Best Companies : अंबानी, अदाणी की टाटा, कोणती कंपनी कशात आहे दादा..

Best Companies : भारतातील दिग्गज कंपन्यांनी जोरदार घौडदौड सुरु आहे..

Best Companies : अंबानी, अदाणी की टाटा, कोणती कंपनी कशात आहे दादा..
कोण किती पाण्यात?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 8:18 PM

नवी दिल्ली : देशातील दोन दिग्गज उद्योजकांची नावे जागतिक श्रीमंतांच्या टॉप यादीत झळकत आहेत. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पिछाडीवर टाकत गौतम अदाणी यांनी (Gautam Adani) यांनी आघाडी घेतली आहे. तरीही रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) मूल्यमापन, महसूल आणि नफा या महत्त्वाच्या पॅरामीटर्सवर अग्रेसर आहे. बुरगुंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया 500 यादी, 2022 (Burgundy Private Hurun India 500 list) मध्ये याविषयीचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, भारतातील आघाडीच्या अदाणी, अंबानी आणि टाटासह इतर कंपन्यांचा अनेक क्षेत्रात बोलाबाला असल्याचे दिसून येते.

या यादीत दुसऱ्या वर्षीही रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान अबादित ठेवले आहे. ही भारतातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी ठरली आहे. कंपनीची व्हॅल्यू, मूल्य 17.25 लाख कोटी रुपये आहे. कंपनी दरवर्षी 3.6 टक्क्यांची वृद्धी नोंदवत आहे.

या यादीतील टॉप-10 कंपन्यांची एकूण मूल्य हे 72 लाख कोटी रुपये इतके आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा वाटाच जवळपास 25 टक्के आहे. अहवालानुसार, या टॉप-10 कंपन्या भारताच्या एकूण सकल उत्पादनाच्या 37 टक्के आहेत. हुरुन इंडियाने या कंपन्यांचे मूल्य जीडीपीच्या 8.9 टक्के असल्याचा दावा केला आहे.

हे सुद्धा वाचा

11.68 लाख कोटींचे मूल्यासह टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. टीसीएस 5,92,195 नोकरी देणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. इतर कंपन्या त्यामानाने आघाडीवर नाहीत.

दुसरीकडे रिलायन्सची दरवर्षी जोरदार घौडदौड सुरु आहे. या कंपनीचे मूल्य 10.52 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. तर टीसीएसचे मूल्य 4.4 लाख कोटी रुपयांने वाढले आहे. इतर कंपन्यांचे मूल्यही वाढले आहे. पण या दोन कंपन्यांनी त्यात आघाडी घेतली आहे.

बुरगुंडी प्रायव्हेट हुरुन इंडिया 500 यादीत टाटा मोटर्स, टाटा स्टील, राजेश एक्सपोर्ट्स, हिंडाल्को इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो, आईसीआईसीआई बँक आणि जेएसडब्ल्यू स्टील या टॉप10 मधील कंपन्या ठरल्या आहेत.

Non Stop LIVE Update
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.