Highest Taxpayer : भारतातील दिग्गज उद्योगपती नाही, तर सर्वाधिक कर भरतो हा ‘खिलाडी’

Highest Taxpayer : देशात अनेक श्रीमंत घराणी आहेत. त्यांचा टर्नओव्हर एखाद्या राज्याच्या बजेट इतका आहे. पण इनकम टॅक्स भरण्यात एकाही उद्योजकाचे नाव पहिल्या क्रमांकावर नाही, तर हा पठ्ठ्या भारतात सर्वाधिक प्राप्तिकराचा भरणा करतो.

Highest Taxpayer : भारतातील दिग्गज उद्योगपती नाही, तर सर्वाधिक कर भरतो हा 'खिलाडी'
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 3:49 PM

नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : सध्या देशात आयकर रिटर्न भरणाऱ्यांचा (Income Tax Return) वार्षिक महोत्सव सुरु आहे. आयकर भरण्याची हातघाई सुरु झाली आहे. आयटीआर भरण्यासाठी आता अवघे चार दिवस उरले आहेत. 31 जुलै 2023 ही अंतिम मुदत आहे. कोट्यवधी करदात्यांनी आयकर रिटर्न भरले आहे. तर काही जणांची कागदपत्रांची पुर्तता अंतिम टप्प्यात असून लवकरच ते प्राप्तिकर रिटर्न भरण्याच्या तयारीत आहेत. अनेकांनी केंद्र सरकारच्या तिजोरीत कराची रक्कम जमा केली आहे. देशात अनेक श्रीमंत घराणी आहेत. मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह अनेक यशस्वी उद्योजक देशात आहेत. त्यांचा टर्नओव्हर एखाद्या राज्याच्या बजेट इतका आहे.  त्यांची कमाई जास्त आहे.  पण इनकम टॅक्स भरण्यात एकाही उद्योजकाचे नाव पहिल्या क्रमांकावर नाही, तर हा पठ्ठ्या भारतात सर्वाधिक प्राप्तिकराचा भरणा करतो.

कोण आहे सर्वाधिक कर देणारी व्यक्ती

आयटीआर भरण्याच्या महोत्सवात, तुमच्या मनात पण प्रश्न आला असेल की, देशात सर्वाधिक कर कोण भरतो? तुमच्या समोर देशातील दिग्गज उद्योगपतींचा चेहरा आला असेल. पण थांबा, अंबानी, अदानी, टाटा वा बिर्ला यापैकी कोणीच सर्वाधिक आयकर जमा करत नाहीत. यापैकी एक जणही सर्वात जास्त आयकर भरणारी व्यक्ती नाही.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी जमा केला सर्वाधिक इनकम टॅक्स

वैयक्तिक आयकर रिटर्न भरणाऱ्यांच्या यादीत एकही दिग्गज उद्योगपती नाही. कॉर्पोरेट सेक्टरवर इतर क्षेत्र भारी पडतात. आयकर खात्याने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये बॉलिवूड खिलाडी म्हणून लोकप्रिय अक्षय कुमार याने सर्वाधिक आयकर भरला होता. त्याने 2022 मध्ये 29.5 कोटी रुपये इनकम टॅक्स जमा केला. त्यांनी 486 कोटी रुपयांची वार्षिक कमाईचा दावा केला होता.

अशी होते अक्षय कुमार यांची कमाई

अक्षय कुमार यांचा कमाईचा आकडा बडेजावपणा नाही. बॉलिवुडमधील अनेक मोठ्या अभिनेत्यांमध्ये खिलाडी अक्षय कुमारचे नाव सर्वात पुढे आहे. वर्षभरात त्यांचे अनेक विषयावरील चित्रपट कमाईचा आकडा गाठतात. याशिवाय अक्षय कुमार त्याचे प्रोडक्शन हाऊस आणि स्पोर्ट्स टीम चालवतात. तसेच जाहिरातीच्या माध्यमातून तो तगडी कमाई करतो.

खेळाडू नंबर वन

अभिनेता अक्षय कुमार याची कमाई जोरदार आहे. भारतात वैयक्तिकरित्या इनकम टॅक्स भरणाऱ्यांमध्ये तो नंबर वन आहे. 2020-21 मध्ये पण त्याने सर्वाधिक कराचा भरणा केला होता. त्याने 25.5 कोटी रुपायांचा इनकम टॅक्स जमा केला होता. तो त्यावर्षी पण देशातील सर्वात मोठा वैयक्तिक करदाता होता. सरकारने त्याचे कौतुक करत त्याचा गौरव पण केला होता.

यावेळी माही करु शकतो कमाल

या आर्थिक वर्षातील आयटीआर भरण्याची प्रक्रिया अजून सुरु आहे. आयटीआर भरण्यासाठी आता अवघे चार दिवस उरले आहेत. 31 जुलै 2023 ही अंतिम मुदत आहे. यावर्षी कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी कमाल कमाल करण्याची शक्यता आहे. तो सर्वाधिक वैयक्तिक कर भरण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी त्याने 38 कोटींचा आगाऊ इनकम टॅक्स जमा केला होता. झारखंडमधील सर्वात मोठा वैयक्तिक करदाता आहे. यावर्षी तो देशात नंबर वन ठरु शकतो.

या कारणामुळे उद्योगपतींचा नाही क्रमांक

अनेकांना प्रश्न पडला असेल की जगातील श्रीमंतांच्या यादीत झळकणारे अब्जाधीश उद्योगपती कर भरण्यात मागे कसे? तर जवळपास सर्वच उद्योगपतींनी त्यांच्या नावावर जास्त संपत्ती दाखवलेली नाही. ही संपत्ती त्यांच्या कंपन्यांच्या नावावर आहे. त्यामुळे आयकर त्यांच्या कंपनीच्या नावाने जमा होतो. कंपन्या कॉर्पोरेट इनकम टॅक्स जमा करतात.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.