Mukesh Ambani : एक CEO हवा शानदार! मुकेश अंबानी यांचा हा प्लॅन जोरदार

Mukesh Ambani : आशियातील अब्जाधीश मुकेश अंबानी यांना त्यांच्या या व्यवसायासाठी सीईओ हवा आहे. त्याचा ते शोध घेत आहेत. हा त्यांचा महत्वकांक्षी व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना देशाच्या विमा आणि आर्थिक क्षेत्रात डिजिटल क्रांती आणायची आहे. त्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

Mukesh Ambani : एक CEO हवा शानदार! मुकेश अंबानी यांचा हा प्लॅन जोरदार
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 10:03 AM

नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आहेत. त्यांच्या रिलायन्स समूहाचा पसारा आणि आवाका जगभर पसरला आहे. त्यांनी वित्तीय सेवेत डिजिटल माध्यमातून क्रांती आणण्यासाठी रिलायन्सने नवीन कंपनी बाजारात उतरवली आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज कंपनीची (Jio Financial Services Ltd – JFSL) घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. ती आता मूर्त रुपात आली आहे. या कंपनीच्या व्यवस्थापनासाठी, देखरेखीसाठी आणि तिच्या विकास, वृद्धीसाठी मुकेश अंबानी यांना एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (CEO) हवा आहे. त्याचा ते शोध घेत आहेत. त्यासाठी जागतिक बाजारातील सर्वाधिक हुशार आणि पदाला न्याय देऊ शकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच JFSL शेअर बाजारात सूचीबद्ध झाला. बुधवारी या शेअरमध्ये 5 टक्क्यांची उसळी दिसून आली.

विमा क्षेत्रात क्रांती

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ फायनेन्शिअल विषयी काही घोषणा केल्या. 28 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत विविध धोरणांचा उल्लेख केला. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज विमा क्षेत्रात उडी घेणार आहे. स्मार्ट विमा योजना केवळ योजना नसतील, तर एक पॅकेज असेल, ज्यात ग्राहकांना अनेक सुविधा मिळतील. त्यासाठी जागतिक विमा कंपन्यांशी रिलायन्स हातमिळवणी करण्यात आली आहे. या कंपन्यांचा एनालिटिक्स डाटाचा जिओला फायदा होणार आहे.

हे सुद्धा वाचा

शेअर वधारला

विमा क्षेत्रात उतरण्याची घोषणा करण्यात आल्याने जिओ फायनेन्शिअलचा शेअर वधारला. ही घोषणा कंपनीच्या पथ्यावर पडली. बुधवारी जिओ फायनेन्शिअलचा शेअर 4.99% मजबुतीसह बंद झाला. बाजार बंद होताना हा शेअर 11.00 रुपये म्हणजे 4.99% मजबुतीसह 231.25 रुपये प्रति शेअर किंमतीवर पोहचला.

या फर्मशी नावाची चर्चा

ब्लूमबर्गच्या (Bloomberg) रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजने Korn Ferry आणि Spencer Stuart Inc यासह इतर कन्सल्टिंग फर्मशी सीईओसाठी संपर्क केला आहे. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज लिमिटेडच्या विमा व्यवसायासाठी CEO हवा आहे. मुकेश अंबानी या पदासाठी अनुभवी, भारतीयांची नाडी ओळखणारा आणि मुरब्बी उमेदवारांचा शोध घेत आहेत. इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी त्यांनी खास योजना आखली आहे. या नवीन कंपनीच्या भवितव्याविषयी, धोरणाविषयी त्यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

AGM मध्ये यावर चर्चा

  1. जिओ फायनेन्शिअल डिजिटल वित्तीय सेवांवर भर देणार
  2. देशाच्या विकासाला मोठा हातभार लावण्याचा विचार
  3. छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत करणार, पेमेंट सोल्यूशन देणार
  4. डिजिटल वित्तीय सेवांच्या माध्यमातून अमुलाग्र बदलाचा विचार
  5. विमा क्षेत्रात उडी घेणार, त्यासाठी जागतिक कंपन्यांच्या अनुभवाची मदत घेणार
  6. के. व्ही. कामथ यांच्या नेतृत्वात एक कुशल टीम तयार करण्यात आली आहे

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.