव्हिंग कार यासारख्या तंत्रज्ञानामध्ये त्यांची कंपनी आघाडीची कंपी बनली आहे. नुकतेच कंपनीचे शेअर्सचे विभाजन झाले. यामुळे प्रति शेअर किंमत $1200 वरून $130 पेक्षा कमी झाले आहे.

फोर्ब्सच्या माहितीनुसार, 2024 मध्ये हुआंग यांची संपत्ती 77 अब्ज डॉलर होती. शेअर बाजारात कंपनीचे मूल्य वाढल्यामुळे रॅकींगसुद्धा सुधारली आहे. एनव्हीडियाचे जेनसेन मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ स्टीव बाल्मर यांच्या बरोबर आले आहे. त्यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे.

गौतम अदानी पंधराव्या क्रमांकावर

फोर्ब्सनुसार, हुआंग 2019 मध्ये श्रीमंताच्या यादीत 546 व्या क्रमांकावर होते. मागील वर्षी ते 76 व्या क्रमांकावर आले. आता अकराव्या क्रमांकावर आले. मागील पाच वर्षांत त्यांची संपत्ती 114 अब्ज डॉलरने वाढली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्समध्ये त्यांच्या कंपनीची प्रगती उल्लेखनीय आहे. श्रीमंताच्या यादीत भारतीय अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी 104 अब्ज डॉलर संपत्तीसह 15 क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती 19.6 अब्ज डॉलरने वाढली आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.