Mukesh Ambani, Gautam Adani : अदानींनी एका झटक्यात कमावले 35 हजार कोटी, अंबानींनी कमावले 100 बिलियन डॉलर्स, नेमकं असं काय झालं?

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचं नाव म्हटलं की लगेच डोळ्यासमोर पैसाच पैसा येऊ लागतो. आपण सर्वसामान्यांनी कल्पनाही केली नसेल इतका पैसा या प्रसिद्ध उद्योजकांकडे आहे. अशातच सोमवारी अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. तर अदानींसह मुंकेश अंबानींच्या तिजोरीतही भर पडली. यामागचं नेमकं कारण काय ते जाणून घ्या

Mukesh Ambani, Gautam Adani : अदानींनी एका झटक्यात कमावले 35 हजार कोटी, अंबानींनी कमावले 100 बिलियन डॉलर्स, नेमकं असं काय झालं?
मुकेश अंबानी, गौतम अदानीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 12:09 PM

मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी (Gautam Adani) यांचं नाव घेतलं की लगेच डोळ्यासमोर पैसाच पैसा येऊ लागतो. आपण सर्वसामान्यांनी कल्पनाही केली नसेल इतका पैसा या प्रसिद्ध उद्योजकांकडे आहेत. अशातच अंबानी आणि अदानी यांच्यासंदर्भातील एक बातमी समोर आलीय आहे.  सोमवारी अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जीच्या (Adani Green Energy) शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. कंपनीचा समभाग नऊ टक्क्यांच्या उसळीसह बंद झाला. अदानी टोटल गॅसचे शेअर्स 5.43 टक्के, अदानी पोर्टमध्ये 4.20 टक्के, अदानी पॉवरमध्ये 4.11 टक्के, अदानी विल्मरमध्ये 1.70 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 1.04 टक्के आणि अदानी ट्रान्मिशन 1.02 टक्क्यांनी शेअर्स वाढले. अदानींसह मुंकेश अंबानींच्या तिजोरीतही भर पडली. त्यांची एकूण संपत्ती 94.6 अब्ज डॉलर्सने वाढली असून एकूण संपत्ती 100 अरब डॉलर्डसवर पोहचली आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या कमाईमागचं नेमकं कारण काय आहे, हे आधी समजून घ्यायला हवं.

कोण सर्वाधिक श्रीमंत?

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनुसार, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क 288 अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीमुळे जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची संपत्ती 193 अरब डॉलर्स आहे. त्यामुळे ते श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. फ्रेंच उद्योगपती आणि जगातील सर्वात मोठी लक्झरी वस्तू कंपनीचे मालक बर्नार्ड आरनॉल्ट श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती 150 अरब डॉलर्स आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे चौथ्या स्थानावर असून त्यांची संपत्ती 134 अरब डॉलर्स इतकी आहे.

एका झटक्यात कमावले 35 हजार कोटी

सोमवारी अदानी ग्रुपच्या अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. कंपनीचा समभाग नऊ टक्क्यांच्या उसळीसह बंद झाला. अदानी टोटल गॅसचे शेअर्स 5.43 टक्के, अदानी पोर्टमध्ये 4.20 टक्के, अदानी पॉवरमध्ये 4.11 टक्के, अदानी विल्मरमध्ये 1.70 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 1.04 टक्के आणि अदानीट्रान्मिशन 1.02 टक्क्यांनी शेअर्स वाढले.

सर्वाधिक नफा कमावणारे उद्योजक

गौतम अदानी यांच्या संपत्तीत या वर्षात 24 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. अदानी या वर्षातील जगातील सर्वाधिक नफा कमावणाऱ्या उद्योगपतींपैकी एक आहे. 2 वर्षात त्यांची संपत्ती जवळपास दुप्पट झाली आहे. ग्रीन एनर्जीशी संबंधित त्यांच्या कंपनीचा व्यवसाय वेगाने पसरत आहे.

वॉरेन बफे सहाव्या स्थानावर

जगातील प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे मात्र 125 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर घसरले आहेत, तर अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि इंटरनेट उद्योजक लॅरी पेज 127 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पाचव्या स्थानावर आले आहेत.

इतर बातमी

मावळात पुष्पा गँगचा धुमाकूळ, टोळक्यानं वडेश्वर गावात चंदनाचं झाड कापून पळवलं

प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर गोळीबार, बियाणी गंभीर जखमी

National Calendar | आता एकच सण दोन दिवस साजरा होणार नाही, केंद्र सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल, राष्ट्रीय दिनदर्शिका बनणार!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.