Mukesh Ambani | ‘अनंतमध्ये मला धीरुभाई दिसतात’, बाप माणूस मुकेश अंबानी झाले भावूक

Mukesh Ambani | प्रत्येक वडील आपल्या मुला-मुलींविषयी हळवे असतात. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी हे मुलगा अनंतविषयी अशेच हळवे झाले. अनंतमध्ये मला धीरूभाई दिसतात, असे ते म्हणाले. पण यामागे सुद्धा एक खास कारण आहे, का म्हणाले मुकेश अंबानी असे...

Mukesh Ambani | 'अनंतमध्ये मला धीरुभाई दिसतात', बाप माणूस मुकेश अंबानी झाले भावूक
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 9:58 AM

नवी दिल्ली | 2 March 2024 : रिलायन्स इंडस्ट्रीजेच चेअरमन मुकेश अंबानी लहान मुलगा अनंत अंबानीविषयी हळवे झाले. अनंत या वर्षी राधिका मर्चेंटशी विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नापूर्वी गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत आणि राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा रंगला आहे.  1 मार्चपासून तीन दिवस हा कार्यक्रम होत आहे. या सोहळ्यादरम्यान, अनंतमध्ये मला माझे वडील, धीरुभाई दिसतात, असे मुकेश अंबानी म्हणाले. यामागे एक कारण आहे. कोणते आहे ते कारण, का झाले आशियातील अब्जाधीश हळवे, जाणून घेऊयात..

आज वडील खुश असतील

‘आज अनंत आणि राधिका हे त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात करत आहे. आज माझे वडील धीरुभाई स्वर्गातून आमच्या कुटुंबाला आशिर्वाद देत असतील. मला विश्वास आहे की ते खुप आनंदी असतील. त्यांचा सर्वात लाडका नातू अनंत याच्या आयुष्यातील सर्वात चांगला क्षण आहे.’ अशी प्रतिक्रिया मुकेश अंबानी यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

कारण तरी काय

तर धीरुभाई अंबानी यांनी त्यांच्या व्यावसायिक कारभाराची पायाभरणी जामनगर येथून केली होती. त्यांचे जामनगरवर विशेष प्रेम होते. त्यांना जामनगरने आकर्षीत केले होते. येथेच रिलायन्सच्या रिफायनरीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. ही धीरुभाई यांची कर्मभूमी होती. याच ठिकाणी रिलायन्सला तिचे सत्व,उद्देश गवसला. तीस वर्षांपूर्वी जामनगरमधील ही जागा ओसाड होती. पण आज जे दिसतंय ते धीरुभाईचे स्वप्नांना आलेले मूर्त रुप असल्याचे मुकेश अंबानी म्हणाले.

तो तर अनंत शक्ती

संस्कृतमध्ये अनंतचा अर्थ होतो, ज्याचा कोणताच अंत नाही. मला मुलगा अनंतमध्ये अनंत शक्ती दिसते. ज्यावेळी मी त्याला पाहतो, त्यावेळी त्याच्यात माझे वडील, धीरुभाई दिसतात. त्यांचे वर्तन आणि वागणूक अनंतमध्ये झळकते, असे मुकेश अंबानी म्हणाले.

घरी लगीनघाई

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा सर्वात लहान मुलगा अनंत अंबानी याचे लग्न राधिका मर्चेंट हिच्याशी होत आहे. अनंत अंबानी याचे लग्न जुलै महिन्यात होत आहे. पण विवाहसंबंधीचे कार्यक्रम 1 मार्चपासून तीन दिवसांसाठी सुरु होत आहे. गुजरातमधील जामनगरमध्ये लग्नापूर्वी काही कार्यक्रम होत आहे. अनंत अंबानी याचे लग्न राधिका मर्चेंट हिच्याशी होत आहे. राधिका एनकोर हेल्थकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वीरेन मर्चेंट आणि शैला मर्चेंट यांची छोटी मुलगी आहे. श्रीमंत वऱ्हाडी जामनरमध्ये तंबूत थांबणार आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.